Team India

Cricketers Retirement : खळबळजनक ! एकाचवेळी ‘या’ 5 क्रिकेटर्सने केली निवृत्तीची घोषणा

498 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रीडा विश्वातून एक खळबळजनक (Cricketers Retirement) बातमी समोर आली आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या पाच दिग्ज क्रिकेटपटूंनी रणजी ट्रॉफी संपल्यानतंर क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या क्रिकेटपटूंमध्ये बंगालचा दिग्गज फलंदाज मनोज तिवारी (Manoj Tiwari), झारखंडचा फलंदाज सौरभ तिवारी(Sourabh Tiwari), वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅरोन (Varun Aaron), मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni) आणि विदर्भाचा रणजी ट्रॉफी विजेता कर्णधार फैज फजल (Faiz Faizal) यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंनी क्रिकेटमधून निवृत्ती घेताना वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. आता या क्रिकेटर्सच्या कारकिर्दीबद्दल जाणून घेऊया…

मनोज तिवारी
बंगालच्या मनोज तिवारीने बिहारविरुद्ध संघाला विजय मिळवून देत क्रिकेटला अलविदा केलं. 38 वर्षीय मनोज तिवारी तब्बल 19 वर्ष बंगालसाठी खेळला. गेल्या हंगामात मनोज तिवारीच्या नेतृत्वात बंगलाने रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मनोज तिवारीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10000 हून अधिक धावा केल्या आहेत.

सौरव तिवारी
सौरव तिवारी गेली 17 वर्ष झारखंड संघासाठी खेळत आहे. त्याने 115 प्रथम श्रेणी सामन्यात 8030 धावा केल्या आहेत. यात 22 शतकं आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे.

वरुण अ‍ॅरोन
वरुण अ‍ॅरोनला भारतीय क्रिकेट संघात फारशी संधी मिळाली नाही. सातत्याने दुखापतीमुळे वरुण संघातून बाहेर राहिला. वरुण अ‍ॅरोनने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 66 सामन्यात 173 विकेट घेतल्या आहेत.

फैज फजल
फैज फजल तब्बल 21 वर्ष विदर्भ संघाकडून खेळला. त्याच्या नेतृत्वात विदर्भने 2018 मध्ये रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्या हंगामात फैज फजलनने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फैज फजलने 9183 धावा केल्या आहेत.

धवल कुलकर्णी
मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीनी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. स्विग, लाईन आणि लेंथसाठी धवल कुलकर्णी ओळखला जात होता. हमकास विकेट घेणारा गोलंदाज अशी त्याची ख्याती होती. त्याने 95 प्रथम श्रेणी सामन्यात 281 विकेट घेतल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

HSC Board Exam 2024 : उद्यापासून 12 वीच्या परीक्षेला सुरुवात; शिक्षण मंडळाने आणला ‘हा’ नवीन नियम

Maratha Reservation : मराठा आरक्षण विधानसभेत एकमताने मंजूर

Ajit Pawar : वादा तोच पण, दादा नवा…! राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झळकलेल्या ‘त्या’ बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा

Maratha Reservation : आधी ‘ती’ मागणी मान्य करा अन् नंतरच..; अधिवेशनापूर्वी जरांगे पाटलांची आक्रमक भूमिका

Share This News

Related Post

traffic jam

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Posted by - May 12, 2023 0
पुणे : पुणे – मुंबई महामार्गावर (Mumbai Expressway) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्थाप सहन करावा…

पुणे: भरधाव दुचाकीची धडक बसून पोस्टमनचा मृत्यू

Posted by - November 13, 2022 0
रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीची धडक बसून पोस्टमनचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात पुणे-सातारा महामार्गावर  केळावडे गावच्या हद्दीत एका कंपनीसमोर…

काळी टोपी आणि प्रिंटेड शर्ट; कर्नाटक दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास लुक चर्चेत

Posted by - April 9, 2023 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर असून कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नरेंद्र मोदी…

मी भगवंत मान….शपथ घेतो की ; भगवंत मान यांनी घेतली पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ

Posted by - March 16, 2022 0
आम आदमी पार्टीचे भगवंत मान यांनी आज पंजाबच्या  25 व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भगतसिंग यांचे पंजाबमधील वडिलोपार्जित गाव खटकर कलान…

Commonwealth Games : भारताची सुवर्ण कामगिरी ; रेसीलिंगमध्ये साक्षी मलिक आणि बजरंग पुनियाने पटकावले गोल्ड मेडल

Posted by - August 5, 2022 0
Commonwealth Games : कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची रेसलर साक्षी मलिक गोल्ड मेडल पटकवण्यात यशस्वी ठरली आहे.बजरंग पुनियाने देखील रेसलिंगमध्ये गोल्ड मेडल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *