Bajarang Punia

Bajarang Punia : साक्षी मलिकच्या निवृत्तीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने घेतला पद्मश्री परत करण्याचा निर्णय

541 0

मुंबई : क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक (Bajarang Punia) जिंकवून देणाऱ्या कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट या दोघींनी गुरुवारी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांच्या नेमणुकीचा जाहीर निषेध करत कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आता पद्मश्री पुरस्कार विजेता बजरंग पुनिया याने देखील भारत सरकारकडून देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

बजरंग पुनियाने ट्विट करत आपला निर्णय जाहीर केला आहे. तसेच त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. यात त्याने म्हंटले, ‘मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत आहे’. बजरंग पुनिया याला 2019 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्याच वर्षी बजरंगला खेलरत्न पुरस्कारही मिळाला होता. 29 वर्षांचा बजरंग हा भारतातील सर्वात यशस्वी कुस्तीपटूंपैकी एक आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चार पदके, आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन, राष्ट्रकुल स्पर्धेत 3 आणि आशियाई स्पर्धेत 8 पदके त्याच्या नावावर आहेत.

2023 च्या सुरुवातीला ऑलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेत पदकं जिंकून भारताचे नाव जगभरात उंचवणाऱ्या कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यासमवेत अनेक महिला कुस्तीपटूंनी भाजप खासदार आणि तत्कालीन भारताच्या कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mumbai News : तळीरामांसाठी मोठी बातमी ! मुंबईत हॉटेल, बार आणि वाईन शॉपी पहाटेपर्यंत सुरू राहणार, राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

Eknath Shinde : शिवसेनेचा वर अन् ठाकरे गटाची वधू; ठाण्यातील ‘त्या’ विवाहाची सर्वत्र चर्चा

Maratha Reseration :’जरांगे पाटलांचं ऐकलंच पाहिजे, नाही ऐकलं तर ते…’; भुजबळांनी लगावला खोचक टोला

Belgaon News : दारुड्या शब्दावर बंदी आण्यासाठी मद्यपींनी काढला थेट विधान भवनावर मोर्चा

Pune Murder : पुणे हादरलं ! संशयातून मित्रानेच केली मित्राची हत्या

Sunil Kedar : रोखे खरेदी घोटाळ्यात सुनील केदार दोषी; 21 वर्षांनी लागला निकाल

Latur Accident : लातूरमध्ये ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; 3 शिक्षकांसह चालकाचा जागीच मृत्यू

Sakshi Malik Retirement : ऑलिंपिक पदक विजेत्या साक्षी मालिकची कुस्तीमधून निवृत्ती

Share This News

Related Post

T- 20 World Cup

T20 World Cup : T20 World Cupसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ खेळाडूंचे झाले कमबॅक

Posted by - April 30, 2024 0
अहमदाबाद : टी२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्या १५ सदस्यांची टीम जाहीर करण्यात…
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : ज्याला विराट कोहलीला 6 वर्ष लागली ‘तो’ महाविक्रम यशस्वीने 7 महिन्यात केला

Posted by - March 7, 2024 0
मुंबई : धर्मशाला कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) 1 धाव बनवताच विराट कोहलीचा 7 वर्षांपूर्वीचा विक्रम मागे टाकला आहे.…
WWE Championship

WWE Championship : भारतात ‘या’ दिवशी रंगणार WWE चा रणसंग्राम!

Posted by - August 1, 2023 0
मुंबई : भारतीय डब्लूडब्लूई (WWE Championship) चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. डब्ल्यूडब्ल्यूई (WWE Championship) स्पर्धा लवकरच भारतात होणार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *