Team India

Asian Games 2023: आशियाई खेळांसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ यंगस्टारकडे देण्यात आली कर्णधारपदाची धुरा

1316 0

मुंबई : बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने 19 व्या एशियन गेम्स स्पर्धेसाठी (Asian Games 2023) टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयने 15 सदस्यीय मुख्य संघ जाहीर केला आहे. या संघात (Asian Games 2023) 4 जणांना राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआयने शुक्रवारी 14 जुलै रोजी रात्री उशिरा ट्विट करून याची माहिती दिली आहे. या संघाची धुरा पुण्याचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड सांभाळणार आहे. या संघात बीसीसीआयने आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे. ही स्पर्धा टी 20 फॉर्मेटमध्ये खेळवण्यात येणार आहे.

कधी खेळवली जाणार ही स्पर्धा?
एशियन गेम्स ही स्पर्धा (Asian Games 2023) 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान खेळण्यात येणार आहे. या स्पर्धेचं आयोजन हे चीनमध्ये करण्यात आले आहे. एशियन स्पर्धेचं चीनमध्ये आयोजन करण्याची ही तिसरी वेळ आहे. तसेच या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्याची देखील तिसरीच वेळ आहे. याअगोदर एशियन गेम्समध्ये 2014 आणि 2010 मध्ये क्रिकेट खेळाला स्थान देण्यात आलं होतं.

कोणत्या खेळाडूवर कोणती जबाबदारी?
युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड या संघाचे नेतृत्व करणार आहे. अर्शदीप सिंह, शिवम मावी, आवेश खान आणि मुकेश कुमार या चौघांकडे वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. तर फिरकी गोलंदाजीची धुरा ही रवी बिश्नोई आणि शहबाज अहमद याच्यांकडे असेल. तसेच संघात ऑलराउंडर म्हणून वॉशिंग्टन सुंदरची निवड करण्यात आली आहे.

19 व्या एशियन गेम्ससाठी टीम इंडियाचा संघ
ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)

राखीव खेळाडू : यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन

Share This News

Related Post

IPL 2024

IPL 2024 : ‘या’ मॅचविनर खेळाडूने IPL केला रामराम! चाहत्यांना बसला मोठा धक्का

Posted by - November 26, 2023 0
वर्ल्ड कप संपल्यानंतर आता क्रिकेटप्रेमींना आयपीएलची (IPL 2024) आस लागली आहे. ही आयपीएल सुरु होण्याआधीच क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी बातमी आली…
Jasprit Bumrah

IND vs AUS: बुमराहने रचला इतिहास ! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Posted by - October 8, 2023 0
चेन्नई : वृत्तसंस्था – एकदिवसीय विश्वचषक 2023 (IND vs AUS) मधील पाचवा सामना आज टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला…
Rohan Bopanna-Rutuja Bhosale

Asian Games 2023 : रोहन बोपण्णा- ऋतुजा भोसले यांनी रचला इतिहास; टेनिस मिश्र दुहेरीत पटकावले सुवर्णपदक

Posted by - September 30, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) सातव्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. रोहन बोपन्ना आणि…
ICC Ranking

ICC Ranking : आयसीसीकडून वनडे फलंदाजीची क्रमवारी जाहीर !

Posted by - October 11, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विश्वचषकाचा रनसंग्राम सुरु असतानाच आयसीसीने वनडे फलंदाजीची क्रमवारी (ICC Ranking) जारी केली आहे. ताज्या क्रमवारीनुसार,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *