AB Form

AB Form : निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा ‘एबी फॉर्म’ नक्की असतो तरी काय?

2129 0

कोणतीही निवडणूक लागली की एबी फॉर्मचा विषय नेहमी चर्चेत येतो. एखाद्या उमेदवाराने एबी फॉर्म पळवला, फाडला इथपासून ते चुकीचा भरल्याने उमेदवारी रद्द झाली, अशा बातम्या सतत आपल्या कानावर येत असतात तसंच, एबी फॉर्म मिळवण्यासाठी हाणामारीच्या घटनाही अनेक ठिकाणी घडल्याचा इतिहास आहे तर काय असतो हा AB फॉर्म आणि हा का इतक्या महत्वाचा असतो पाहुयात टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये ……..

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना पक्षाचा ‘एबी’ फॉर्म आवश्यक असतो. पण, एबी फॉर्म म्हणजे नेमका असतो तरी कसा? हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. आपणही अनेकदा ऐकलं असेल की पक्षाचा ‘एबी’ फॉर्म नाही मिळाला म्हणून अमुक उमेदवाराने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, आता हा राजकीय पक्षाची उमेदवारी आणि चिन्हासाठी महत्त्वाचा असलेला ‘एबी’ फॉर्म म्हणजे काय? हे जाणून घेऊ यात.

कोणतीही निवडणूक लागली की ‘एबी’ फॉर्मचा विषय नेहमी चर्चेत येतो. एखाद्या उमेदवाराने ‘एबी’ फॉर्म पळवला, फाडला येथेपासून ते चुकीचा भरल्याने उमेदवारी रद्द झाली, अशा बातम्या सतत आपल्या कानावर येत असतात. तसंच, ‘एबी’ फॉर्म मिळवण्यासाठी हाणामारीच्या घटनाही अनेक ठिकाणी घडल्याचा इतिहास आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी आता उमेदवारी अर्ज भरताना पक्षाने दिलेला ‘एबी’ फॉर्म भरणे आवश्यक असतो. त्यामुळे, ‘एबी’ फॉर्म म्हणजे नेमके असते तरी काय? याबाबत अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. निवडणूक प्रक्रियेत ‘एबी’ फॉर्मला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, यामुळेच संबंधित उमेदवार हा ‘एबी फॉर्म’ देणाऱ्या पक्षाचा अधिकृत उमदेवार समजला जातो आणि त्याला संबंधित पक्षाचे अधिकृत चिन्हंही दिले जाते. निवडणूक प्रक्रियेत याच ‘एबी’ फॉर्मला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पक्षाची आमदारकी व खासदारकी पाहिजे असेल तर त्यासाठी महत्त्वाचा आहे ‘एबी’ फॉर्म एखाद्या उमेदवारांचे तिकीट कन्फर्म झाले आहे. हे समजण्यासाठी ‘एबी’ फॉर्म महत्वाचा आहे.

काय आहे ‘ए’ फॉर्म
निवडणुकांमध्ये हे पक्ष त्यांचे अधिकृत म्हणून काही उमेदवार रिंगणात उतरवितात.
त्यांना एबी फॉर्म’ हा पक्ष आणि त्या पक्षाचे अधिकृत चिन्हं मिळवण्यासाठीचा महत्त्वाचा दस्तावेज आहे.
ए फॉर्म’ हा त्या पक्षाची मान्यता आणि चिन्ह यासाठीचा अधिकृत दस्तावेज आहे.
ए फॉर्म’वर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते.
संबंधित राजकीय पक्षाकडून ‘ए’ फॉर्म दिला जातो.
त्यात उमेदवाराचं नाव, पक्षातील पद आणि कोणत्या मतदारसंघातून पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, याची माहिती द्यावी लागते.
उमेदवारी अर्ज भरताना अनेक कागदपत्रं, प्रतिज्ञापत्र काळजीपूर्वक द्यावी लागतात.
काहीवेळा अधिकृत उमेदवाराने अर्ज भरल्यानंतरही छाननीच्या वेळी त्यात काही त्रुटी निघाल्या, तर अर्ज बाद ठरू शकतो.
त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणातून बाहेर पडतो.

काय आहे ‘बी’ फॉर्म
‘बी’ फॉर्म हा अधिकृत उमेदवारासंदर्भातील दस्तावेज आहे.
‘बी’ फॉर्मवर पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह पक्षाने सूचवलेल्या आणखी एका उमेदवाराचे नाव असते.
काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर दुसऱ्याला निवडणूक आयोग अधिकृत करु शकतो.
राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणुकीसाठी हे फॉर्म ‘एए’ आणि ‘बीबी’ म्हणून ओळखले जातात.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Punit Balan : कंटेंट क्रिएटर्सनी देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे : पुनीत बालन

Pune Fire : पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंदिराशेजारील वाड्याला भीषण आग

Pune News : पुण्यातील ‘या’ सोसायटीमध्ये देशातील पहिले मतदार केंद्र; पुणे प्रशासनाचा अनोखा उपक्रम

Pune Crime : भरधाव वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमध्ये ‘हिट अँड रन’ची घटना

Satara Loksabha : अखेर ! साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर

Nashik News : धक्कादायक ! 16 वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Nashik Accident : शाळेत जाताना घात झाला; आजोबांसह 2 नातींनी गमावला जीव

Share This News

Related Post

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने उपवासाच्या कचोरीची खास रेसिपी

Posted by - September 26, 2022 0
सध्या नवरात्र उत्सवामुळे उपवासाच्या पदार्थांची सर्वच जण चव चाखणार आहेत काही जण नवरात्र उठता बसता उपवास करतात तर अनेक जण…

रोज तिन्हीसांजेला घरात ऐका ‘हे’ श्लोक; दुःख-दारिद्र्य निवारण, मानसिक सुख आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी सर्वोत्तम उपाय

Posted by - November 10, 2022 0
बऱ्याच वेळा घरामध्ये सगळं काही असतं. संपत्ती,संतती,समृद्धी पण मानसिक शांती मात्र नसते. कधी कधी एक संकट सुरू झालं की त्या…

गरीब बिचारे लाकूडतोडे !

Posted by - October 26, 2023 0
चिपळूण : हजारो वर्षांपूर्वी एक गरीब लाकूडतोड्या होता आणि हजारो वर्षांनंतर आज असंख्य ग. बि. (गरीब बिचारे) लाकूडतोडे आपला उदरनिर्वाह…
Aditya L1

Aditya L-1: ‘आदित्य एल – 1’ चे स्वातंत्र्यदिनापूर्वी उड्डाण होण्याची शक्यता; काय आहेत त्याची वैशिष्ट्ये ?

Posted by - June 18, 2023 0
तब्बल 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताची महत्त्वाकांक्षी सौर मोहीम ‘आदित्य एल – 1’ (Aditya L-1) प्रत्यक्षात येत असून येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वी…
Lok Sabha Elections

Lok Sabha Elections : हर्षवर्धन जाधव पुन्हा छ. संभाजीनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

Posted by - March 31, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Elections) बिगूल वाजलं आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *