Asia Cup 2023

Asia Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव छापलं जाणार?

487 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आशिया चषक (Asia Cup 2023) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 30 ऑगस्टपासून आशिया चषकाला (Asia Cup 2023) सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वीच आशिया चषकाचे वेळापत्रक जारी करण्यात आले होते. यंदाचा आशिया चषक एकदिवसीय स्वरुपामध्ये खेळवण्यात येणार आहे. यंदाचा आशिया चषक पाकिस्तान आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये खेळवला जाणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, आशिया चषकादरम्यान भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव छापलं जाण्याची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव असण्याची ही पहिलीच वेळ असेल. 30 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील काही सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहे. या स्पर्धेचा मुख्य यजमान पाकिस्तान आहे. परंतु भारताने पाकिस्तानात सामने खेळण्यास नकार दिला आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे.

पाकिस्तान हा आशिया चषकाचा (Asia Cup 2023) मुख्य यजमान आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी संघांना आपल्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव लिहावं लागेल. त्यामुळेच भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव लिहिलं जाण्याची शक्यता आहे. भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव आशिया कपच्या लोगोच्या खाली असेल. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Share This News

Related Post

Rohit Sharma

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर झाली ‘या’ नकोश्या विक्रमाची नोंद

Posted by - May 4, 2023 0
मुंबई : काल मुंबई आणि पंजाब यांच्यात आयपीएल 2023 मधील 46 वा सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही संघानी धावांचा…
Rahul Tripathi

Pune News : ‘कोल्हापूर टस्कर्स’च्या कर्णधारपदी राहुल त्रिपाठीची निवड; पुनीत बालन यांनी केली घोषणा

Posted by - June 4, 2024 0
पुणे : टीम इंडियात एकेकाळी महाराष्ट्राचा झेडा डौलाने फडकवत ठेवणारा आणि सध्या सुरु असलेल्या ‘एमपीएल’मधील कोल्हापूर टस्कर्स संघाचा कर्णधार केदार…

जगातील प्रत्येक क्रिकेटप्रेमी पर्यंत आयपीएल पोहोचवणे आमचे मिशन – नीता अंबानी

Posted by - June 17, 2022 0
नवी दिल्ली- आयपीएल सामन्यांच्या प्रसारण हक्कांसाठी लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये वायकॉम18 ग्रुपने तीन गटाचे अधिकार जिंकले आहेत. या…
Ellyse Perry

Ellyse Perry : एलिस पेरीने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिलीच महिला क्रिकेटपटू

Posted by - March 13, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिलांच्या प्रिमीअर लिग 2024 मध्ये मुंबईविरूद्ध बंगळूरूच्या सामन्यात RCB ने बाजी मारून प्लेऑफमध्ये आपली जागा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *