Liton Das

कोलकात्याच्या संघात ‘या’ विस्फोटक खेळाडूची एन्ट्री; लिटन दासची घेणार जागा

401 0

मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या सीझनमध्ये अनेक रंगतदार सामने पाहायला मिळत आहे. हे सामने पाहता अजूनही प्ले ऑफचे संघ निश्चित झालेले नाही. आज कोलकाता आणि हैदराबाद यांच्यामध्ये लढत होणार आहे. यादरम्यान कोलकाताच्या संघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोलकाताचा फलंदाज लिटन दास याने कौटंबिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यामुळे त्याची रिप्लेसमेंट म्हणून कोलकात्याने वेस्ट इंडिजच्या जॉनसन चार्ल्स याला आपल्या संघात दाखल करून घेतले आहे. कोलकाता आणि आयपीएल यांनी ट्वीट करत लिटन दास याच्या रिप्लेसमेंटची माहिती दिली आहे.

कोण आहे जॉनसन चार्ल्स ?
चार्ल्स विकेटकिपर फलंदाज आहे. त्याने वेस्ट इंडिजकडून 41 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 971 धावा केल्या आहेत. चार्ल्स हा वेसट इंडिजच्या 2016 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्यदेखील होता. कोलकात्याने लिलावात चार्ल्स याला 50 लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. जॉनसन वेस्ट इंडीजसाठी 48 एकदिवसीय सामने खेळला आहे. यामध्ये त्याने दोन शतक आणि चार अर्धशतकासह 1283 धावा केल्या आहेत. चार्ल्स याने आतापर्यंत 224 टी20 सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने 5607 धावा केल्या आहेत.

कोलकाताच्या संघाची यंदाच्या सीझनमधील कामगिरी
2 वेळा चॅम्पियन राहिलेल्या कोलकात्याच्या संघाची यंदाच्या हंगामातील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. कोलकाताचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर हा दुखापतग्रस्त असल्याने नितीश राणा कोलकाताचे नेतृत्त्व करत आहे. नीतीश राणाच्या नेतृत्वात यंदाच्या सीझनमध्ये कोलकाताला 9 सामन्यत फक्त 3 विजय मिळवता आले आहेत.

Share This News

Related Post

Maharashtra Kesari 2023

Maharashtra Kesari 2023 : 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा; ‘या’ ठिकाणी रंगणार कुस्त्यांचे सामने

Posted by - September 25, 2023 0
पुणे : राज्यभरातील कुस्तीपटू आणि कुस्ती शौकिनांसाठी (Maharashtra Kesari 2023) एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य…
South Africa Team

World Cup 2023 : दक्षिण आफ्रिका संघाला लागली लॉटरी; थेट वनडे वर्ल्डकपसाठी ठरला पात्र

Posted by - May 10, 2023 0
मुंबई : दक्षिण आफ्रिका संघ यावर्षी भारतामध्ये खेळवल्या जाणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी (World Cup 2023) पात्र ठरला आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023…
Neeraj Chopra

Neeraj Chopra : वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय एथलिट

Posted by - August 28, 2023 0
भारताच्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. नीरजने (Neeraj Chopra) पहिला थ्रो फाऊल…
Shubman Gill

Shubman Gill :आयसीसी रँकिंग जाहीर! बाबर आझमला मागे टाकत शुभमन गिलने मिळवले अव्वल स्थान

Posted by - November 8, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा आश्वासक युवा सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) पाकिस्तानला मोठा धक्का देत आयसीसी एकदिवसीय…
Hardik Pandya

Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या अडचणीमध्ये वाढ! हेराफेरी प्रकरणात पोलिसांनी भावाला केली अटक

Posted by - April 11, 2024 0
मुंबई : आयपीएलचे सामने सुरु असतानाच मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मोठा धक्का बसलेला आहे. मुंबई पोलिसांनी क्रिकेटपटू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *