TOP NEWS INFO VIDEO: भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधीजींचा फोटो पहिल्यांदा कधी छापण्यात आला..?

225 0

भारताच्या चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटोऐवजी लक्ष्मी देवीचा फोटो छापावा असा सल्ला सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला होता आणि आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर महालक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केलीये मात्र भारताच्या चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो असावा हे कुणी ठरवलं आणि या चलनी नोटांवर कुणाचा फोटो असावा हे ठरवण्याचे अधिकार कुणाला आहेत ? पाहूयात, आजच्या TOP NEWS INFO मध्ये…

प्रत्येक देशाच्या चलनी नोटांवर काही विशिष्ट फोटो असतात. प्रत्येक देशाची केंद्रीय बँक त्या त्या देशाचं चलन प्रसिद्ध करत असते. भारतात नोटा प्रसिद्ध करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त रिझर्व्ह बँकेला आहेत मात्र एक रुपयाची नोट मात्र भारत सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात येते. भारतीय चलनी नोटेवर कुणाचा फोटो असावा हे ठरवण्याचे अधिकार कुणाला आहेत ? चलनी नोटेवरून महात्मा गांधींचा फोटो हटवला जाऊ शकतो का ? भारत स्वतंत्र झाल्यापासून चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापला जातोय का ? महात्मा गांधीजींच्या आधी नोटांवर कुणाचा फोटो होता ? चलनी नोटेवर गांधीजींचा फोटो पहिल्यांदा कधी छापण्यात आला ? हेही जाणून घेऊयात…
भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं पण भारत देश 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक झाला. या दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेनं सध्या प्रचलित असणाऱ्या नोटा प्रसिद्ध करायला सुरुवात केली. 1949 मध्ये भारत सरकारनं पहिल्यांदा एक रुपयाच्या नोटेचं नवीन डिझाईन तयार केलं. त्यानंतर स्वतंत्र भारतासाठीचं नवं चिन्हं निवडायचं होतं. ब्रिटनच्या राजाच्या जागी नोटेवर महात्मा गांधीचा फोटो लावण्यात येईल, असं सुरुवातीला मानलं जात होतं. त्यानुसार डिझाईनही तयार करण्यात आलं मात्र महात्मा गांधींच्या फोटोच्या ऐवजी चलनी नोटेवर अशोक स्तंभ असावा, यावर एकमत झालं. 1950 मध्ये भारतीय प्रजासत्ताकात पहिल्यांदाच 2, 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या. 2, 5 आणि 100 च्या नोटेच्या डिझाईनमध्ये फारसा फरक नव्हता पण रंग वेगवेगळे होते. 10 रुपयांच्या नोटेच्या मागच्या बाजूला शिडाच्या होडीचा फोटो तसाच ठेवण्यात आला होता. 1953 मध्ये रुपयाचं बहुवचन ‘रुपये’ असेल असं ठरलं.1954 मध्ये एक हजार, दोन हजार आणि 10 हजार रुपयांच्या नोटा पुन्हा छापण्यात आल्या. 1978 मध्ये या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. म्हणजे 1978 मध्ये एक हजार, पाच हजार आणि 10 हजार रुपयांची नोटबंदी झाली. दोन आणि पाच रुपयांच्या लहान चलनी नोटांवर सिंह, हरीण अशा प्राण्यांचे फोटो छापण्यात आले पण 1975 मध्ये 100 च्या नोटेवर कृषी स्वावलंबन आणि चहाच्या मळ्यातून पानं खुडतानाचे फोटो दिसू लागले. महात्मा गांधींच्या 100 व्या जन्मदिनानिमित्त म्हणजे 1969 मध्ये पहिल्यांदा चलनी नोटेवर महात्मा गांधीजींचा फोटो छापण्यात आला. यामधले गांधीजी बसलेले होते आणि मागे सेवाग्राम आश्रम होता. 1972 मध्ये रिझर्व्ह बँकेनं 20 रुपयांची नोट पहिल्यांदा चलनात आणली आणि त्यानंतर 1975 मध्ये 50 ची नोट चलनात आणली. 80च्या दशकात नवीन सीरीजच्या नोटा छापण्यात आल्या. जुने फोटो हटवून त्यांच्या जागी नवीन फोटो आले. 2 रुपयांच्या नोटेवर विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आर्यभट्ट उपग्रहाचा फोटो होता. 1 रुपयाच्या नोटेवर तेलाची विहीर, 5 रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरने शेत नांगरणारा शेतकरी, 10 रुपयांच्या फोटोवर कोणार्क मंदिराचं चक्र, मोर आणि शालीमार बागेचं छायाचित्रं होतं. रिझर्व्ह बँकेनं ऑक्टोबर 1987 मध्ये पहिल्यांदाच 500 च्या नोटा चलनात आणल्या आणि त्यावरही महात्मा गांधींचं छायाचित्र होतं तर अशोक स्तंभ वॉटरमार्कमध्ये होता. 9 ऑक्टोबर 2000 रोजी एक हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली. भारतीय चलनात सर्वांत मोठा बदल करण्यात आला तो नोव्हेंबर 2016 मध्ये. 8 नोव्हेंबर 2016 रोजी महात्मा गांधी सीरीजच्या 500 आणि 1000 रुपयांच्या सर्व नोटा अवैध घोषित करण्यात आल्या. यानंतर 2000 रुपयांची नवीन नोट चलनात आणली गेली. तिच्यावरही महात्मा गांधींचं छायाचित्र आहे.

Share This News

Related Post

मानसिक आरोग्य : तुमचाही स्वभाव चिडचिडा झाला आहे? हे कारण असू शकतं, वेळेत करा आत्मपरीक्षण !

Posted by - December 21, 2022 0
मानसिक आरोग्य : अनेक जणांचा स्वभाव हा चिडचिडा असतो असं आपण म्हणतो. पण ते सत्य नाही. पुष्कळ वेळा एखाद्या व्यक्तीच…
Flight Cancelled

Flight Cancelled : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, हैदराबाद, गोव्याकडे जाणारी 14 विमाने रद्द

Posted by - December 29, 2023 0
पुणे : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, लखनौ, हैदराबाद, अमृतसर, गोवा या ठिकाणी जाणारी 14 विमाने रद्द (Flight Cancelled) करण्यात आली…

वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी 2022’ ॲप

Posted by - June 20, 2022 0
पुणे:- आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना वारीबाबत माहिती होण्यासाठी व त्यांना आवश्यक त्या सोई-सुविधासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘आषाढी वारी…

खास नववधूंसाठी ! लग्न तोंडावर आले पण चेहऱ्यावर येणारे पिंपल्स थांबेनात ? हे उपाय करून पहा

Posted by - February 17, 2023 0
लग्नाचा दिवस हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असतो. एकीकडे त्यांच्या मनात या दिवसाविषयी प्रचंड उत्साह आणि अस्वस्थता असते,…

मुख्यमंत्री छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान राखतील, संभाजीराजे छत्रपती यांचे सूचक वक्तव्य

Posted by - May 24, 2022 0
कोल्हापूर- राज्यसभेसाठी उत्सुक असलेले कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण याआधी सविस्तर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *