T-20 WorldCup 2024

T-20 WorldCup 2024 : हार्दिक पांड्याला पर्याय म्हणून ‘या’ खेळाडूचा टी20 वर्ल्ड कपसाठी दावा; ईशान, श्रेयसची जागाही धोक्यात

908 0

मुंबई : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन टी20 सामन्यांची मालिका (T-20 WorldCup 2024) खेळवली जात आहे. यातले पहिले दोन सामने जिंकत टीम इंडियाने मालिका जिंकली आहे. टीम इंडियाच्या या दोन्ही विजयात अष्टपैलू शिवम दुबेने महत्त्वाची भूमिका बजावली. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात शिवमने दोन षटकात केवळ 9 धावादेत 1 विकेट घेतली. तर फलंदाजी करताने त्याने 40 चेंडूत 60 धावा ठोकल्या. इंदोर टी20 सामन्यातही त्याने एक विकेट घेतली. या सामन्यात त्याने अवघ्या 32 चेंडूत 63 धावा केल्या. सलग दोन सामन्यात केलेल्या शानदार खेळीने शिवम दुबेने टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियात आपला दावा मजबूत केला आहे.

हार्दिक पांड्याला पर्याय
शिवम दुबेकडे हार्दिक पांड्याचा पर्याया म्हणून पाहिले जात आहे. शिवम मध्यगती गोलंदाजी करतो. तर मधल्या फळीत तो आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात अर्धशतकी खेळी करत त्याने निवड समितीचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामातही शिवमची कामगिरी अशीच सुरु राहिली तर त्याचं टी20 विश्वचषक खेळणं जवळपास निश्चित मानलं जात आहे. शिवम दुबेच्या एन्ट्रीने ईशान किशन, तिलक वर्मा आणि श्रेयस अय्यरचं संघातील स्थान मात्र धोक्यात येऊ शकतं.

शिवमने टीम इंडियासाठी 20 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळला असून यात त्याने 275 धावा केल्या आहेत. तीन अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. तर गेल्या चार वर्षात शिवम केवळ एक एकदिवसीय सामना खेळला असून यात त्याने केवळ 9 धावा केल्या आहेत. मात्र त्याचा सध्याचा फॉर्म बघता तो टी20 विश्वचषकासाठी मोठा दावेदार मानला जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याची टाईमलाईन ठरली!

Rashmi Thackeray : रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्त्री शक्ती संवाद यात्रे’चं आयोजन

Ramdas Athawale : अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली; रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य

FASTag : 31 जानेवारीच्या अगोदर करून घ्या ‘हे’ काम अन्यथा तुमच्या कारचा FASTag होणार बंद

Suicide : प्रेम प्रकरणातून तरुणीने फ्लायओव्हरवरून थेट पाण्यात मारली उडी; Video व्हायरल

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्या प्रकरणी विठ्ठल शेलारला अटक ! हा विठ्ठल शेलार नेमका आहे तरी कोण?

Munnawar Rana : लोकप्रिय शायर मुन्नावर राणा यांचं निधन

Uddhav Thackeray : ‘उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर मोठं कांड होणार आहे’; अज्ञात व्यक्तीने केला नियंत्रण कक्षाला फोन

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी 11 जणांना घेतलं ताब्यात

Share This News

Related Post

WTC Final

WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पनशीपमध्ये के. एल. राहुलच्या जागी मुंबईच्या ‘या’ खेळाडूला देण्यात आली संधी

Posted by - May 8, 2023 0
मुंबई : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम (WTC Final) सामना 7 जून, 2023 रोजी लंडनच्या…
Love Jihad

Love Jihad : वांद्रे टर्मिनस येथे लव्ह जिहादच्या आरोपाखाली तरुणाला मारहाण

Posted by - August 16, 2023 0
मुंबई : वांद्रे टर्मिनस येथे तरुणीसोबत बाहेर गेलेल्या तरुणाला लव्ह जिहादच्या (Love Jihad) आरोपाखाली मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा…
eknath shinde

Cabinet Meeting : दिवाळीनंतर पार पडलेल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय

Posted by - November 17, 2023 0
मुंबई : आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला…
Bajarang Punia

Bajrang Punia : बजरंग पुनियाचे निलंबन; उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्याने केली कारवाई

Posted by - May 10, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजक संस्थेकडून (नाडा) केलेल्या तात्पुरत्या निलंबनाच्या कारवाईपुढे एक पाऊल…
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची ‘महापत्रकार परिषद’

Posted by - January 16, 2024 0
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (Uddhav Thackeray) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *