IND Vs AUS

Ind Vs Aus : मेगाफायनलला पावसाने घोळ घातल्यास विजेता कोण होणार? ICC चा नियम काय सांगतो?

713 0

मुंबई : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यातील फायनलची सगळे क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. उद्या रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यात अंतिम सामना होणार आहे. तब्बल 20 वर्षांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा फायनलचा सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यादरम्यान जर पाऊस पडला तर कोणता संघ विजयी होईल? असा प्रश्न बऱ्याच क्रिकेटप्रेमींना पडला असेल. चला तर मग आज या बद्दल जाणून घेऊया…

सामन्यात पाऊस पडला तर काय होईल?
रविवारी हवामान स्वच्छ राहील. पण पाऊस पडला तर? असा प्रश्न मनात येऊ शकतो. पावसामुळे सामना पूर्णपणे वाहून गेला तर तो राखीव दिवशी खेळवला जाईल. आयसीसीने फायनलसाठी राखीव दिवस ठेवला आहे. जेव्हा सामना 20-20 षटकांचा खेळला जाऊ शकत नाही तेव्हा राखीव दिवस लागू केला जातो. आणि राखीव दिवशीही पाऊस पडला आणि सामना पूर्णपणे वाहून गेला, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाते. विशेष म्हणजे विश्वचषकाच्या 48 वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत एकही अंतिम सामना राखीव दिवशी खेळवला गेलेला नाही.

रविवारी अहमदाबादमध्ये हवामान कसे असेल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबाद येथे होणार आहे. रविवारी अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता नाही. हवामान खात्यानुसार रविवारी हलका सूर्यप्रकाश असेल. दिवसाचे कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहील.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News: पुण्यात नामदेव जाधवांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळ फासलं

Junnar Accident : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा जुन्नरमध्ये भीषण अपघात

Caste Certificate : 45 दिवसांत मिळेल जात प्रमाणपत्र; ‘या’ कागदपत्रांसह करा अर्ज

Share This News

Related Post

Anil Parab

Anil Parab : पालिका अधिकारी मारहाण प्रकरणी अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल

Posted by - June 28, 2023 0
मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वांद्रे येथील शाखेचे पाडकाम कारवाईत मुंबई महापालिकेचे सहायक अभियंता अजय पाटील हे सहभागी होते.त्यामुळे…
IPL

गुजरात-चेन्नई सामन्यापूर्वी पोलीसांनी केला बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश

Posted by - May 23, 2023 0
नवी दिल्ली : आयपीएल 2023 (IPL 2023) सध्या एका रंगतदार वळणावर येऊन ठेपले आहे. यंदाच्या सीझनमध्ये चेन्नई, गुजरात, लखनऊ आणि…
Pune News

Pune News : पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून सुरुवात

Posted by - February 27, 2024 0
पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांंच्या संघांचा समावेश असलेल्या…
Loksabha News

Loksabha News : लोकसभेत घुसण्यापूर्वी सागरने इंस्टाग्रामला शेअर केलेली ‘ती’ पोस्ट व्हायरल

Posted by - December 14, 2023 0
मुंबई : संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला 22 वर्षं पूर्ण होत असतानाच बुधवारी दोन तरुणांनी लोकसभेत (Loksabha News) उड्या मारल्याने एकच खळबळ…
B.Sai Praneeth

B.Sai Praneeth : वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटनपटू बी साई प्रणीतची तडकाफडकी निवृत्ती

Posted by - March 5, 2024 0
मुंबई : क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड चॅम्पियन मेडलिस्ट खेळाडू बी साई प्रणीतने (B. Sai Praneeth)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *