hardik vs krunal

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार! दोन भाऊ कर्णधार म्हणून एकमेकांना भिडणार

568 0

मुंबई : यंदाची आयपीएल स्पर्धा खूप रंगतदार होत चालली आहे. यंदाच्या सीझनमध्ये आयपीएलचे 50 सामने झाले तरी अजून कोणताच संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरलेला नाही. मात्र आज प्ले ऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ आपल्याला मिळू शकतो. आज गुजरात आणि लखनऊ यांच्यात आज दुपारी नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना पार पडणार आहे. हा सामना जर गुजरातने जिंकला तर तो प्ले ऑफसाठी पात्र ठरणार पहिला संघ ठरेल. या सामन्यात अजून एक गोष्ट घडणार आहे जी आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार आहे. या सामन्यात दोन भाऊ कर्णधार म्हणून एकमेकांना भिडणार आहेत. गुजरातचा हार्दिक पंड्या आणि लखनौचा कृणाल पंड्या हे सख्खे भाऊ आज आपल्या संघासाठी भिडणार आहेत. त्यामुळे या सामन्यात कोणता भाऊ बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आयपीएलमध्ये गुजरातला गतवर्षी विजेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिकने भारतीय संघाचेही नेतृत्वपद भूषवलेले आहे; तर कृणालने देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोद्याच्या कर्णधारपदाची जबाबदारी काही सामन्यांत सांभाळलेली आहे, परंतु आज ते एकमेकांविरुद्ध नेतृत्व करणारे आयपीएलमधील पहिले कर्णधार ठरतील. हार्दिकचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे तर तर लखनौचा संघ 11 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

लखनऊचा नियमित कर्णधार के. एल. राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्याने लखनऊच्या संघाची कामगिरी थोडी डाऊन झाली आहे. जर त्यांना पहिल्या चार संघांत स्थान कायम ठेवायचे असेल तर त्यांना पुढील सगळे सामने जिंकावे लागणार आहे. के. एल. राहुल संघात नसल्यामुळे त्यांना नव्याने संघबांधणी करून पुढील सामने खेळावे लागणार आहे. दुसरीकडे गुजरातचा संघ आजचा सामना जिंकून प्ले ऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्हाला स्टार स्पोर्टस्, जिओ सिनेमावर पाहता येणार आहे.

Share This News

Related Post

Pakistan Team

ICC ODI Rankings : पाकिस्तानला मोठा धक्का! अवघ्या 48 तासांत पाकिस्तानने गमावले पहिले स्थान

Posted by - May 8, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचा संघ यंदा पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत (ICC ODI Rankings) अव्वल आला होता. मात्र त्यांचा…
Pass Away

Pass Away : दुर्धर आजाराशी झुंज अखेर संपली ! ‘या’ महान क्रिकेटपटूचं 49व्या वर्षी निधन

Posted by - August 23, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झिम्बाब्वेचा प्रसिद्ध आणि महान क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांचे आज निधन (Pass Away) झाले आहे. ते…
Rohit Sharma

IND vs NED : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने केला ‘हा’ मोठा विक्रम

Posted by - November 12, 2023 0
बंगळुरू : आज वर्ल्ड कप 2023 मध्ये साखळी फेरीतील भारताचा अखेरचा सामना नेदरलँडविरुद्ध (IND vs NED) खेळवला जात आहे. भारताने…
Rohit Sharma

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला ‘हा’ मोठा विक्रम ! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

Posted by - January 12, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि अफगाणिस्तानमधील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील (Rohit Sharma) पहिला सामना काल पार पडला. या…

पुणे : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित सायकल स्पर्धेला प्रतिसाद

Posted by - September 27, 2022 0
पुणे : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज सिंहगड येथे फोर्ट सायक्लॉथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सिंहगड घाट रस्त्याने ९ किमी अंतर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *