Bajarang Punia

Bajrang Punia : बजरंग पुनियाचे निलंबन; उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्याने केली कारवाई

620 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजक संस्थेकडून (नाडा) केलेल्या तात्पुरत्या निलंबनाच्या कारवाईपुढे एक पाऊल टाकत संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेकडून (यूडब्ल्यूडब्ल्यू) भारताचा कुस्तीगीर बजरंग पुनियाला वर्षअखेरपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. जागतिक संघटनेच्या या निर्णयामुळे केवळ ऑलिम्पिकच नव्हे तर बजरंगच्या कारकीर्दीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

भारतातील सर्वात यशस्वी कुस्तीगीर असलेल्या बजरंगने 23 एप्रिल रोजी केलेल्या चाचणीस नकार दिल्यामुळे ‘नाडा’ने त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली होती. चाचणीस कधी नकार दिला नसल्यामुळे चाचणीसाठी मुदत संपलेले साहित्य वापरण्यात येत असल्याबद्दल विचारणा करण्यात आली होती अशी प्रतिक्रिया बजरंगने त्यावेळी दिली होती.

जागतिक महासंघाने आपल्या संकेतस्थळावर बजरंगच्या नावापुढे निलंबित असे नमूद केले असले, तरी जागतिक संघटनेकडून आपल्याशी कुठल्याही प्रकारचा संवाद साधण्यात आलेला नाही, असे बजरंग स्पष्ट म्हणाला आहे. उत्तेजकविरोधी नियमाचे उल्लंघन केल्यामुळे ‘नाडा’ने त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली असून, यामुळे आम्ही त्याला 31 डिसेंबर 2024 पर्यंत निलंबित करत आहोत, असे ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’ने स्पष्ट केले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Narendra Dabholkar : कोण होते नरेंद्र दाभोलकर?

Narendra Dabholkar : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट ! 2 जणांना जन्मठेप 3 जणांची निर्दोष मुक्तता

Pune News : अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण

Mumbai-Pune Express : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

T- 20 World Cup

IPL 2024 : ‘हे’ 5 खेळाडू IPL मध्ये करत आहेत जबरदस्त कामगिरी; मात्र तरीदेखील त्यांना मिळणार नाही टी-20 वर्ल्डकपमध्ये संधी

Posted by - April 19, 2024 0
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) मध्ये भारताचे अनकॅप्ड खेळाडू जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहेत. ते आपल्या संघासाठी…
IND vs AUS T20

IND vs AUS T20 : टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडचा ऑस्ट्रेलियाने घेतला धसका? महत्वपूर्ण सामन्यापूर्वी निम्मा संघच बदलला

Posted by - November 28, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या ऑस्ट्रेलिया टीम इंडिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका (IND vs AUS T20) खेळवली जात…
Ajit Agarkar

Ajit Agarkar : भारतीय क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदी अजित आगरकरची नियुक्ती

Posted by - July 4, 2023 0
मुंबई : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर (Ajit Agarkar) याची भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी निवड झाली आहे.…
hardik vs krunal

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार! दोन भाऊ कर्णधार म्हणून एकमेकांना भिडणार

Posted by - May 7, 2023 0
मुंबई : यंदाची आयपीएल स्पर्धा खूप रंगतदार होत चालली आहे. यंदाच्या सीझनमध्ये आयपीएलचे 50 सामने झाले तरी अजून कोणताच संघ…

अभिनेता आर माधवनच्या मुलाने पटकावले डॅनिश ओपन जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक

Posted by - April 18, 2022 0
मुंबई – अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांत यानं डेन्मार्क येथील कोपहेगनमध्ये झालेल्या डॅनिश ओपन जलतरण स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक पटकावले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *