Gulab

विशेष लेख : खरं प्रेम की प्रेमाचा आभास?

1812 0

प्रेम ही अशी गोष्ट आहे जी एखाद्याला भिकाऱ्यापासून राजा बनवते तर एखाद्याला राजापासून भिकारी बनवते. फक्त आपल्याला आपले प्रेम शोधता आले पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते व्यक्त करता आले पाहिजे. पण सध्याच्या काळात लोकांनी प्रेमाची व्याख्याच बदलून टाकली आहे. एका क्षणिक सुखाला लोक प्रेमाची व्याख्या दिली जात आहे.

ज्येष्ठ व्यक्तीपासून तरुणवर्गापर्यंत आजकाल सगळेच खूपच फास्ट फॉरवर्ड झाले आहेत. कोणालाच खऱ्या प्रेमाची पडली नाही फक्त पडली आहे ती आपल्या लोक काय म्हणतील या इमेजची. याच अट्टाहासापायी एखादा बाप आपल्या मुलीला दलदलीत ढकलत असतो. बाप कधीच आपल्या मुलीचे वाईट चिंतत नाही पण आपल्या मुलीची बाजू समजूनही घेत नाही आणि इथूनच खऱ्या प्रेमाचा गळा घोटला जातो….

लोक काय म्हणातील या गोष्टी मुलांच्या आणि मुलींच्या मनावर घरातूनच बिंबविल्या जातात. काही प्रेम प्रकरण सोडली तर जवळजवळ 80% प्रकरण ही घरचे आणि लोक काय म्हणतील यामुळे तुटली आहेत. मग या सगळ्यातून मुलगी घर सोडून पळाली किंवा तिने आत्महत्या केली की हीच लोकं तुमचे संस्कार कुठेतरी कमी पडले म्हणून तुम्हाला दोष देतात. आणि मुलीला चारित्र्यहीन बोलून मोकळे होतात. पण तिने हे पाऊल का उचलले? याचा विचार करत नाहीत.

फक्त एकदा तुमच्या मुलीवर आणि तिला जो मुलगा आवडतो त्याच्यावर विश्वास ठेवला असता तर तुमची मुलगी तुमच्यासमोर असू शकली असती . पण लोक काय म्हणतील या भीतीने तुम्हीच आपल्या मुलीची, त्या मुलाची आणि त्यांच्या खऱ्या प्रेमाची हत्या करता.

मग मुले मुली हाच विचार करतात आपण ज्या मुलीवर प्रेम करतो किंवा ज्या मुलावर प्रेम करतो त्याला तर घरचे स्वीकारणार नाही. मग सुरू होतो प्रेमाचा टाईमपास… पण हाच टाईमपास एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो…

ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे दर्शना पवार मर्डर केस…ह्यामध्ये चूक जेवढी त्या मुलाची आहे तेवढीच त्या मुलीची देखील आहे…
दर्शना आणि राहुल एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. त्यांनी प्रेमाच्या शपथा देखील घेतल्या होत्या. त्यांचे प्रेम तेव्हा नुकतेच फुलू लागले होते. त्यांनी एकत्र संसार करायची अनेक स्वप्न रंगवली होती. यादरम्यान एक अशी घटना घडली आणि प्रेमाची संपूर्ण व्याख्याच बदलून गेली….

दोघांनी MPSC ची परीक्षा दिली होती. त्यामध्ये दर्शनाला यश मिळाले तर राहुलला अपयश आले. आपल्याला यश मिळाले तर पचावता आलं पाहिजे आणि नेमकं तेच दर्शनाला जमलं नाही. यश मिळताच दर्शना बदलली. . या यशाने ती पार भारावून गेली… आणि तिने राहुलला दुर्लक्षित करायला सुरुवात केली आणि त्याच्यासोबत असलेले प्रेमाचे नाते संपवले… मी एका अपयशी मुलाबरोबर आयुष्य का घालवू? असं स्वार्थी विचार तिने केला आणि इथेच तिचा घात झाला…

जर हे यश राहुलला मिळाले असते तर त्याने दर्शनाची साथ सोडली असती का? कदाचित सोडली नसती. अनेकदा आपण त्या मुलाला दोषी ठरवून मोकळे होतो. राहुलने आपले प्रेम वाचवण्यासाठी प्रयत्न देखील केले पण त्याला अपयश आले. त्याने दर्शनाच्या घरच्यांकडे वेळ देखील मागितला होता.. पण घरच्यांनी त्याला नकार दिला… आणि इथे राहुलमधील गुन्हेगार जागा झाला…आणि या सगळ्यानंतर घडलं दर्शना पवार हत्याकांड…आता तुम्ही म्हणाल या सगळ्यांमध्ये नेमकी चूक कोणाची? या सगळ्यात चूक दोघांची नाही. किंवा त्यांच्या कुटुंबियांची नाही. चूक आहे ती समाजाच्या मानसिकतेची…

आता ती कशी समजून घेऊया…
जर आपल्या मुलीचे लग्न एका अपयशी मुलासोबत लावून दिले तर समाज काय म्हणेल? तसेच आजच्या काळात कोणत्या मुलीने प्रेमविवाह केला तर तिच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघितले जाते असा विचार दर्शनाच्या आई – वडिलांनी केला.
तर दुसरीकडे दर्शनाने जर आपल्या प्रेमाला प्राधान्य दिले असते तर परिस्थिती काही वेगळीच असती. दर्शनाने राहुलला लग्नाला नकार दिला आणि दुसऱ्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिने एकदा राहुलचा विचार करायला हवा होता. ही दर्शनाची चूक ठरली.
आता राहुलची चूक म्हणजे त्याने दर्शना त्याला सोडून गेली हे त्याला सहन न झाल्याने त्याने केलेली तिची निर्घृण हत्या…. त्याने आपले प्रेम मिळवणासाठी अधिक प्रयत्न न करता टोकाचा निर्णय घेतला…..

या लोंकाच्या एकूण मानसिकतेचा विचार केला तर या सगळ्यांनी नातेवाईक आणि समाज काय म्हणेल या भीतीने आपापले निर्णय घेतले आणि याच निर्णयाने त्यांचा घात केला. दर्शनाने स्वतःला गमावले, राहुलने एक चांगली मैत्रीण गमावली आणि दर्शनाच्या कुटुंबीयांनी आपली तरुण मुलगी गमावली… अशा कितीतरी दर्शना, राहुल आणि त्यांचे कुटुंबीय आपल्या आजूबाजूला समाजात वावरत आहेत…फक्त आणि फक्त समाज काय म्हणेल या भीतीने…..

– अजय उभे
रिपोर्टर Top News मराठी

Ajay Ubhe

Share This News

Related Post

शिवसैनिकांनो, प्रतिज्ञापत्रावर सांगा… ‘कटर’ की कट्टर..?’

Posted by - July 2, 2022 0
आधी हाती शिवबंधन बांधून आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत, असं दाखवून देणं आणि आता आम्ही एकनिष्ठ शिवसैनिक आहोत, असं प्रतिज्ञापत्रावर लिहून…

‘आरोग्य हीच संपत्ती आहे ‘ : त्यासाठी ‘ या ‘ ९ सवयी अवश्य लावून घ्या

Posted by - August 29, 2022 0
‘आरोग्य हीच संपत्ती आहे’, तरीही आपल्यापैकी बहुतेकजण ही वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतरही दैनंदिन आरोग्याच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करतात. आपल्यापैकी कोणालाही आपल्या शरीरासाठी…
Suraj Mandhare

शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा! 40 शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे ACB ला पत्र

Posted by - June 6, 2023 0
मुंबई : शिक्षण क्षेत्रातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राज्यातील 40 शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे पत्र शिक्षण आयुक्त सूरज…
Pune News

सिलिंडरमधून गॅस भरताना झालेल्या स्फोटात 15 वर्षीय मुलीचा मृत्यू

Posted by - June 6, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील किरकटवाडी भागात एका किराणामाल दुकानात घरगुती वापराच्या…

नगरसेवक ते राज्यसभा खासदार; कसा आहे वंदना चव्हाण यांचा जीवनप्रवास

Posted by - July 6, 2022 0
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शांत, संयमी,अभ्यासू चेहरा अशी ओळख असलेल्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांचा आज वाढदिवस. आता पर्यंत वंदना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *