Rohit Sharma

Rohit Sharma : पुणे पोलिसांनी रोहित शर्माला ठोठावला दंड; ‘ती’ चूक पडली महागात

920 0

पुणे : भारताचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) पुणे पोलिसांनी दंड ठोठावल्याची घटना समोर आली आहे. मुंबई एक्स्प्रेस हायवेवर भरधाव वेगात गाडी चालवणे त्याचा अंगलट आले आहे. कर्णधार रोहित शर्माने एकाच दिवशी दोन वेळेस नियमांचा भंग करत भरधाव वेगात कार चालवल्याचे समोर आलं आहे. पुण्यात भारत विरुद्ध बांगलादेश हा क्रिकेट सामना असल्याने रोहित शर्मा मुंबईहुन पुण्याच्या दिशेने येत होता. त्यावेळी रोहित शर्माने भरधाव वेगाने गाडी चालवली. त्यावेळी भरधाव वेगात असलेली कार सीसीटीव्हीत कैद झाली. त्यामुळे रोहित शर्माला पुणे पोलिसांकडून दंड आकारण्यात आला आहे.

गहुंजे स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध खेळण्यासाठी मंगळवारी दुपारी मुंबईहून पुण्याला जात असताना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला दोन वेळा ओव्हरस्पीडिंग केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. महामार्ग पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रोहितच्या लॅम्बोर्गिनीने उरुसने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 105 किमी प्रतितास ही परवानगी असलेली वेग मर्यादा दोनदा ओलांडली. महामार्ग पोलिसांनी प्रत्येक उल्लंघनासाठी त्याला 4000 रुपये दंड ठोठावला आहे.

रोहित शर्मा याच्या कारने कामशेत बोगद्याजवळ दुपारी 2.54 वाजता पहिल्यांदा वेग मर्यादा ओलांडली. कामशेत बोगद्याजवळ वेग मर्यादा 105 किलोमीटर प्रतितास (किमी) आहे. पण इथे रोहित शर्माच्या गाडीचा वेग येथे 117 किमी प्रति तास होता. काही वेळाने सोमाटणे फाट्याजवळ पुन्हा वेगमर्यादा ओलांडून 111 किमी प्रतितास इतकी झाली होती.

Share This News

Related Post

Chandrakant Patil

Chandrakant Patil : कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करणे हे कर्तव्य! – चंद्रकांत पाटील

Posted by - December 25, 2023 0
पुणे : पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते काम करत असतात. त्यामुळे कोथरूड मधील प्रत्येक…
Pune News

Pune News : बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावे-हर्षदा फरांदे

Posted by - December 4, 2023 0
पुणे : पुणे (Pune News) शहारामध्ये मोठ्या संख्येने महिला गृहिणी बचतगटाच्या माध्यमातून विविध वस्तूंचे उत्पादन व विक्री करतात व त्यातून…
PMPML

PMPML Strike : पीएमपीच्या खासगी ठेकेदाराच्या चालकांनी पुकारलेला संप अखेर मागे

Posted by - August 28, 2023 0
पुणे : पगार वाढीच्या कारणास्तव पीएमपीएमएलच्या खासगी ठेकेदारांच्या चालकांनी संप (PMPML Strike) पुकारला होता. या संपामुळे (PMPML Strike) प्रवाशांचे मोठ्या…
Ajit Pawar Speech

Ajit Pawar : मला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा; अजित पवारांचे कार्यकर्ता मेळाव्यात मोठं विधान

Posted by - June 21, 2023 0
पुणे : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचे तयारी दर्शवली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *