Cricket News

Cricket News : भारताच्या ‘या’ 33 वर्षीय खेळाडूने अचानक घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

528 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी विश्वचषक 2023 मनोरंजक टप्प्यात येऊन ठेपला आहे. या स्पर्धेत (Cricket News) भारत अजूनही अपराजित आहे. मात्र यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये भारताच्या स्टार अष्टपैलू खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हा स्टार अष्टपैलू खेळाडू केवळ 33 वर्षांचा असूनही त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे.

कोणी जाहीर केली निवृत्ती?
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू गुरकीरत सिंग मान याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गुरकीरतने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो पहिला आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. गुरकीरतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण ३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. 2011 मध्ये सीके नायडू ट्रॉफीमध्ये त्याने आपल्या चमकदार कामगिरीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर त्याने 2015-16 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि द्विशतकही झळकावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी कसोटी संघातही स्थान देण्यात आले होते, परंतु त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नव्हती. गुरकीरत आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. त्याने एवढ्या लवकर निवृत्ती का जाहीर केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

काय लिहिली पोस्ट?
‘आज माझ्या अविश्वसनीय क्रिकेट प्रवासाचा शेवटचा दिवस आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणे हा सन्मान आणि सौभाग्याची गोष्ट आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल मी माझे कुटुंब, मित्र, प्रशिक्षक आणि सहकारी खेळाडूंचे आभार मानतो. माझ्या कारकिर्दीत तुम्ही सर्वांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. असे गुरकीरतने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Rohit Sharma

Ind Vs Eng 3rd Test : रोहित शर्माकडून कॅप्टन्सी पारी; राजकोटमध्ये ठोकलं टेस्टमधील 11 वं शतकं

Posted by - February 15, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकोटमध्ये आज भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा टेस्ट (Ind Vs Eng 3rd Test) सामना खेळवण्यात…
Ravindra Jadeja

Ravindra Jadeja : अखेर जडेजा बनला क्रिकेटचा ‘थालापथी’; CSK ने केली मोठी घोषणा

Posted by - April 9, 2024 0
चेन्नई सुपर किंग्स कडून इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 22 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला. एमए…
Wrestlers-Protest

कुस्तीपटूंच्या आंदोलनातून साक्षी मलिकची माघार; नोकरीत पुन्हा रुजू

Posted by - June 5, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली सर्व कुस्तीपटूंनी कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *