Mukesh Kumar

IND vs WI 1st T20: मुकेश कुमारने रचला इतिहास ! ‘हा’ कारनामा करणारा ठरला भारताचा दुसरा खेळाडू

1391 0

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना (IND vs WI 1st T20) काल पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर निसटता विजय मिळवला. या विजयासह वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी (IND vs WI 1st T20) घेतली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 149 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला फक्त 145 धावा करता आल्या. या सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी मुकेश कुमारने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. असा कारनामा करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

काय आहे तो विक्रम?
त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाकडून दोन खेळाडूंनी पदार्पण केले. या सामन्यात मुकेश कुमार आणि तिलक वर्मा यांना पदार्पणाची कॅप मिळली. या सामन्यापूर्वी (IND vs WI 1st T20) भारताची टी-20 कॅप मिळवून, वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने एक विक्रम केला, जो त्याच्या आधीच फक्त एका भारतीय क्रिकेटरच्या नावावर होता. आता तो दोघांच्या नावावर झाला आहे.

मुकेश कुमारने एकाच दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि नंतर टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा मुकेश हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. हा कारनामा यॉर्कर स्पेशालिस्ट टी नटराजनने केला होता. त्याने 2020-21 मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या पहिल्या टी-20 सामन्यात 3 षटके गोलंदाजी करताना 24 धावा दिल्या.

Share This News

Related Post

Ajit Agarkar

Ajit Agarkar : भारतीय क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदी अजित आगरकरची नियुक्ती

Posted by - July 4, 2023 0
मुंबई : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर (Ajit Agarkar) याची भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी निवड झाली आहे.…
Aniket Pote

Aniket Pote : अल्टीमेट खो-खो सीझन 2 मध्ये मुंबई खिलाडी संघाच्या कर्णधारपदी अनिकेत पोटे याची निवड

Posted by - December 19, 2023 0
भुवनेश्वर : मुंबई खिलाडी संघाने अल्टीमेट खो-खो सीझन 2 साठी संघाच्या कर्णधारपदी अनिकेत पोटे (Aniket Pote) याच्या नावाची घोषणा केली…

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! पुण्यात रंगणार भारत-श्रीलंका ट्वेन्टी 20 सामना

Posted by - December 27, 2022 0
पुणे : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात पुढील वर्षी 5 जानेवारीला गहूंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर…
Mallikarjun Kharge

Mallikarjun Kharge : विरोधी पक्षांच्या महाआघाडीचं नाव ठरलं ! INDIA नावानं लढणार, मल्लिकार्जून खरगेंची मोठी घोषणा

Posted by - July 18, 2023 0
बंगळुरु : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांनी आज बंगळुरुतील विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर एक मोठी घोषणा केली आहे. विरोधी…
Wanindu Hasaranga

Wanindu Hasaranga : श्रीलंका संघाला मोठा धक्का! वानिंदू हसरंगाची अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती

Posted by - August 15, 2023 0
श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने स्वतः श्रीलंका क्रिकेट बोर्डाला याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *