Rohit Sharma

Asia Cup Final 2023: आशिया चषकाच्या फायनलमध्ये रोहित शर्मा रचणार ‘हा’ विक्रम

640 0

आज भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषक 2023 मधील अंतिम सामना (Asia Cup Final 2023) पार पडणार आहे. हा सामना आज दुपारी भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे. हा ब्लॉकबस्टर सामना कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे तर दासून शनाका श्रीलंकेच्या संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे.

मैदानात उतरताच रोहित रचणार हा विक्रम
आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा भारतीय कर्णधार रोहित शर्मावर खिळल्या आहेत. आशिया चषकाचा अंतिम सामना खेळण्यासाठी प्रवेश करताच रोहित शर्माच्या नावावर एक मोठा विक्रम होणार आहे. रोहित एकूण पाचव्यांदा आशिया चषक फायनलमध्ये खेळणार आहे. या बाबतीत रोहित शर्मा मोहम्मद अझरुद्दीन, महेंद्रसिंह धोनी, नवज्योतसिंह सिद्धू आणि सचिन तेंडुलकर यांना देखील मागे टाकणार आहे. हे सर्व खेळाडू आशिया चषकात प्रत्येकी चार फायनल खेळले आहेत.

तसेच रोहित मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमापासून केवळ 33 धावा दूर आहे. आजच्या सामन्यात जर रोहितनं 33 धावा केल्या, तर तो आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरेल. रोहित सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करेल. एवढंच नाहीतर 61 धावा केल्यानंतर रोहित शर्मा आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये आपल्या एक हजार धावा पूर्ण करेल. तसेच आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये 1000 धावा करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय क्रिकेटर ठरणार आहे. हा पल्ला अजून कोणत्या भारतीय खेळाडूला गाठता आला नाही.

टीम इंडिया 8 व्यांदा विजेतेपद मिळवणार?
भारतीय क्रिकेट संघानं अंतिम सामना जिंकल्यास आठव्यांदा विजेतेपद पटकावणार आहे. आशिया कप (T20, ODI) च्या इतिहासात भारतीय संघानं सर्वाधिक 7 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. भारतानं 1984, 1988, 1990/91, 1995, 2010, 2016 आणि 2018 मध्ये आशिया चषक जिंकला आहे. भारताच्या पाठोपाठ श्रीलंका संघाचा नंबर लागतो. त्यांनी आतापर्यंत 6 वेळा आशिया चषक जिंकला आहे. तर पाकिस्तानच्या संघाने 2 वेळा आशिया चषक जिंकला आहे.

Share This News

Related Post

IPL Final

IPL Final : IPL फायनलमध्ये ‘या’ 5 खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सगळ्यांचे लक्ष

Posted by - May 26, 2024 0
आयपीएल 2024 स्पर्धेतील फायनलचा (IPL Final) सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. ही फायनल कोलकाता नाईट रायडर्स…
R. Ashwin

Ind Vs Eng : रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास; इंग्लंडविरुद्ध केले ‘हे’ ‘अनोखं शतक’

Posted by - February 23, 2024 0
भारत आणि इंग्लंडदरम्यान (Ind Vs Eng) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून…
Mohammed Shami

Mohammed Shami : ‘माझ्या लेकीला भेटू देत नाही…’, मोहम्मद शमीचा पत्नीवर खळबळजनक आरोप

Posted by - February 9, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि अर्जुन पुरस्कार विजेता मोहम्मद शमीने (Mohammed Shami) आपली पत्नी हसीन…
Loksabha News

लोकसभा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा; ‘या’ अटीवर इंडिया आघाडीने घेतला उमेदवार न देण्याचा निर्णय

Posted by - June 25, 2024 0
नवी दिल्ली:  नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता एनडीए सरकारचं पहिलं अधिवेशन राजधानी नवी दिल्लीत होत असून ह्या अधिवेशनात लोकसभा…
Cricketers

Cricketers : ‘या’ भारतीय क्रिकेटर्सनी निवृत्तीनंतर राजकारणात आजमावले नशीब

Posted by - March 19, 2024 0
मुंबई : भारतीय क्रिकेटपटू (Cricketers) अनेकदा राजकीय खेळपट्टीवर फलंदाजी करताना दिसत आहेत. क्रिकेट विश्वात स्वत:चे नाव कमावल्यानंतर, क्रिकेटपटू निवृत्तीनंतर अनेकदा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *