Hardik Pandya

Hardik Pandya : भारतीय संघाला मोठा धक्का ! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामधून हार्दिक पांड्या बाहेर

766 0

पुणे : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिकला दुखापत झाली, त्यानंतर त्याला मैदानातून बाहेर जावे लागले होते. हार्दिक पांड्या हा संघासाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याची अनुपस्थिती आता हा संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

“हार्दिक पांड्या 22 ऑक्टोबरला धर्मशाला येथे होणार्‍या न्यूझीलंडविरुद्धच्या भारताच्या पुढील सामन्याला मुकणार आहे. पांड्याला बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत नेण्यात येईल, जिथे त्याच्यावर इंग्लंडमधील तज्ञ डॉक्टर उपचार करतील आणि शक्यतो त्याला इंजेक्शन दिले जातील. पांड्या लखनौमध्ये भारतीय संघात सामील होण्याची अपेक्षा आहे आणि संघाला आशा आहे की तो इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.”

विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून हार्दिक पांड्याला वगळणे हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. हार्दिक सध्या फॉर्ममध्ये आहे आणि तो संघासाठी बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. टीम इंडियाला वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडकडून नेहमीच खडतर स्पर्धेला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बाहेर पडणे हे टीमसाठी धक्कादायक आहे. त्यामुळे भारतीय फॅन्स हार्दिक पांड्या लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.

Share This News

Related Post

garder callopesd

पुण्यातील वाकडेवाडीत 27 टन मेट्रोचा गर्डर कोसळला; परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Posted by - May 8, 2023 0
पुणे : पुण्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या वाकडेवाडी परिसरात आज सकाळी 27 टन मेट्रोचा गर्डर कोसळला आहे. यामुळे त्या ठिकाणी असलेल्या…
Sharad Pawar

राष्ट्रवादीला मोठा धक्का! पवारांच्या ‘हा’ खास शिलेदार करणार भाजपात प्रवेश

Posted by - May 15, 2023 0
पुणे : मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणाने एक वेगळे वळण घेतले आहे. अशातच आता काही दिवसांवर निवडणूका येऊन ठेपल्या आहेत.…
chandrayan 3

Chandrayaan-3 : ठरलं ! 14 जुलैला होणार चांद्रयान -3 चं प्रक्षेपण

Posted by - July 7, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने बहुप्रतिक्षित चंद्रयान-3 (Chandrayaan-3) या मोहिमेच्या प्रक्षेपणाची तारीख जाहीर केली आहे. चंद्रयान-3…
Suicide News

Pune News : प्रेमात धोका मिळाल्याने तरुणीची आत्महत्या; पुण्यातील घटना

Posted by - March 12, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका विवाहित तरुणाने पत्नीसोबत पटत नसल्याचे व तिला…

Leopard Hunting : बिबट्याची शिकार करुन फार्महाऊसमध्ये लपवले अवयव; 2 बड्या उद्योजकांविरोधात गुन्हा दाखल

Posted by - August 21, 2023 0
पुणे : बिबट्या या वन्य प्राण्याची शिकार (Leopard Hunting) करुन त्याचे अवयव खडकवासला धरणालगत मांडवी बुद्रुक येथील फार्महाऊस मध्ये (Leopard…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *