दिल्लीतील ट्वीन टॉवर आज होणार जमीनदोस्त; काय आहे कारण

287 0

नवी दिल्ली:  नोएडा येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर आज रविवारी (ता.28 ऑगस्ट) रोजी दुपारी अडीच वाजता पाडण्यात येणार आहेत.

इमारतविषयक नियमावलीचे उल्लंघन करून ही जुळी टॉवर बांधण्यात आल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे. त्यामुळे 40 मजल्यांच्या या दोन्ही इमारती पाडल्या जातील. या इमारती पाडण्याची जबाबदारी असलेल्या कंपनीतील 49 वर्षीय चेतन दत्ता हे या इमारती पाडण्याचे काम देण्यात आलेल्या एडिफिस इंजिनिअरिंग कंपनीत ‘ब्लास्टर’ म्हणून नोकरीला आहेत.

कसे पाडणार ट्वीन टॉवर?

या इमारत पडण्यासाठी ९ हजार ६४० खड्डे तयार करण्यात आले आहेत. त्यात ३ हजार ७०० स्फोटकं पेरण्यात आली आहेत. योग्य वेळी बटन दाबले की नऊ सेकंदात पत्त्यांच्या घराप्रमाणे हे टॉवर कोसळणार आहेत. दुखापत आणि सुरक्षेसाठी आसपासच्या लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हे टॉवर उभे करायला तेव्हा ७० कोटी खर्च आला होता पण आता या इमारती पाडण्यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सुमारे तीन वर्षात तयार झालेले हे टॉवर अवघ्या ९ सेकंदात जमीनदोस्त होणार आहेत. हे ट्विन टॉवर पाडण्यासाठी ४६ जणांची टीम काम करत आहे. हे टॉवर्स पाडल्यानंतर ३० मीटर उंचीपर्यंत ढिगारा तयार होईल, अशी शक्यता आहे. तर हा ढिगारा हटवण्यासाठी सुमारे तीन महिने लागतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे टॉवर्स पाडल्यानंतर परिसरात शेकडो मीटरपर्यंत धूळ पसरणार असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिओ फायबर शीट्स बसवण्यात आल्या आहेत. तर झाडांच्या सुरक्षेसाठी त्यांना काळ्या पांढऱ्या हिरव्या चादरीनं झाकण्यात आलं आहे.

Share This News

Related Post

लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा वाजवण्यासाठी 10 हजार स्पीकर्सची ऑर्डर

Posted by - April 15, 2022 0
मुंबई- मशिदीत अजानच्या वेळी लाऊडस्पीकर वाजवण्याच्या विरोधात भाजपने आता लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसाचे पठण करून लाऊडस्पीकरला उत्तर देण्याची तयारी केली आहे.…
PSLVC-56

ISRO : इस्रोची आणखी एक यशस्वी कामगिरी, सिंगापूरच्या 7 ग्रहांचं केलं यशस्वी प्रक्षेपण

Posted by - July 30, 2023 0
अंतराळ क्षेत्रात भारताने नवा इतिहास लिहिला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आज एकाच वेळी 7 उपग्रहांचे प्रक्षेपण केले…

रद्दी विक्रीतून केंद्र सरकारनं केली 63 कोटी रुपयांची कमाई !

Posted by - March 16, 2023 0
Edited By : रश्मी खेडीकर : मोदी सरकारने वेगळ्या प्रकारचे स्वच्छता अभियान राबवले असून यामधून सरकारला तब्बल ६३ कोटी रुपयांचा…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते कुशल संसदपटू; कसा आहे रामभाऊ म्हाळगी यांचा जीवनप्रवास

Posted by - July 9, 2022 0
भारतीय जनसंघाचे पहिले आमदार रामभाऊ म्हाळगी यांची आज जयंती  रामचंद्र काशीनाथ म्हाळगी ऊर्फ रामभाऊ म्हाळगी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  प्रचारक…

बच्चू कडूंना दिलासा ! 15 हजारांच्या जातमुचलक्यावर तात्पुरता जामीन मंजूर, वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - March 8, 2023 0
२०१७ सालच्या एका आंदोलनादरम्यान सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *