IND vs WI 2nd Test

IND vs WI 2nd Test : विराट कोहलीने मोडला रिकी पाँटिंग आणि जॅक कॅलिस ‘तो’ विक्रम

800 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – त्रिनिदाद या ठिकाणी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी (IND vs WI 2nd Test) सामना खेळवला जात आहे. हा सामना विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 500 वा सामना आहे. या सामन्यात (IND vs WI 2nd Test) पहिल्या डावात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद 87 धावा केल्या आहेत. या खेळीसह, कोहलीने जॅक कॅलिस आणि रिकी पाँटिंग या दोन दिग्गजांना मागे टाकत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Asia Cup Time Table : आशियाकपचे वेळापत्रक जाहीर ! ‘या’ दिवशी होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला

काय आहे तो विक्रम?
विराट कोहली आपल्या 500 ​​व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. कोहलीने 97 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 5 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी जॅक कॅलिस पाचव्या स्थानावर होता. आता त्याची 6 व्या स्थानी घसरण झाली आहे. जॅक कॅलिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25,534 धावा केल्या आहेत. पण आता विराट कोहलीच्या आता 25,548 धावा झाल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप-6 फलंदाज
सचिन तेंडुलकर – 34357 धावा
कुमार संगकारा – 28016 धावा
रिकी पाँटिंग – 27483 धावा
महेला जयवर्धने – 25957धावा
विराट कोहली – 25548 धावा
जॅक कॅलिस – 25534 धावा

रिकी पाँटिंगला टाकले मागे
घराबाहेर सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली आता 4थ्या स्थानी पोहोचला आहे. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 87 धावांच्या खेळीनंतर कोहलीच्या आता 14,376 धावा झाल्या आहेत, तर रिकी पाँटिंगने 14,366 धावा केल्या आहेत.

विदेशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारे टॉप- 5 फलंदाज
सचिन तेंडुलकर – 20165 धावा
कुमार संगकारा – 15973 धावा
राहुल द्रविड – 15204धावा
विराट कोहली – 14376 धावा
रिकी पाँटिंग – 14366 धावा

Share This News

Related Post

Aaron Jones

Aaron Jones : वर्ल्डकपमध्ये अमेरिकेला एकहाती विजय मिळवून देणारा ॲरॉन जोन्स नेमका आहे कोण?

Posted by - June 2, 2024 0
अमेरिका : आजपासून टी – 20 वर्ल्डकपच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात आज सकाळी सलामीचा सामना पार…
Virat Kohli

विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला क्रिकेटपटू

Posted by - May 14, 2023 0
जयपूर : यंदाच्या आयपीएलमधील (IPL) 60 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात पार पडत आहे. हा…
Rohit Sharma

IND vs NED : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने केला ‘हा’ मोठा विक्रम

Posted by - November 12, 2023 0
बंगळुरू : आज वर्ल्ड कप 2023 मध्ये साखळी फेरीतील भारताचा अखेरचा सामना नेदरलँडविरुद्ध (IND vs NED) खेळवला जात आहे. भारताने…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इनडोअर हॉल आणि सिंथेटीक ट्रॅकचे उद्घाटन

Posted by - June 5, 2022 0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी आणि जलतरण तलावासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *