दिव्यांची अमावस्या : आज अशी करा घरातील दिव्यांची पूजा ; घरातील दारिद्य होईल दूर…!

136 0

दिव्यांची अमावस्या : आषाढ महिन्याच्या अमावास्या तिथीला घरातील, देव घरातील धातूच्या दिव्यांची पूजा केली जाते. यासाठी दिवे स्वच्छ घासून, उजळवले जातात. त्यांची पूजा केली जाते. पुरणाचा नैवेद्य केला जातो. काही कुटुंबात बाजरीच्या पिठाचे किंवा कणकेचे दिवे केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते. दिव्याची अमावास्या भिल्ल या आदिवासी जमातीत विशेषत्वाने साजरी केली जाते.

हिंदू धर्मामध्ये दीप पूजनाचे एक विशेष महत्त्व आहे अंधकार दूर करून प्रकाश उजळून घरातील अपप्रवृत्ती वाईट विचार दूर व्हाव्यात घरात सुख समृद्धी नांदावी या भावनेने आज दिव्यांची पूजा केली जाते यासाठी आज घरातील सर्व दिवे स्वच्छ धुऊन घ्या हे सर्व दिवे स्वच्छ पुसून कोरडे करा आणि दुहेरी कापसाची वात घालून तेल तूप भरून एका पाटावर मांडावेत. सकाळी या दिव्यांना गंध अक्षता अत्तर आणि फुलांनी पुजावे सायंकाळी तिन्ही सांजेच्या वेळी हे दिवे प्रवजवलीत करावेत आणि त्यांसमोर ,

‘‘हे दीप, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’.

अर्थात हे दीप तू सूर्य रूप आणि अग्नीरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर असा या श्लोकाचा अर्थ आहे

Share This News

Related Post

Women's Day Special

Women’s Day Special : आज महिला दिनाच्या निमित्त महिलांच्या अधिकारांबद्दल जाणून घेऊया

Posted by - March 8, 2024 0
रोज आयुष्यात जगताना महिलेला असंख्य संकटांना सामोरे जावे लागते. अशावेळी या संकटांना तोंड देण्यासाठी समाजातील प्रत्येक महिलेला कायदे-अधिकार तसेच मार्गदर्शक…

“माफी कितीदा मागायची ? आता यापुढे मी कोणाचं ऐकून घेणार नाही…!” गौतमी पाटील संतापली

Posted by - March 11, 2023 0
पिंपरी चिंचवड : गौतमी पाटीलने आपल्या नृत्यकौशल्यातून अनेक तरुणांची मनं घायाळ केली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी तिने तिच्या नृत्यातून अश्लील…

राऊत नहीं तो क्या हुआ ? उनके नाम की कुर्सी ही काफी है..!

Posted by - September 21, 2022 0
गोरेगावातील नेस्को संकुलात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा भरवण्यात आलाय. या मेळाव्यास देशभरातील गटप्रमुख आपली हजेरी लावणार आहेत. या मेळाव्याच्या व्यासपीठावर ठेवण्यात…

#GOA : कुठे रंग आणि गुलाल, कुठे फुले पण गोव्यातील या अग्नी होळी विषयी ऐकलंय का ? नक्की वाचा हि आश्चर्यकारक माहिती

Posted by - March 8, 2023 0
होळी हा रंगांचा सण असला तरी भारतातील वैविध्यपूर्ण देशात होळी ही अनेक प्रकारे साजरी केली जाते. कुठे रंग आणि गुलाल,…

सावधान…! गॅस गिझरच्या दुर्घटना रोखण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या

Posted by - February 7, 2022 0
गेल्या काही दिवसांपासून गॅस गिझरमुळे गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. नाशिकमध्ये एका महिला वैमानिकाचा गुदमरून मृत्यू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *