Rohit Sharma

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर झाली ‘या’ नकोश्या विक्रमाची नोंद

546 0

मुंबई : काल मुंबई आणि पंजाब यांच्यात आयपीएल 2023 मधील 46 वा सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही संघानी धावांचा पाऊस पाडला. या सामन्यात मुंबईने पंजाबवर विजय मिळवत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. हा सामना जरी मुंबईने जिंकला असला तरी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. यामुळे त्याच्या नावावर एका नकोश्या विक्रमाची नोंद झाली आहे.

काय आहे हा नकोसा विक्रम?
पंजाब विरुद्धच्या सामन्यात शून्यवर बाद झाल्यानंतर रोहित शर्माच्या नावावर एका नकोश्या विक्रमाची नोंद झाली आहे. रोहित शर्मा हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक 15 वेळा शुन्यावर बाद होणार फलंदाज ठरला आहे. या अगोदर हा विक्रम दिनेश कार्तिक आणि मंदीप सिंह यांच्या नावावर होता. आता या यादीमध्ये रोहित शर्माचा समावेश झाल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

काल पंजाब आणि मुंबई यांच्यात पार पडलेल्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर पंजाबच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांवर चौफेर हल्ला करत मुंबईसमोर २१५ धावांचे आव्हान ठेवले. यानंतर मुंबईकडून रोहित शर्मा आणि ईशान किशनची जोडी मैदानात उतरली. परंतु यावेळी मुंबईच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही.कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर शुन्य धावा करून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार आणि ईशान किशन यांनी मुंबईची धुरा सांभाळून मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर नेवून ठेवले. त्यांनतर तिलक वर्मा आणि टीम डेविड यांनी मुंबईला विजय मिळवून दिला.

Share This News

Related Post

Cricket Retirement

Cricket Retirement : टीम इंडियाला मोठा धक्का ! 5 व्या टेस्टपूर्वी ‘या’ स्पिनरने घेतली तडकाफडकी निवृत्ती

Posted by - March 5, 2024 0
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील (Cricket Retirement) अखेरचा सामना 7 मार्च रोजी होणार आहे. मात्र…

क्रिकेटर ऋषभ पंतच्या कुटुंबीय आणि डॉक्टरांशी बोलणं झालंय; करत जय शाह म्हणाले…..

Posted by - December 30, 2022 0
  भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाला. दिल्लीहून घरी जात असताना रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर…

कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ‘महाराष्ट्र केसरी 2022’

Posted by - April 9, 2022 0
  साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात ६४ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लागला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *