Rohit Sharma

ICC Ranking : आयसीसी ODI क्रमवारीत रोहित शर्माने घेतली मोठी झेप; बाबर आझमचे स्थान धोक्यात?

691 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात सुरु असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (ICC Ranking) टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तीन सामन्यात रोहितने 217 धावा केल्या आहेत. सध्या तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्या या कामगिरीचा त्याला फायदा झाला आहे. रोहित शर्माने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. 10 ऑक्टोबरला जारी केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत रोहित शर्मा 11 व्या स्थानावर होता. पण आता ताज्या क्रमवारीनुसार रोहित शर्माने पाच स्थानांची झेप घेतली आहे. आयसीसीने जारी केलेल्या ताज्या क्रमवारीत रोहित शर्मा थेट सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत टॉप 10 मध्ये भारताचे तीन फलंदाज आहेत. टीम इंडियाचा सलामीचा युवा फलंदाज शुभमन गिल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर रोहित शर्मा सहाव्या स्थानावर आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली नवव्या स्थानावर आहे. याशिवाय आयसीसी कसोटी क्रमवारीत टॉप टेनमध्ये रोहित शर्मा हा एकमेव भारतीय फलंदाज आहे.

आयसीसी क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानावर आहे. बाबर आझमच्या नावावर 836 पॉईंट जमा आहेत. या विश्वचषकात बाबर आझमला अद्याप सुर गवसलेला नाही. बाबर आझम 836 पॉईंटसह अव्वल स्थानी आहे तर 818 पॉईंटसह शुभमन गिल दुसऱ्या स्थानावर आहे. क्विंटन डिकॉक तिसऱ्या, रासी वेन डेर डूसेने चौथ्या, तर हॅरी टेक्टर पाचव्या स्थानावर आहे. रोहित शर्मा 719 पॉईंटसह सहाव्या क्रमांवर आहे. तर विराट कोहली 711 पॉईंटसह नवव्या स्थानावर आहे. सध्या रोहित शर्माचा फॉर्म बघता बाबर आझमची अव्वल स्थानावरून घसरण होण्याची शक्यता आहे. आपलं अव्वल स्थान कायम राखण्यासाठी बाबर आझमला चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

Share This News

Related Post

Sakshi Malik Retirement

Sakshi Malik Retirement : ऑलिंपिक पदक विजेत्या साक्षी मालिकची कुस्तीमधून निवृत्ती

Posted by - December 22, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण शरण सिंह…
Ranji Trophy

Ranji Trophy : धोनीच्या ‘या’ हुकमी एक्क्याने 11 व्या नंबरवर फलंदाजीला येऊन ठोकले शतक

Posted by - February 27, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तनुष कोटियन आणि तुषार देशपांडे यांनी रणजी स्पर्धेत (Ranji Trophy) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मुबईकडून…
Virat Kohli

Virat Kohli : ‘जे’ कोणालाच नाही ‘ते’ विराटने करून दाखवलं ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला क्रिकेटपटू

Posted by - December 29, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा…
Sachithra Senanayake

Match Fixing : मॅच फिक्‍सिंग प्रकरणी श्रीलंकेच्‍या ‘या’ माजी क्रिकेटपटूला अटक

Posted by - September 6, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मॅच फिक्‍सिंग प्रकरणी (Match Fixing) श्रीलंकेच्‍या माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायके याला अटक करण्यात आली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *