SPECIAL REPORT

SPECIAL REPORT: सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीत धुसफूस

2530 0

सांगली : संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचा पडघम वाचला असून महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रात लोकसभेचे 48 मतदार संघ असून 48 पैकी काही मतदारसंघात हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहेत यापैकीच एक असणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघात आता महाविकास आघाडीतील दोन पक्ष अर्थात ठाकरे गट आणि काँग्रेस उमेदवारीवरून आमने सामन्या आल्याचा पाहायला मिळत आहे यावरचा TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट…

सांगली लोकसभा मतदारसंघातून एसडी पाटील, शालिनीताई पाटील, मदन पाटील, प्रतीक पाटील यांसह अनेक दिग्गज नेत्यांनी खासदारकी भूषवली आहे… एकेकाळी सांगली लोकसभा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र 2014,2019 या दोन निवडणुकीमध्ये भाजपाचे संजय काका पाटील सांगलीतून विजयी होत आहेत यंदाही आता भाजपकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील रिंगणात उतरवलं आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेस सांगली लोकसभेसाठी इच्छुक होतं. मात्र ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने आता काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये कोल्ड वॉर रंगल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेस कडून विशाल पाटील हे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते…

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नेमकी लढत कशी झाली होती
2019 च्या लोकसभेत तिरंगी लढत पाहायला मिळाली होती.
भाजपाकडून संजय काका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून विशाल पाटील तर वंचित बहुजन आघाडी कडून गोपीचंद पडळकर रिंगणात होते.
या निवडणूकीत संजयकाका पाटील यांना 5,08,995 मतं मिळाली. विशाल पाटील यांना 3,44,643 तर गोपीचंद पडळकर यांना 3,00234 मतं मिळाली होती मिळाली.
या निवडणुकीत एकूण 65 टक्के मतदान झाले होते. त्यापैकी संजय पाटील यांना 4301, विशाल पाटील यांना 29.12 तर पडळकर यांना 25.37 टक्के मते मिळाली होती.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या या सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाने काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा फटका मविआला बसणार का हे पहाणं महत्वाचं असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Koyta Gang : पुण्यातील येरवडा परिसरात पुन्हा कोयता गॅंगची दहशत; घटना CCTV मध्ये कैद

Amravati News : महायुतीत फूट ! आनंदराव अडसूळ, बच्चू कडूंचा विरोध झुगारून भाजपची नवनीत राणांना उमेदवारी

Punit Balan : उद्योजक पुनीत बालन यांची लोणीतील विविध प्रकल्पांना दिली भेट

Suraj Chavan : सूरज चव्हाण यांची मालमत्ता ईडीकडून जप्त

Sarvangasana : सर्वांगासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

संगमनेरमध्ये महिला ओढतात हनुमानाचा रथ, काय आहे त्या मागील कारण ?

Posted by - April 6, 2023 0
हनुमान आणि महिला हे विसंगत असणारं समीकरण आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात ब्रह्मचारी असणाऱ्या मारुती देवाचा रथ ओढण्याचा मान महिलांना…
modi and nitish kumar

Loksabha : नितीशकुमारांनी NDAच्या बैठकीत ‘या’ 3 मंत्री पदाची केली मागणी

Posted by - June 6, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूक निकालानंतर एनडीएकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एनडीएने नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी…

#Mental Health : नैराश्यामुळे उचलले जाते टोकाचे पाऊल; अशी ओळखा लक्षणे, आपल्या जवळच्या माणसाला मानसिक त्रासातून वाचावा

Posted by - March 27, 2023 0
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेहिने वाराणसीतील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर आल्यापासून सर्वांनाच धक्का बसला आहे.…

आता रेल्वेमध्ये आई आणि बाळ सुखाची झोप घेणार, रेल्वेने दिला ‘बेबी बर्थ’

Posted by - May 11, 2022 0
नवी दिल्ली- लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी रेल्वे प्रवास सुखकर करण्यासाठी, रेल्वेने लखनऊ मेलच्या खालच्या बर्थमध्ये प्रायोगिक तत्त्वावर फोल्ड…

17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर,’या’ दिवशी होणार मतदान

Posted by - July 8, 2022 0
राज्यातील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. 18 ऑगस्टला मतदान होणार असून,या निवडणुकीची प्रक्रिया 20…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *