Ind Vs WI 3Rd ODI

Ind vs WI 3rd ODI: रोहित-विराट करणार कमबॅक; प्लेईंग 11 मधून ‘या’ खेळाडूंना मिळणार डच्चू

539 0

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये (Ind vs WI 3rd ODI) सध्या वनडे सिरीज सुरु असून उद्या सिरीजमधील (Ind vs WI 3rd ODI) तिसरा आणि निर्णायक सामना खेळवण्यात येणार आहे. सध्या या मालिकेत दोन्ही संघानी 1-1 सामना जिंकले आहेत. दुसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली होती. यामुळे टीम इंडियाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता सिरीज जिंकण्यासाठी निर्णायक सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली कमबॅक करणार हे निश्चित मानले जात आहे.

वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडिया काही नवीन प्रयोग करताना दिसत आहे. टीम इंडियात इशान किशनकडे विकेटकीपिंगची जबाबदारी देण्यात येईल. वेस्ट इंडिजविरूद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये इशानने चांगली कामगिरी करत अर्धशतके झळकावली आहेत. पहिल्या सामन्यात 52 आणि दुसऱ्या सामन्यात 55 रन्स केलेत. दरम्यान स्वतःचं स्थान तयार करण्यासाठी सूर्यकुमार यादवला आणखी एक संधी दिली जाऊ शकते. हार्दिक पांड्याला सहाव्या क्रमांकावर खेळवले जाऊ शकते.

‘या’ खेळाडूंना मिळणार डच्चू?
दुसऱ्या वनडे सामन्यात (Ind vs WI 3rd ODI) अखेर संजू सॅमसनला संधी देण्यात आली होती. मात्र त्याला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. या सोबत अक्षर पटेल आणि उमरान मलिक यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. टीम इंडियाकडे या दौऱ्यावर अनुभवी वेगवान गोलंदाजीची कमतरता आहे. शार्दुलने दोन्ही सामन्यात चांगली गोलंदाजी केली आहे. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाकडे स्पिनिंगची जबाबदारी असणार आहे.

तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, शार्दुल ठाकुर

Share This News

Related Post

World Cup 2023

World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; कोणाला मिळाली संधी तर कोणाला डच्चू?

Posted by - September 5, 2023 0
मुंबई : बीसीसीआय निवड समितीने आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.…

भारतीय संस्कृतीच्या इतिहासात काश्मीरचे योगदान अतुलनीय – पुनीत बालन

Posted by - November 4, 2022 0
पुणे: पुण्यातील ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने व भारतीय लष्कर यांच्यावतीने काश्मीर खोऱ्यातील दिव्यांग मुलांसाठी स्थापन केलेल्या ‘डॅगर परिवार स्कुल’चा पहिला वर्धापन…
Shivraj Rakshe

Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे ठरला डबल ‘महाराष्ट्र केसरी’

Posted by - November 20, 2023 0
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari 2023)…
Team India

IND vs BAN : बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची कशी असेल प्लेईंग 11?

Posted by - October 19, 2023 0
पुणे : आयसीसी वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील 17 वी मॅच भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये (IND vs BAN) गुरुवारी,…
Ben Stokes

बेन स्टोक्सने टेस्टमध्ये रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कॅप्टन

Posted by - June 4, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंड (England) आणि आयर्लंड (Ireland) या दोन संघातील एकमेव कसोटी सामना शनिवारी पार पडला. हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *