व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजना प्रस्ताव ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन

271 0

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका व पात्र विभागांनी व्यायामशाळा विकास व क्रीडांगण विकास अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत राबवण्यात येत असलेल्या व्यायामशाळा विकास अनुदान योजनेची अनुदान मर्यादा कमाल ७ लाख इतकी करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत व्यायामशाळा विकास अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, शासकीय विभाग, आदिवासी व समाजकल्याण विभागातंर्गत शासकीय आश्रमशाळा व स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका यांना खुली व्यायामशाळा साहित्य व व्यायामशाळा साहित्य खरेदीसाठी ७ लाख रूपयांच्या मर्यादेत व्यायामसाहित्याचा पुरवठा करण्याचे नियोजन आहे.

अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत ज्या गावांत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये व्यायामशाळा उपलब्ध असेल तेथे व्यायामसाहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच दलित वस्ती किंवा वस्तीच्या नजीकच्या परिसरात सुयोग्य मोकळी जागा उपलब्ध असेल तर खुले व्यायामशाळा साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दलित वस्तीमध्येच व्यायामसाहित्य बसविण्याबाबतचा ठराव ग्रामपंचायतींना द्यावा लागणार आहे.

अदिवासी उपयोजनेतंर्गत अदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायती व अदिवासी शाळा तसेच अदिवासी क्षेत्रालगत ग्रामपंचायती व शाळांना व्यायामसाहित्य व खुली व्यायामशाळा साहित्य व क्रीडासाहित्य पुरवठा करण्याची योजना आहे.

क्रीडांगण विकास अनुदान योजनेतंर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, शासकीय विभाग, अदिवासी व समाजकल्याण विभागा तंर्गत शासकीय आश्रमशाळा व स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका अंतर्गत शाळांना ३ लाख रूपयांच्या मर्यादेत विविध खेळांचे क्रीडासाहित्य पुरवठा करण्याचे नियोजन आहे.

पात्र विभागानी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, द्वारा स.नं. १९१, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मोझे हायस्कूल समोर येरवडा येथे उपलब्ध विहित नमुन्यातील अर्जासह ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत. अर्ज तसेच अधिक माहितीसाठी www.dsopune.com या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन श्री. कसगावडे यांनी केले आहे.

Share This News

Related Post

पिंपरी- चिंचवडमध्ये H3N2 व्हायरसचा पहिला मृत्यू ! घाबरू नका पण काळजी घ्या !

Posted by - March 16, 2023 0
Edited By : बागेश्री पारनेकर : पिंपरी चिंचवड शहरात H3 N2 व्हायरसचा पहिला मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये एका…

शनिवार वाड्याजवळील दर्गा कोणाचा? प्रतापगडानंतर आता पुण्यात नवा वाद पेटण्याची शक्यता

Posted by - November 16, 2022 0
पुणे : किल्ले प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवल्यानंतर या ठिकाणी आणखी तीन कबरी असल्याचे निदर्शनास आलं असून आता या कबरी…

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Posted by - June 15, 2024 0
हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या 119 व्या पुण्यतिथी निमित्त दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात…
Sharad Pawar Shirur

मोठी बातमी! शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; ‘या’ नावावर झालं शिक्कमोर्तब

Posted by - June 5, 2023 0
पुणे : आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसले असताना आज पुण्यात (Pune) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची पदाधिकारी बैठक…
Pune University

University of Pune : पुणे विद्यापीठाकडून दिवाळीची सुट्टी जाहीर

Posted by - November 11, 2023 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (University of Pune) दिवाळीनिमित्त शुक्रवारपासून (ता.10) ते शुक्रवारपर्यंत (ता. 17) सुट्टी जाहीर करण्यात आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *