मनाची आंघोळ : नात्यांमध्ये दुरावा येतोय…? फक्त प्रेम नाही तर ‘ही’ भावना देखील आहे महत्त्वाची…

215 0

मनाची आंघोळ : नातेसंबंध कोणतेही असो त्यामध्ये दुरावा येणं हे क्लेशदायक असतं मग कारण कोणतेही असो मतप्रवाह विरुद्ध असणे स्वभाव न जुळणे विनाकारण एखाद्या व्यक्तीचा राग राग करणे कोणाच्यातरी यशामुळे इर्षा निर्माण होणे अशी एक ना अनेक कारणे असतात ज्यामुळे नातेसंबंधांमध्ये दुरावा येऊ लागतो 

आज आपण बोलणार आहोत ते पती-पत्नीच्या नात्याबद्दल पती-पत्नीचं नातं हे एक असं नातं आहे जे रक्ताचा तर नसतं पण खऱ्या अर्थाने कुटुंब वाढवणे यासाठी हे नातं सर्वात महत्त्वाचं असतं परंतु पूर्णपणे वेगळ्या वातावरणातून एकत्र आलेल्या दोघांना बऱ्याच वेळा एकमेकांना समजून घेणे खूप कठीण होत असतं एकमेकांच्या गरजा अपेक्षा समजावून घेत असताना सोबती येणाऱ्या नात्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना चांगलीच दमछाक होत असते त्यात जर नातं नवीन असेल तर ते आणखीनच कठीण होते मग अशावेळी काय करावे हेच नेमकं आज तुम्हाला सांगणार आहे…

1. कोणत्याही नात्यांमध्ये प्रेमाचा ओलावा पुन्हा निर्माण होण्यासाठी दुरावा आवश्यक आहे हो बऱ्याच वेळा कायम सोबत असणाऱ्या व्यक्तीची किंमत हळूहळू कमी होऊ लागते त्यामुळे सर्वप्रथम स्वतःला वेळ द्या त्या नात्यापासून काही काळ दूर जा अर्थात नातं तोडून नाही तर जस्ट टेक अ ब्रेक

2. पुरुषापेक्षा एखाद्या स्त्री कडूनच अधिक अपेक्षांचा डोंगर रचला जातो घरातली काम मुलांची बाळंतपण त्यांचं संगोपन करिअर शिक्षण सर्वांचे स्वभाव आणि त्यांच्या गरजा पूर्ण करता करता स्वतःच आयुष्य जगणं प्रत्येक स्त्री विसरून जाते अशावेळी पुरुषाकडून तिला फक्त प्रेमच नाही तर त्यासह आदरभाव आणि तिच्या अस्तित्वाची किंमत करणं खूप महत्त्वाचा आहे त्यामुळेच नात्यांमध्ये केवळ प्रेम नाही तर आदराची भावना असणे खूप जास्त आवश्यक आहे

3. एकमेकांना वेळ देणं हे सर्वात महत्त्वाचा आहे आता वेळ देणे म्हणजे नक्की काय तर तुमचं स्पष्ट शुद्ध अंतकरणाने आदर आणि प्रेमाच्या भावनाने तुझ्या माझ्याकडून अपेक्षा काय आहेत हे थेट विचारणं आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे

4. समोरच्याकडून आपण जेव्हा एखादी अपेक्षा करतो त्यावेळी ती नेहमीच बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवा अर्थात मी घरात खूप काम करते याची किंमत जर त्याने ठेवावी असं वाटत असेल तर तो देखील बाहेर जाऊन परिश्रम करतो याची मला जाणीव आहे हे समजावून सांगा यातून एकमेकांबद्दल आदरभाव वाढू लागेल

5. बोलणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच योग्य वेळी शांत राहणं देखील महत्त्वाचा आहे एकमेकांचं मन वाचण्याचा प्रयत्न करा ते तितकं देखील कठीण नाही कोणत्याही कारणाने जर आयुष्याचा जोडीदार विचार मग्न असेल चिडचिड करत असेल तर प्रत्येक वेळी त्याच क्षणाला बोललं गेलं पाहिजे असं गरजेचं नसतं थोडी वेळ जाऊ द्या

6. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने तिच्यावर आणि तिने त्याच्यावर विश्वास ठेवून आयुष्यभराचं नातं जोडलेलं असतं त्यामुळे तिच्या चुका चार चौघात किंवा त्याच्या चुका चारचौघात बोलणे पूर्णपणे बंद करा एकमेकांच्या चुका या चार भिंतींमध्ये एकमेकांशी बोलूनच कमी करून घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे इतर नाते तुमच्या मूळ नात्यांमध्ये डोकावू शकणार नाहीत

Share This News

Related Post

BIG NEWS : भीमाशंकरला निघालेल्या खासगी बसनं घेतला अचानक पेट; 26 प्रवासी महिला बचावल्या, बस खाक… पाहा VIDEO

Posted by - October 12, 2022 0
घोडेगाव : नाशिक येथील बस दुर्घटना ताजी असतानाच पुण्यातही अशीच एक बस दुर्घटना घडलीये. घटना उघडकीस आली आहे. या घटनेत…

देशातील पहिली हायड्रोजन कार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते लाँच

Posted by - March 19, 2022 0
टोयोटा किर्लोस्कर मोटरने बुधवारी इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीसह पायलट प्रोजेक्टचा भाग म्हणून, भारतातील पहिले ऑल-हायड्रोजन इलेक्ट्रिक वाहन मिराई  लाँच…

आजपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांना मिळणार लस, वृद्धांसाठी बूस्टर डोस

Posted by - March 16, 2022 0
नवी दिल्ली- भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत असली तरी या महामारीविरुद्धची लढाई सातत्याने सुरू आहे. 12 ते 14 वयोगटातील मुलांनाही…

…अखेर ठरलं! कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा ‘सस्पेन्स’ संपला; ‘या’ नेत्याच्या गळ्यात पडली मुख्यमंत्रीपदाची माळ

Posted by - May 18, 2023 0
बंगळुरू: कर्नाटक स्पष्ट बहुमतात (Karanataka cm) काँग्रेसनं सत्ता मिळवल्यानंतर डी.के. शिवकुमार (DK Shivkumar) की सिद्धरामय्या (Siddhramaiyya) यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्री…

#Social Media Influencer : तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहात का ? केंद्र सरकारने जाहीर केलेली ही नियमावली वाचा; अन्यथा होऊ शकतो 50 लाखाचा दंड

Posted by - January 23, 2023 0
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक इन्फ्लुएन्सर तयार होत आहेत. वेगवेगळे प्रोडक्ट्स विषयी माहिती देताना मात्र आता या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *