T- 20 World Cup

ICC T-20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात ‘हे’ 5 दिग्गज ठरू शकतात फ्लॉप

890 0

मुंबई : येत्या जूनपासून टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या वर्ल्डकपमध्ये (ICC T-20 World Cup 2024) एकूण 20 संघ एकमेकांना भिडणार आहेत. या वर्ल्डकपचे यजमानपद वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेटकडे आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. या T20 विश्वचषकात एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये इंडिया, न्यूझीलंड, ओमान, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलँड, श्रीलंका, युगांडा, वेस्ट इंडिज, यूएसए, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, नामिबिया, नेदरलँड्स, अफगाणिस्तान, आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. आगामी टी-20 विश्वचषकात 5 दिग्गज खेळाडू फ्लॉप ठरू शकतात. हे खेळाडू कोण आहेत जाणून घेऊया…

केन विलियमसन
न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसन शेवटचा टी-20 विश्वचषक खेळणार आहे. परंतु सध्याची कामगिरी पाहिल्यास त्याला धावा करता आलेल्या नाही. आयपीएलमध्ये तो गुजरातच्या संघात होता. परंतु यामध्ये त्याला फक्त 2 सामने खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याने 27 धावा केल्या होत्या.

जॉनी बेयरस्ट्रो
इंग्लंडचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज जॉनी बेयरस्ट्रो आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळत होता. परंतु त्याने चांगली कामगिरी केलेली नाही. केकेआरविरुद्ध शतक झळकवण्याव्यतिरिक्त तो धावा करण्यात अपयशी ठरला. त्याने 11 सामन्यात 298 धावा केल्या.

बाबर आझम
पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमदेखील सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. आगामी टी-20 विश्वचषकात बाबर आझम फ्लॉप ठरु शकतो. बाबर आझमचा टी-20मधील स्टाइक रेट 130 पेक्षाही कमी आहे.

ग्लेन मॅक्सवेल
ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल मोठ्या स्पर्धेत चांगली कामगिरी करतो. मात्र आयपीएलमध्ये त्याने धावा केल्या नाही. 10 सामन्यात त्याने फक्त 52 धावा केल्या तसेच 6 विकेट्स घेतल्या आहेत.

ऋषभ पंत
कार अपघातानंतर भारतीय संघाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत पुन्हा संघात पुनरागमन करणार आहे. आयपीएलमध्ये पंतने चांगली कामगिरी केली. 13 सामन्यात 446 धावा केल्या. भारतात पंत चांगली कामगिरी करतो, पंरतु परदेशात त्याला साजेशी अशी कामगिरी करता आलेली नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Porsche Accident Case : पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठा ट्विस्ट ! अल्पवयीन आरोपीच्या मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलले

Share This News

Related Post

sucide Nagpur

क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्यामुळे तरुणाची नैराश्यातून आत्महत्या

Posted by - May 23, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका क्षणात संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. यामध्ये क्रिकेट…
Aniket Pote

Aniket Pote : अल्टीमेट खो-खो सीझन 2 मध्ये मुंबई खिलाडी संघाच्या कर्णधारपदी अनिकेत पोटे याची निवड

Posted by - December 19, 2023 0
भुवनेश्वर : मुंबई खिलाडी संघाने अल्टीमेट खो-खो सीझन 2 साठी संघाच्या कर्णधारपदी अनिकेत पोटे (Aniket Pote) याच्या नावाची घोषणा केली…
Virat Kohli

IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का ! विराट कोहली इंग्लडविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांना मुकणार

Posted by - January 22, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात (IND vs ENG) खेळणार नसल्याची…
Ashutosh Sharma

Ashutosh Sharma : युवराज सिंहचा ‘तो’ विक्रम मोडणारा आशुतोष शर्मा यंदाच्या IPL मध्ये झळकला

Posted by - April 5, 2024 0
आशुतोष शर्माने (Ashutosh Sharma) पंजाब किंग्सला गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. IPL 2024 च्या 17 व्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *