श्रावणाची कथा : श्रावण महिन्यात कुमारिकांनी का करावा उपवास ? महादेवाला प्रिय आहे श्रावण कारण …

191 0

श्रावण महिन्यात कुणी आठवड्यातल्या एखाद्या दिवशी उपवास करतात तर काही जणांचा संपूर्ण महिनाभर उपवास असतो… काही जण खास करून सोमवार पाळतात… पण, हा उपवास का पाळतात ? या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत…

सोमवार हा शंकराचा वार म्हणून समजला जातो. मग, महादेवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहीत मुली उपवास करतात. देवांचा देव म्हणजे महादेव…. श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घरात हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ठ पद्धतीने केले जाते. याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले आहे. श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे. याचे एक कारण म्हणजे श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना असे सांगितले आहे.

श्रावणाची कथा : देवी सतीने तिचे पिता दक्षच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता. त्याआधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरुपात मिळवण्याचा प्रण केला होता. देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या रुपात जन्म घेतला. पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह केला. त्यानंतर महादेवाला श्रावण महिना विशेष झाला. यामुळेच श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात.

Share This News

Related Post

273 रुपयांचे हे उपकरण काही मिनिटांत शेकडो डासांना मारते

Posted by - March 26, 2022 0
नवी दिल्ली – डासांना दूर करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने आणि उपकरणे आहेत. यामध्ये मच्छर कॉइलपासून ते शरीरावर ओडोमोस लावण्यापर्यंत…
Lord Krishna

Lord Krishna : भगवान श्रीकृष्णाचे हे 7 सल्ले फॉलो करा; आयुष्यात कधीही भासणार नाही पैशांची कमतरता

Posted by - September 7, 2023 0
हिंदू पौराणिक कथेनुसार, जन्माष्टमीला भगवान विष्णूचा आठवा अवतार भगवान कृष्ण (Lord Krishna) यांचा जन्म होतो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म साजरा करणारा…

#Parenting Tips : मुलांकडून जबरदस्तीने मोबाईल काढून घेऊ नका, सवय कमी करण्यासाठी खास टिप्स

Posted by - March 10, 2023 0
#Parenting Tips : आजच्या आधुनिक काळात मोबाइल फोन ही केवळ प्रौढांसाठीच नव्हे तर लहान मुलांसाठीही एक गंभीर समस्या बनत चालली…

दिवाळी स्पेशलमध्ये पाहुयात भाजणीची कुरकुरीत काटेदार चकलीची खास रेसिपी

Posted by - October 20, 2022 0
काल आपण चकलीसाठीचे भाजणीचे पीठ कसे बनवायचे हे पाहिले सर्व जिन्नस योग्य प्रमाणात घेतले की चकली हमखास कुरकुरीत आणि काटेदार…

बोधकथा : स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विशेष; ‘हि’ बोध कथा तुमचे आयुष्य बदलेल !

Posted by - January 12, 2023 0
बोधकथा : स्वामी विवेकानंद (१२ जानेवारी, १८६३ – ४ जुलै, १९०२, नरेंद्रनाथ दत्त) हे एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *