लतादीदींनी ज्या न्युमोनियाशी झुंज दिली तो वयोवृद्धांसाठी किती घातक आहे ? जाणून घ्या

106 0

कोरोना काळात मोठ्या प्रमाणात लोकांना न्यूमोनियाचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी तर कोविडमधून बरे झालेले रुग्ण नंतर न्यूमोनियाचे बळी ठरल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. भारतरत्न लता मंगेशकर यांनादेखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यातून बाहेर आल्या परंतु नंतर त्यांना लगेच न्यूमोनियाने ग्रासल्याने अखेर रविवारी त्यांचे निधन झाले. एकूणच हा न्युमोनिया किती घटक रोग आहे याची आपण माहिती घेऊया. 

न्यूमोनिया साधारणत: लहान मुले व वयोवृध्दांसाठी मोठ्या प्रमाणात घातक ठरु शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लहान मुले आणि वृद्ध दोघेही न्यूमोनियाचे सहज बळी पडतात आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये हा आजार खूप गंभीर बनतो. वृद्धत्वामुळे आणि प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे, ते वृद्धांच्या फुफ्फुसावर हल्ला करते. कोरोनानंतर जर न्यूमोनिया झाला असेल तर याकडे दुर्लक्ष व्हायला नको, कोरोना काळात आधीच कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती न्यूमोनियामुळे अजूच कमी होत असते. त्यामुळे खासकरुन वृध्दांनी याबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

इंडियन चेस्ट सोसायटीचे सदस्य डॉ. ए.के. सिंग सांगतात, न्यूमोनियामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या 5 ते 10 टक्के लोकांचा मृत्यू होऊ शकतो. गंभीर रुग्णांना आयसीयूमध्ये ठेवावे लागते, अशावेळी मृत्यूचे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत जाते. या रोगासाठी रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती विशेषतः जबाबदार असते. म्हणूनच वृद्धांमध्ये न्यूमोनिया धोकादायक आहे. वृद्धांच्या शरीराची प्रतिकारशक्ती फारशी चांगली नसते. अनेक वेळा जंतुसंसर्ग झाला की आपल्याला औषधे दिली जातात, ते रोगाशी लढतात, परंतु रोगाशी लढण्यासाठी आपली स्वतःची प्रतिकारशक्तीदेखील खूप महत्त्वाची असते. औषधांमुळे रोगाशी लढण्यास मदत होत असते. परंतु याला शरीराचीही सोबत असणे आवश्‍यक असते. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली असल्यास शरीरापासून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यातून मृत्यूचाही धोको संभवतो.

कोरोना काळात अनेक जण कोरोनातून बाहेर आल्यावर त्यांना म्युकरमायकोसिस, न्यूमोनिया अशा पोस्ट कोविडच्या समस्यांचा सामना करावा लागला आहे. कोरोनातून बाहेर पडल्यावर रोगप्रतिकाशक्ती कमी झालेली असते. त्यातच न्यूमोनियाची लागण झाल्यामुळे खासकरुन वृध्दांसाठी हे अधिक घातक स्वरुपाचे ठरत असते. डॉ. ए.के. सिंग यांच्या मते, न्यूमोनिया पोस्ट कोविडनंतरचा खातक प्रकार आहे. कोरोनानंतर निमोनिया झाला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.

कोरोनापासून देशात बुरशीजन्य न्यूमोनियाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. या न्यूमोनियामध्ये फुफ्फुसात संसर्ग होतो जो एक्स-रेमध्ये स्पष्टपणे दिसतो. गेल्या काही दिवसांपासून अनेक मृत्यूंच्या घटनांमध्ये गंभीर न्यूमोनियानेही जीव घेतल्याचे दिसून येत आहे. अशात बरे होण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधीही लागू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला खोकल्याबरोबर पिवळ्या रंगाचा कफ येत असेल. यासोबतच खूप ताप येत असेल, दीर्घ श्वास घेताना अडचणी येत असल्यास न्यूमोनियाची शक्यता नाकारता येत नाही. यात, रुग्णाला छातीच्या एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला वेदना होऊ शकतात. कधी-कधी जास्त ताप नाही पण इतर दोन लक्षणे असतील तर न्यूमोनिया होऊ शकतो. या आजारात फुफ्फुसांना सर्वाधिक त्रास होतो.

Share This News

Related Post

Salman Khan Case

Salman Khan Case : सलमान खान फायरिंग प्रकरणात मोठी अपडेट ! आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई

Posted by - April 27, 2024 0
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan Case) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा…

ऑस्करसाठी भारताकडून ‘या’ चित्रपटाची अधिकृत एन्ट्री ; RRR आणि द काश्मीर फाइल्स सारखे चित्रपट शर्यतीतून बाहेर

Posted by - September 20, 2022 0
ऑस्करसाठी भारतातून यंदा RRR आणि द काश्मीर फाइल्स हे चित्रपट शर्यतीत होते. या दोन्ही चित्रपटांची ऑस्करसाठी जोरदार चर्चा होत असतानाच…
SPECIAL REPORT

SPECIAL REPORT: सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीत धुसफूस

Posted by - March 28, 2024 0
सांगली : संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचा पडघम वाचला असून महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रात लोकसभेचे 48 मतदार…

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक ; हृदयविकाराचा झटका आल्याने एम्स रुग्णालयात उपचार सुरू

Posted by - August 11, 2022 0
विनोद वीर राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते आहे. काल ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना अचानक चक्कर…
Priya Berde

Priya Berde : प्रिया बेर्डें छोट्या पडद्यावर ‘या’ मालिकेतून करणार कमबॅक

Posted by - August 4, 2023 0
‘सिंधुताई माझी माई-गोष्ट चिंधीची’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मातृत्वाचा झरा बनून लाखो अनाथ लेकरांची आई झालेल्या सिंधुताई…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *