Sachithra Senanayake

Match Fixing : मॅच फिक्‍सिंग प्रकरणी श्रीलंकेच्‍या ‘या’ माजी क्रिकेटपटूला अटक

621 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मॅच फिक्‍सिंग प्रकरणी (Match Fixing) श्रीलंकेच्‍या माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायके याला अटक करण्यात आली आहे. लंका प्रीमियर लीगच्या 2020 मधील स्‍पर्धेत मॅच फिक्स (Match Fixing) करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्‍याच्‍यावर लावण्यात आला होता.

तीन आठवड्यांपूर्वी कोलंबोच्या चीफ मॅजिस्ट्रेट न्‍यायालयाने सचित्रा सेनानायके याला परदेशात जाण्यास बंदी घातली होती. तसेच अ‍ॅटर्नी जनरल विभागाला क्रीडा मंत्रालयाच्या विशेष तपास युनिटने त्‍याच्‍यावरील आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. अखेर त्याने आज सकाळी शरणागती पत्करली. त्‍याला क्रीडा भ्रष्टाचार अन्वेषण युनिटकडून अटक करण्यात आली आहे.

प्रीमियर लीगमध्‍ये मॅच फिक्‍सिंग केल्‍याचा आराेप
सेनानायके यांच्यावर लंका प्रीमियर लीग (LPL) च्या 2020 आवृत्तीचे गेम फिक्स करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. या स्‍पर्धेत त्‍याने दोन क्रिकेटपटूंना मॅच फिक्स करण्यासाठी प्रलोभन दाखवले होते. 38 वर्षीय सचित्रा सेनानायके याने 2012 ते 2016 या काळात श्रीलंकेसाठी एक कसोटी, 49 वन-डे आणि 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या घटनेमुळे क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News

Related Post

Pune News

Pune Porsche Car Accident : पुणे पोर्शे कार प्रकरणात मोठी अपडेट ! ‘त्या’ दोघांना मुंबईमधून केली अटक

Posted by - June 4, 2024 0
पुणे : देशात खळबळ उडवून देणाऱ्या पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पुणे पोर्शे कार प्रकरणात (Pune Porsche Car Accident) मोठी अपडेट आली…
Shreyanka Patil

Shreyanka Patil : भारताच्या श्रेयांका पाटीलने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली गोलंदाज

Posted by - September 4, 2023 0
नवी दिल्ली: भारताची युवा ऑफ स्पिनर श्रेयांका पाटील (Shreyanka Patil) सध्या वेस्ट इंडिजमध्ये महिला कॅरेबियन प्रीमियर लीग खेळत आहे. श्रेयांका…
IND vs SA

IND vs SA: पहिल्या वनडेमध्ये ‘हा’ खेळाडू करू शकतो डेब्यू; कशी असेल भारताची प्लेईंग 11

Posted by - December 17, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (IND vs SA) आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-20 सिरीज बरोबरीत…
Nagpur Crime

Nagpur Crime : अल्पवयीन मुलीवर आईच्या प्रियकराकडून अत्याचार; नागपूरमधील संतापजनक घटना

Posted by - October 14, 2023 0
नागपूर : नागपूरमधून (Nagpur Crime) एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *