IND vs SA

IND vs SA: पहिल्या वनडेमध्ये ‘हा’ खेळाडू करू शकतो डेब्यू; कशी असेल भारताची प्लेईंग 11

478 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (IND vs SA) आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-20 सिरीज बरोबरीत सुटली असून आजपासून वनडे सिरीजला सुरुवात होणार आहे. के. एल राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. यावेळी तीन सामन्यांच्या या वनडे सिरीजमधील पहिला सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया पूर्ण प्रयत्न करणार असून आजच्या सामन्यासाठी प्लेईंग 11 कशी असणार आहे याबद्दल जाणून घेऊया…

केएल राहुलच्या नेतृत्वाखाली ही टीम टी-20 पेक्षा वेगळी असणार आहे. या टीममध्ये काही नवीन चेहरे पाहायला मिळू शकतात. यामध्ये साई सुदर्शन, रजत पाटीदार यांना संधी मिळू शकते. रवींद्र जडेजा, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि मोहम्मद सिराज यांना वनडे संघात संधी देण्यात आलेली नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या वनडेमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजीत अनुभवाची कमतरता आहे. यावेळी गोलंदाजीमध्ये टीमला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार यांच्यावर असणार आहे. तसेच इंडियन प्रिमीयर लीग आणि T20 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंगला यावेळी वनडेमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळू शकते.

कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11
केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड़, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, अवेश खान, अर्शदीप सिंह

कशी असणारे दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग 11
एडेन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, नांद्रे बर्गर, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज़ शम्सी, रासी वैन डेर डुसेन, लिज़ाद विलियम्स

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sajjan Jindal: JSW समूहाचे एमडी सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप

Nagpur News : नागपुरमधील सोलर कंपनीत भीषण स्फोट; 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

Parbhani News : देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; 3 भाविकांचा मृत्यू

Accident News : भरधाव ट्रक दुकानांत घुसल्याने भीषण अपघात; 3 ठार

Share This News

Related Post

Asian Games 2023

Asian Games 2023 : ठाण्याच्या रुद्रांश पाटीलने केला वर्ल्ड रेकॉर्ड; एअर रायफलमध्ये जिंकलं गोल्ड मेडल

Posted by - September 25, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आशियाई क्रीडा स्पर्धेचा (Asian Games 2023) आज दुसरा दिवस आहे. आज सकाळच्या सुमारास भारतासाठी एक…
Virat Kohli

Virat Kohli : कोहलीने घेतली ‘विराट’ झेप आयसीसीकडून एकदिवसीय क्रमवारी जाहीर

Posted by - November 22, 2023 0
मुंबई : आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे टीम इंडियाचे (Virat Kohli)  तिसऱ्यांदा विश्वचषकावर…

थांग-ता, गतका क्रीडा प्रकारातही महाराष्ट्र अव्वल;शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी येथे जोरदार सराव शिबिर सुरू

Posted by - May 23, 2022 0
हरियाणा येथे होणाऱ्या चौथ्या खेलो इंडिया गेम्ससाठी महाराष्ट्राच्या गतका आणि थांग ता या क्रीडा प्रकारातील संघाचा सराव सुरू आहे. येथील…
Rahul Dravid

Rahul Dravid : राहुल द्रविडनंतर कोण असेल टीम इंडियाचा हेड कोच? ‘ही’ 3 नावे आहेत चर्चेत

Posted by - May 10, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल द्रविड यांच्यानंतर (Rahul Dravid) नवीन मुख्य प्रशिक्षकाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *