खास तुमच्या माहितीसाठी: असा साजरा झाला होता भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन

1140 0

आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनात रंगला आहे. याच दिवशी भारतानं संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून नावारूपाला आला. मात्र देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन कसा साजरा झाला होता.

पहिला प्रजासत्ताक दिन कर्तव्यपथावर नाही तर आयर्विन स्टेडियमवर साजरा करण्यात आला होता.
26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आल्यानंतर, देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील पुराना किल्ल्यासमोर आयर्विन स्टेडियमवर प्रथमच तिरंगा ध्वज फडकवला.

यानंतर प्रजासत्ताक दिनी सार्वजनिक सुट्टीही जाहीर करण्यात आली. पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

भारताने आपला पहिला प्रजासत्ताक दिन आयर्विन स्टेडियमवर साजरा केला, परंतु नंतर तो लाल किल्ला, किंग्ज वे कॅम्प आणि रामलीला मैदान येथे साजरा करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त लोक ज्या गोष्टीची सर्वाधिक वाट पाहतात ती म्हणजे परेड. प्रजासत्ताक दिन आणि परेड हे एक समीकरणच आहे. प्रजासत्ताक दिनाच नाव घेताच कर्तव्य मार्गावर म्हणजे पूर्वीच्या राजपथावर निघणाऱ्या परेडची झलक डोळ्यासमोर येते.

प्रजासत्ताक दिनाची शान असलेली परेड पहिल्या प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आली नव्हती.
1955 मध्ये पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनासाठी राजपथाची निवड करण्यात आली आणि इथून परेडचं आयोजन करण्यात आल.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा मार्ग ५ किलोमीटरहून अधिक लांब आहे. ही परेड राष्ट्रपती भवनाजवळील रायसीना हिलपासून सुरू होते आणि इंडिया गेटमार्गे लाल किल्ल्यावर संपते.

यापूर्वी 21 ऐवजी 30 तोफांची सलामी दिली जात होती.
मात्र, पुढे जाऊन ही सलामी 30 ऐवजी 21 तोफांची करण्यात आली आणि आता फक्त 21 तोफांची सलामी दिली जाते. ज्या 7 विशेष तोफांनी ही सलामी दिली जाते त्यांना पॉन्डर्स म्हणतात.

पहिला प्रजासत्ताक दिन हा अतिशय खास होता.त्या दिवसाच्या काही विशेष आठवणी पाहूयात

पहिल्या प्रजासत्ताक दिनी 31 शिपायांनी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना रांगेत उभं राहून दिली होती सलामी !

आताचे राष्ट्रपती बुलेटप्रूफ कारमधून आपल्या ताफ्यासह येतात मात्र पहिल्या प्रजासत्ताक दिनी डॉ. राजेंद्र प्रसाद घोडागाडीत बसून आले होते.

प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील ध्वजवंदनाची परंपरा आजही कायम आहे. पूर्वीप्रमाणे आजही राष्ट्रपती ध्वजवंदन करून राष्ट्रध्वजाला सलामी देतात.

प्रजासत्ताक दिन सोहळ्याला प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्याची परंपरा आहे. पहिल्या प्रजासत्ताक दिनाला इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्रपती सुकर्णो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अर्थात, त्यावेळी सुरक्षेचा मुद्दा आजच्या इतका गंभीर नव्हता.

पहिल्या प्रजासत्ताक दिनाचं संचलन आयर्विन स्टेडियम म्हणजे आताच्या नॅशनल स्टेडियमवर झालं होतं. हे संचलन पाहण्यासाठी सुमारे १५ हजार लोक उपस्थित होते.

पहिल्या प्रजासत्ताक दिनी चित्ररथ काढण्यात आले होते मात्र तेव्हाचे चित्ररथ अत्यंत साधे असायचे. हळूहळू त्यांचं स्वरूप बदलत गेलं

Share This News

Related Post

काय आहेत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघाताची कारणं ?

Posted by - August 14, 2022 0
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर  अनियंत्रित उतार, टोकदार वळणे या त्रुटींसह यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघाताची…
RASHIBHAVISHY

#DailyHoroscop : कन्या राशीच्या लोकांनी आज कोणाची टीका करण्यात वेळ वाया घालवू नका; वाचा तुमचे राशी भविष्य

Posted by - January 20, 2023 0
मेष रास : मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. गृहिणींनी स्वयंपाक घरात काम करताना दक्षता घ्या.…
Boys Special News

Boys Special News : शरीराच्या ‘या’ अवयवावरून तंतोतंत ओळखा मुलींचा स्वभाव; लग्न करण्याआधी मुलांनो नक्की वाचा….

Posted by - July 12, 2023 0
एखाद्या व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य काढण्याअगोदर तुम्हाला त्याला जाणून घेणे (Boys Special News) आवश्यक असते. पण आजकालच्या काळात एवढा वेळ कोणाकडे…

मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आलेले पंजाबचे आरोग्य मंत्री विजय सिंगला यांना अटक

Posted by - May 24, 2022 0
चंदीगढ – भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे पंजाबमधील वातावरण ढवळून निघाले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आप सरकारमधील आरोग्यमंत्री डॉ. विजय सिंगला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *