ऑलम्पिक क्रीडा प्रशिक्षणासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चा पुढाकार

1200 0

पुणे : ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला अधिकाधिक पदके मिळावीत यासाठी आता ‘पुनीत बालन ग्रुप’ने आणखी एक पाऊल टाकले आहे. ऑलम्पिक क्रीडा प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र हॉकी फेडरेशनसमवेत ‘पुनीत बालन ग्रुप’ने पाच वर्षांचा सहकार्य करार केला आहे. याअंतर्गत खेळाडूंना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन दिले जाणार आहे. ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी ही माहिती दिली.

क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून सातत्याने प्रोत्साहन दिले जाते. ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत अद्यापही भारताला आपला दबदबा निर्माण करता आलेला नाही. या स्पर्धेत अधिकाधिक पदके मिळावीत यासाठी विविध संघटना आणि फेडरेशन प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना आता ‘पुनीत बालन ग्रुप’नेही बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र हॉकी फेडरेशनकडून ऑलम्पिक क्रीडा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो. या प्रशिक्षणासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ पुढील पाच वर्षे आर्थिक सहकार्य करणार आहे. फेडरेशनचे अध्यक्ष व आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यात नुकताच याबाबत करार करण्यात आला. त्याअंतर्गत खेळाडूंना प्रशिक्षण, प्रोत्साहनपर उपक्रम आणि आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

दरम्यान ‘पुनीत बालन ग्रुप’कडून टेबल टेनिस, खो-खो, बॅडमिंटन, हॅडबॉल, क्रिकेट अशा विविध खेळांनाही प्रोत्साहन देणारे अनेक वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. अल्टीमेट खो-खो, टेनिस लीग, प्रीमिअर बॅडमिंटन लीग, हॅन्डबॉल लीग आणि महाराष्ट्र आयर्नमन संघ यांचे स्वामित्वही पुनीत बालन यांच्याकडे आहे.

भारत आता जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात आघाडी घेत आहे. क्रीडा क्षेत्रातही आघाडी घ्यावी आणि ऑलम्पिक स्पर्धेत अधिकाधिक पदे भारतीय खेळाडूंना मिळावीत यासाठी खेळाडूंना प्रशिक्षण मिळण्याची गरज आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकी खेळामध्येही राज्यातील खेळाडू चमकावेत यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ‘महाराष्ट्र हॉकी फेडरेशन’च्या माध्यमातून खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून आगामी काळात जास्तीत जास्त भारतीय खेळाडू ऑलम्पिकमध्ये पदके मिळवतील, अशी आशा आहे.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : सर्वसामान्यांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी मोदींनी प्रयत्न केले – ब्रजेश पाठक

Posted by - February 28, 2024 0
पुणे : आजवर सरकार दिल्ली आणि मुंबईतून चालायचे. परंतु योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचल्या की नाही हे कधी विचारले (Pune News) नाही.…

BIG NEWS : द सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना RBI ने केला रद्द

Posted by - October 10, 2022 0
पिंपरी चिंचवड : द सेवा विकास को ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेकडे पुरेसा भांडवल नसल्या कारणाने, द…
Crime

पुण्यात सराईत गुन्हेगाराचा दगडानं ठेचून खून

Posted by - April 14, 2022 0
येरवडा कारागृहातून नुकत्याच सुटलेल्या मोक्कातील गुन्हेगाराचा कोयता, पालघन व दगडाने ठेचून खून करण्यात आला.  या घटनेत त्याचा साथीदारही गंभीर जखमी…

इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे चूल पेटवा आंदोलन

Posted by - March 24, 2022 0
पुणे- केंद्र सरकार अन्यायकारक पद्धतीने करत असलेल्या इंधन व डिझेल दरवाढीच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बालगंधर्व चौकात चूल…

Saswad Municipality : इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी न पोहोचल्याने संबंधितांवर कारवाई करावी

Posted by - August 22, 2023 0
सासवड : सासवड नगरपालिकेच्या (Saswad Municipality) कार्यक्षेत्रात सोपान नगर रोड वर सकाळी ९वाजता एका इमारतीला आग लागली होती ही आग…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *