Dutee Chand Banned

Dutee Chand Banned : भारतीय महिला धावपटू दुती चंदवर डोपिंग प्रकरणी 4 वर्षांची बंदी

1017 0

मुंबई : भारताची स्टार महिला धावपटू दुती चंद (Dutee Chand Banned)ला मोठा धक्का बसला आहे. ती डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळली आहे. प्रतिबंधित पदार्थांच्या सेवनामुळे तिच्यावर चार वर्ष निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दुतीच्या डोपिंग टेस्टमध्ये सिलेक्टिव एंड्रोजन रिसेप्टर मॉड्यूलेटर हा प्रतिबंधित पदार्थ आढळला होता. त्यानंतर तिचं तात्पुरतं निलंबन करण्यात आलं होतं. आता तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

भारतीय महिला धावपटू दुती चंदला मोठा झटका
दुती चंदने आशियाई स्पर्धेमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. दुतीने 2021 साली ग्रां प्रीमध्ये 100 मीटर स्पर्धा 11.17 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम रचला होता. आता तिच्यावर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय अ‍ॅथलीट दुती चंदवरील बंदी जानेवारी 2023 पासून ग्राह्य धरली जाणार आहे. दुतीच्या पहिल्या नमुन्यात अँडारिन, ऑस्टारिन आणि लिंगंड्रोल आढळले आहेत. दुसऱ्या नमुन्यात अँडारिन आणि ऑस्टारिन हे प्रतिबंधित पदार्थ आढळून आले.

दुती चंदला जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक
दुती चंद ही भारतातील स्टार महिला धावपटूंपैकी एक आहे. दुती चंद ही जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला धावपटू आहे. तिने आशियाई गेम्समध्ये 2018 मध्ये 100 मीटर आणि 200 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे.

जानेवारी 2023 पासून चार वर्षांची बंदी
नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने या वर्षी जानेवारीमध्ये दुतीला निलंबित केलं होतं. यामुळे ती आतापर्यंतच्या सर्व स्पर्धांमधून बाहेर पडली होती. 5 डिसेंबर 2022 रोजी भुवनेश्वरमध्ये दुतीची चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये दुती पॉझिटिव्ह आली होती. जानेवारी 2023 मध्ये दुती चंदवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

Share This News

Related Post

Mumbai Crime News

Mumbai Crime News : खाकीला काळिमा ! ATS अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

Posted by - October 14, 2023 0
मुंबई : ज्याच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, नागरिकांची सुरक्षा करणे, त्यांच्यासाठी सुरक्षीत वातावरण तयार करण्याची जबाबदारी आहे, अशा…
Sarfaraz Khan And Dhruv Jurel

BCCI : आयपीएलआधी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लागली लॉटरी; BCCI ने दिले ‘हे’ मोठे गिफ्ट

Posted by - March 19, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामाला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर…

बीडमध्ये डोळ्यादेखत कोसळली चार मजली इमारत, वेळीच बाहेर पडल्याने वाचले रहिवाशांचे प्राण (व्हिडिओ)

Posted by - June 8, 2022 0
बीड- बीड शहरात चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या इमारतीमधील रहिवाशांना वेळीच बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ…

पंजाबमध्ये ‘आप’ चा विजय ऐतिहासिक – संजय राऊत

Posted by - March 10, 2022 0
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर येऊ लागले असून पंजाब मध्ये आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत…

ई-वाहन चालकांसाठी खुशखबर! पुण्यात 7 ठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन

Posted by - January 22, 2023 0
पीएमपीएमएल प्रशासन आता नागरिकांसाठी ई-चार्जिंग स्टेशन उभारत आहे. अदानी टोटल गॅस लिमिटेड च्या मदतीनं पुण्यात सात ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *