पंढरपुरातील शासकीय महापूजेचा काय आहे इतिहास ?

194 0

महाराष्ट्रात वारीची परंपरा ही पूर्वापार चालत आलेली आहे. विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी मैलोनमैल प्रवास करत वारीत सहभागी होतात आणि ग्यानबा, तुकारामचा गजर करत हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरात दाखल होतो. आषाढी एकादशीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची पूजा करण्याची देखील परंपरा आहे.

राज्यात नुकत्याच झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलेल्या एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाची शासकीय महापूजा होणार आहे. पण विठ्ठलाची ही शासकीय महापूजा करण्याला एकदा विरोध केला होता आणि त्यानंतर महाराष्ट्रावर फार मोठं संकट आलं. तेव्हापासून ही पूजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायला सुरुवात झाली.

असा आहे महापुजेचा इतिहास 

पेशव्यांच्या काळात पंढरपूरच्या मंदिराच्या देखभालीसाठी देवस्थान समिती नेमली. या समितीच्या सदस्यांकडून आषाढीवारीला पांडुरंगाची पूजा होत असे. पेशवाईनंतर इंग्रजांच्या काळात हिंदू कलेक्टर, प्रांत, मामलेदार, सेवाज्येष्ठतेनुसार शासकीय पूजा करत. इंग्रज सरकार पूजाअर्चेसाठी या देवस्थानाला वर्षाकाठी दोन हजार रुपयांचे अनुदान देत असत. पण स्वातंत्र्योत्तर काळात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राजारामबापू पाटील महसूल मंत्री असताना पूजेसाठी पंढरपूरात आले, त्यांनी या देवस्थानचे वार्षिक अनुदान दोन हजार रुपयांवरून २० हजार रुपये केले. त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्याची प्रथा चालू झाली.

पण, 1970 मध्ये काही लोकांनी निधर्मी राज्यात सरकारने शासकीय पूजा करणे योग्य नसल्याचे सांगत आंदोलन केले. त्यामुळे 1971 साली विठ्ठलाची शासकीय पूजा झाली नाही. पण 1972 मध्ये राज्यात भीषण असा दुष्काळ पडला. या दुष्काळामध्ये राज्यातील शेतकरी आणि जनतेची अवस्था हवालदिल झाली. त्यामुळे सरकारने पूजा बंद केली म्हणून विठ्ठल कोपला आणि राज्यात दुष्काळ पडला, अशी भावना सर्वसामांन्यांत आणि वारक-यांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 1973 स्वतः पंढरपूरच्या विठोबाची महापूजा करत राज्यावरील संकट दूर करण्यासाठी साकडे घातले. तेव्हापासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठुरायाची महापूजा करण्याची परंपरा सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे.

1995 मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं आणि मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री बनले. तेव्हा स्वतः मनोहर जोशींनी दिंडीत सामील होत सपत्नीक विठ्ठलाची महापूजा केली होती. त्यामुळे वारीत स्वतः सहभागी झालेले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांची ओळख आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाच उपमुख्यमंत्र्यांनी कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना या पूजेचा पहिला मान मिळाला.

Share This News

Related Post

Pankaja Munde

Pankaja Munde : ‘तोपर्यंत फेटा बांधणार नाही’; जाहीर सभेत पंकजा मुंडेंनी केला निर्धार

Posted by - February 22, 2024 0
बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्या पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथे संत…
Parbhani News

Parbhani News : देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; 3 भाविकांचा मृत्यू

Posted by - December 17, 2023 0
परभणी : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. अशीच एक अपघाताची घटना परभणी (Parbhani News) जिल्ह्यातून समोर आली आहे.…

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या द्वितीय स्मृतीदिनी ; लोकजनशक्ती पार्टीकडून अभिवादन

Posted by - October 8, 2022 0
पुणे : लोकजनशक्ती पार्टी पुणे शहर,जिल्हा मध्यवर्ती कार्यालय (साधू वासवानी चौक) येथे पक्षाचे संस्थापक पद्मभूषण स्व. रामविलास पासवान यांच्या द्वितीय…

‘क्या से क्या हो गया !’ कालपर्यंत मंत्री, आज झाले कैदी, नवज्योतसिंग सिद्धू यांची पटियाला कारागृहात रवानगी

Posted by - May 21, 2022 0
चंदीगड – पंजाबचे माजी मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. नवज्योतसिंग सिद्धू…

23rd KARGIL VIJAY DIWAS CEREMONY : सदर्न कमांड वॉर मेमोरियल आयोजित ‘कारगिल विजय दिवस’ अभिमानाने साजरा

Posted by - July 26, 2022 0
पुणे : 26 जुलै 2022 रोजी पुण्यातील सदर्न कमांड वॉर मेमोरियल येथे आयोजित समारंभात कारगिल विजय दिवस मोठ्या अभिमानाने साजरा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *