राज्यात नुकतीच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली यात खेडच्या शिवराज राक्षे 2023 चा महाराष्ट्र केसरी किताब जिंकला सध्या त्याचा सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत असून याच पार्श्वभूमीवर आतापर्यंत महाराष्ट्र केसरी किताब कोणी जिंकला याची माहिती देणारा TOP NEWS मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट…
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची सुरुवात 1961 मध्ये झाली असून महाराष्ट्र केसरी ही माती व गादी (मॅट) विभाग मध्ये होते. यामध्ये माती विभागातील विजेता मल्ल व गादी विभागातील विजेता मल्ल यांच्यात महाराष्ट्र केसरी गदे साठी अंतिम लढत आंतरराष्ट्रीय नियमांनुसार मॅट वर होते, आणि या अंतिम लढती मधील विजेता मल्ल हा ‘महाराष्ट्र केसरी’ म्हणून घोषीत करून महाराष्ट्र केसरीची मानाची गदा बहाल केली जाते.
कोण आहेत आतापर्यंतचे महाराष्ट्र केसरी
-
1)दिनकर दहय़ारी (औरंगाबाद, 1961)2) भगवान मोरे (धुळे, 1962),3) गणपतराव खेडकर (अमरावती, 1964), 4) गणपतराव खेडकर (नाशिक, 1965), 5) दीनानाथ सिंग (मुंबई, 1966), 6) चंबा मुतनाळ (खामगाव, 1976), 7) चंबा मुतनाळ (नागपूर, 1968), 8) हरिश्चंद्र बिराजदार (लातूर, 1969), 9) दादू चौगुले (पुणे, 1070), 10) दादू चौगुले (अलिबाग, 1071), 11) लक्ष्मण वडार (कोल्हापूर, 1972), 12) लक्ष्मण वडार (अकोला, 1973), 13) युवराज पाटील (ठाणे, 1974), 14) रघुनाथ पवार (चंद्रपूर, 1975), 15) हिरामण बनकर (अकलूज, 1976),16) आप्पासाहेब कदम (मुंबई, 1978), 17) शिवाजीराव पाचपुते (नाशिक, 1979), 18) इस्माईल शेख (खोपोली, 1980), 19) बापू लोखंडे (नागपूर, 1981), 20) संभाजी पाटील (बीड, 1982), 21) सरदार खुशहाल (पुणे, 1983),22) नामदेव मोळे (सांगली, 1984), 23) विष्णूजी जोशीलकर (पिंपरी चिंचवड, 1985), 24) गुलाब बर्डे (सोलापूर, 1986), 25) तानाजी बनकर (नागपूर, 1987), 26) रावसाहेब मगर (सोलापूर, 1988), 27) आप्पालाल शेख (सोलापूर, 1992), 28) उदयराज जाधव (पुणे, 1993),29) संजय पाटील (अकोला, 1994-95), 30) शिवाजी केकाण (नाशिक, 1995-96), 31) अशोक शिर्के (वर्धा, 1996-97), 32) गोरखनाथ सरक (नागपूर,1997-98), 33) धनाजी फडतरे (पुणे, 1998-99), 34) विनोद चौगुले (खामगाव, 1999-2000), 35) राहुल काळभोर (नांदेड, 2001), 36) मुन्नालाल शेख (जालना, 2001-02), 37) दत्तात्रय गायकवाड (यवतमाळ, 2002-03), 38) चंद्रहास निमगिरे (वाशी, 2003-04), 39) सईद चाउस (इंदापूर, 2004-05),40) अमोल बुचडे (बारामती, 2005-06), 41) चंद्रहार पाटील (औरंगाबाद, 2007), 42) चंद्रहार पाटील (सांगली, 2008), 43) विकी बनकर (सांगवी पिंपरी-चिंचवड, 2009), 44) समाधान घोडके (रोहा, 2010), 45) नरसिंग यादव (अकलूज – 2011), 46) नरसिंग यादव (गोंदिया – 2012), 47) नरसिंग यादव (भोसरी – 2013), 48) विजय चौधरी (अहमदनगर-2014), 49) विजय चौधरी (नागपूर-2015), 50) विजय चौधरी (वारजे-2016), 51) अभिजीत कटके (भूगाव-2017),52) बाला रफीक शेख (जालना-2017), 53) पैलवान हर्षद सदगीर (म्हाळुंगे-बालेवाडी-2019), 54) पृथ्वीराज पाटील (सातारा-22),55) शिवराज राक्षे (पुणे 2023)