Team India

India VS Ireland Series : आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात महाराष्ट्राच्या ‘या’ दोन खेळाडूंना मिळाली संधी

663 0

आज टीम इंडिया आणि आयर्लंड (India VS Ireland Series) यांच्यात पहिला टी-20 सामना खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यात (India VS Ireland Series) अनेक नव्या दमाच्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात येणार आहे. आयर्लंड विरुद्धच्या संघात महाराष्ट्राचा मराठमोळा स्टार क्रिकेटर ऋतुराज गायकवाड खेळताना दिसणार आहे. पण, ऋतुराज गायकवाडसोबतच आणखी एक महाराष्ट्राचा शिलेदार खेळताना दिसणार आहे. या खेळाडूचे नाव आहे जितेश शर्मा.आपल्या दमदार खेळीनं आयपीएल गाजवणारा जितेश शर्मा आजच्या सामन्यातून आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात पदार्पण करणार आहे.

कोण आहे जितेश शर्मा?
जितेश शर्माचा जन्म 22 ऑक्टोबर 1993 रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथील आहे. देशांतर्गत क्रिकेटपटू खेळाडू आहे. त्याने 2014 मध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. 29 वर्षीय जितेश देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रामुख्याने विदर्भ संघासाठी खेळतो. सध्या आयपीएल 2023 मध्ये तो पंजाब संघाचा भाग आहे. विदर्भातील यष्टीरक्षक आणि फलंदाज जितेश शर्माने 54 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने 141.83 च्या स्ट्राइक रेटने 1329 धावा केल्या आहेत. पंजाब किंग्स संघाने 20 लाख रुपयांना विकत घेतलं. यापूर्वी, जानेवारी 2023 मध्ये जितेश शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या भारताच्या टी20I संघात जखमी संजू सॅमसनची जागा घेतली होती. जितेश उत्तम विकेटकिपींगसोबत जबरदस्त फिनिशिंगसुद्धा करतो.

कधी सुरु होणार सामना ?
टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना आज, 18 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता डब्लिन या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. जसप्रीत बुमराह आजपासून आयर्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद भूषवणार आहे. कित्येत महिन्यांनी बुमराहला मैदानात खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

आयर्लंड सीरिजसाठी टीम इंडिया
जसप्रीत बुमराह (कर्णधार), रिंकू सिंह, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, यशस्वी जैस्वाल, शाहबाज अहमद, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), अर्शदीप सिंह, आवेश खान, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा, रवी बिश्नोई.

Share This News

Related Post

Virat Kohli - Rohit Sharma

Virat Kohli – Rohit Sharma : रोहित-विराटचा जलवा; पाकिस्तान विरोधात 2 धावा करताच नावावर होणार ‘हा’ विक्रम

Posted by - September 9, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli – Rohit Sharma) या जोडीने वनडेमध्ये अक्षरशः आपला…

बॉलिवूड तारे-तारका, पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्या उपस्थितीत होणार आयपीएलची सांगता

Posted by - May 27, 2022 0
अहमदाबाद- आयपीएल 2022 चा अंतिम सामना हमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअवर 29 मे रोजी होणार असून या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी…
Amit Shah

Amit Shah : भारत-म्यानमार सीमेवरील मुक्तसंचार बंद; गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा

Posted by - January 20, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – म्यानमार सीमा अधिक सुरक्षित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने (Amit Shah) घेतला आहे. म्यानमारच्या सीमेवर आता…
ICC ODI World Cup Timetable

ICC ODI World Cup Timetable : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार भारत पाकिस्तान महामुकाबला

Posted by - June 27, 2023 0
मुंबई : क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक (ICC ODI…
rishabh pant

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सला बसला मोठा धक्का; ‘या’ खेळाडूवर बीसीसीआयने केली कारवाई

Posted by - May 11, 2024 0
दिल्ली : आयपीएल 2024 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढल्या असून दिल्ली संघाचा कर्णधार ऋषभ पंतच्या स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *