विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी दिलेल्या मार्गारेट अल्वा कोण आहेत ?

119 0

नवी दिल्ली: विरोधी पक्षांनी रविवारी माजी केंद्रीय मंत्री आणि अनेक राज्यांच्या राज्यपाल राहिलेल्या मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केले.

एनडीए उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर विरोधकांनीही त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे.

मार्गारेट अल्वा यांचा जन्म 14 एप्रिल 1942 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे रोमन कॅथोलिक कुटुंबात झाला. त्यांनी माउंट कार्मेल कॉलेज, बंगळुरू येथून बीएची पदवी आणि बंगळुरूच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली आहे. 24 मे 1964 रोजी मार्गारेट यांनी निरंजन अल्वा यांच्याशी लग्न केले. त्यांना एक मुलगी आणि तीन मुलं आहेत. 1969 मध्ये अल्वा यांनी राजकारणात प्रवेश केला. अल्वा यांनी 1975 ते 1977 दरम्यान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहसचिव आणि 1978 ते 1980 दरम्यान कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून काम केले.

काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा १९७४ मध्ये पहिल्यांदा खासदार झाल्या. राज्यसभा आणि लोकसभेच्या एकूण पाच वेळा त्या खासदार होत्या. १९९९ मध्ये त्यांनी उत्तर कन्नडमधून लोकसभा निवडणूक जिंकली. खासदार म्हणून त्यांनी महिला कल्याणासाठी अनेक कायदे करण्यात प्रभावी भूमिका बजावली. काँग्रेस सरकारमध्ये महिला सक्षमीकरणाशी संबंधित धोरणे तयार करण्यात आणि मंजूर करण्यात अल्वा यांचा मोठा वाटा आहे.

Share This News

Related Post

भाजप आमदार गणेश नाईक यांचा पोलिसांकडून शोध, अटकेची टांगती तलवार

Posted by - April 20, 2022 0
नवी मुंबई- भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचे आरोप केले आहेत. त्यावरून नाईक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल…

#चिंचवड पोटनिवडणूक : चिंचवड मतदार संघामध्ये 41.1 % मतदात्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Posted by - February 26, 2023 0
पुणे : आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते…
Rahul Kalate

Rahul Kalate : राहुल कलाटे यांनी घेतली उदय सामंत यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

Posted by - June 23, 2023 0
पिंपरी: उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) गुरुवारी दि. 22 जून रोजी पिंपरी-चिंचवड (Pimpari Chinchwad) महापालिकेत आले होते. यावेळी ठाकरे गटाच्या…
Sanjeev Thakur

Sanjeev Thakur : ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई; ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची नेमणूक रद्द

Posted by - November 10, 2023 0
पुणे : पुणे ड्रज माफीया ललित पाटील प्रकरणात चर्चेत आलेले ससूनचे डीन संजीव ठाकूर (Sanjeev Thakur) यांची ससून रुग्णालयातील डीन…

Flipkart वर सुरू असलेल्या Infinix Days Sale मध्ये अनेक प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्स

Posted by - April 18, 2022 0
नवी दिल्ली – ई-कॉमर्स साइट Flipkart वर Infinix Days Sale सुरू झाला आहे. या सेलमध्ये लोकप्रिय स्मार्टफोन्स, लॅपटॉप आणि टीव्हीवर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *