Rishabh Pant

Rishabh Pant : ऋषभ पंतचा जलवा कायम ! न खेळताही रोहित अन् विराटला टाकले मागे

788 0

मुंबई : टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. मागच्या वर्षी 30 डिसेंबर रोजी त्याचा अपघात झाला होता. या अपघातातून तो (Rishabh Pant) थोडक्यात बचावला होता. मात्र तो गंभीर जखमी झाला होता. आता तो बऱ्यापैकी बरा झाला असून सध्या एनसीएमध्ये आहे. तो लवकरच टीम इंडियात पुनरागमन करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Asia Cup 2023 : भारतीय संघ जाहीर; आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

ऋषभ पंतने शेवटचा कसोटी सामना डिसेंबरमध्येच खेळला होता, जेव्हा भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. यानंतर त्याचा अपघात झाला होता. या अपघाताला आता सात महिने झाले आहेत. या कालावधीत त्याने एकही सामना खेळला नाही. तरीदेखील ऋषभ पंतचा जलवा कायम आहे. नुकतीच आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये तो 10 व्या स्थानी आहे. विशेष म्हणजे अव्वल 10 मध्ये ऋषभ पंत सोडला तर एकही भारतीय नाही आहे.

Prithvi Shaw : पृथ्वी शॉचा मोठा निर्णय ! ‘या’ संघाकडून खेळणार क्रिकेट

या क्रमवारीत केन विल्यमसन आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant)  758 रेटिंगसह 10 व्या स्थानी आहे तर रोहित शर्मा 729 रेटिंगसह 12व्या आणि विराट कोहली 700 रेटिंगसह 14व्या क्रमांकावर आहे. आता टीम इंडिया 12 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी खेळणार आहे. ज्यामध्ये ऋषभ पंत नसला तरी विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे या कसोटीमध्ये दमदार कामगिरी करून रोहित आणि विराट ऋषभ पंतला मागे टाकू शकतात.

Share This News

Related Post

Babar Azam

Babar Azam : बाबर आझमने विराट, धोनी आणि गांगुलीला मागे टाकत केला ‘हा’ मोठा विक्रम

Posted by - September 7, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सध्या आपल्या खेळीच्या जोरावर अनेक विक्रम आपल्या…
IPL

IPL 2024 : IPL चे सामने आता अधिक रोमांचक होणार; BCCI लीगमध्ये करणार ‘हा’ मोठा बदल

Posted by - March 18, 2024 0
मुंबई : येत्या 22 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीगला (IPL 2024) सुरुवात होणार आहे. आयपीएलचा हा हंगामा सलग दोन महिने सुरु…
MI vs RCB

MI vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामन्यापूर्वी मुंबईने संघात केला ‘हा’ बदल

Posted by - April 11, 2024 0
मुंबई : आज आयपीएल 2024 मधील 25 व्या सामनात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना…

डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशनच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांची निवड

Posted by - November 23, 2022 0
पुणे : माजी नगरसेवक, भाजपा प्रवक्ते आणि उपाध्यक्ष धनंजय विष्णू जाधव यांची डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशनच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *