Pan Card Money

PAN Card संबंधित ‘ही’ एक चूक तुम्हाला पडू शकते 10 हजार रुपयांना; जाणून घ्या त्याबद्दल

1053 0

पॅन किंवा परमानेंट अकाउंट नंबर हा 10 अंकी अल्फान्यूमेरिक आयडी (PAN Card) आहे. जो भारतीयांसाठी एक महत्त्वाचे कायदेशीर ओळखपत्र आहे. आयकर विभागासाठी हे तुमचे महत्त्वाचे डॉक्यूमेंट (PAN Card) आहे. पण तुमच्याकडे फक्त एकच पॅन कार्ड (PAN Card) पाहिजे जर तुमच्याकडे दोन पॅनकार्ड असतील तर आयकर विभाग तुमच्यावर कारवाई करू शकतो.

काय कारवाई होऊ शकते?
जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असल्यास तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

दोन पॅन कार्ड कसे बनतात ?
1.अनेक अ‍ॅप्लीकेशन
तुम्ही पॅनसाठी अर्ज केला आणि नंतर तो वेळेवर पोहोचला नाही, मग तुम्ही पुन्हा अर्ज केला तर ते दोन्ही अर्ज मंजूर होऊन तुमचे दोन-दोन पॅनकार्ड तयार होतात.

Auto Pay : ऑटो पे वापरताय…? जाणून घ्या काय आहेत फायदे आणि तोटे ?

2.पॅनकार्डमध्ये चूक असल्यास
जर तुमच्या पॅनकार्डमध्ये काही चूक असेल आणि ती सुधारण्याऐवजी तुम्ही नवीनसाठी अर्ज केला असेल तर तुमचे दोन पॅन कार्ड तयार होतील.

3.लग्नानंतर नवीन पॅन तयार केले
लग्नानंतर महिला अनेकदा त्यांचे आडनाव बदलतात, त्यानंतर ते त्यांच्या पॅनमध्येही बदलावे लागते.मात्र काहीजण पॅन कार्डमध्ये बदल करण्याऐवजी नवीन पॅनकार्ड बनवून घेतात. त्यामुळे या प्रकरणात दोन पॅनकार्ड बनू शकतात.

4.फ्रॉडमुळे
काही लोक फसवणुकीसाठी अनेक पॅनकार्ड सोबत ठेवतात, जे बेकायदेशीर आहेत.

पॅन सरेंडर कसे करावे?
तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने पॅन सरेंडर करण्यासाठी अर्ज करू शकता. आपण आज दोन्ही पद्धती पाहुयात…

पॅन कार्ड ऑफलाइन सरेंडर कसं करायचं?
जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर तुम्हाला फॉर्म 49A भरावा लागेल. फॉर्ममध्ये सरेंडर करण्यासाठी पॅन कार्डचे डिटेल्स भरा आणि हा फॉर्म तुमच्या जवळच्या UTI किंवा NSDL TIN सुविधा केंद्रात सबमिट करा. त्याची एकनॉलेजमेंट पावती अवश्य ठेवा. तुमच्या अधिकारक्षेत्रातील असेसिंग ऑफिसरला पत्र लिहा. आयकर विभागाच्या वेबसाइटवर तुम्ही तुमच्या क्षेत्राचा ज्यूरिडिक्शन ऑफिसर कोण आहे हे शोधू शकता. या पत्रात तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर टाकलेली सर्व माहिती द्यावी लागेल. सरेंडर केल्या जाणाऱ्या डुप्लिकेट पॅनकार्डचे डिटेल्सही द्यावे लागतील. तुम्हाला डुप्लिकेट कार्डची कॉपी आणि NSDL TIN कडून मिळालेली एकनॉलेजमेंट पावती अटेस्ट करावी लागेल आणि जमा करावी लागेल.

अर्थकारण : Credit Score खराब झालाय ? सुधारण्यासाठी करा हे …

पॅन कार्ड ऑनलाइन सरेंडर कसे करावे?
जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड (PAN Card) असतील तर तुम्हाला ते ऑनलाईन पद्धतीने सरेंडर करायचे असेल तर तुम्हाला पॅन बदलण्याची रिक्वेस्ट अ‍ॅप्लीकेशन फॉर्म भरावा लागेल. ज्याच्या वरच्या बाजूला तुम्हाला तुम्ही वापरत असलेला पॅन क्रमांक टाकावा लागेल. आयटम क्र. 11 मध्ये, तुम्हाला दुसऱ्या पॅनचे डिटेल्स द्यावे लागतील. त्याची एक कॉपी देखील अटॅच करावी लागेल आणि नंतर NSDL वेबसाइटला भेट देऊन त्या ठिकाणी सबमिट करावी लागेल.

Share This News

Related Post

राज ठाकरे नंतर औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील ‘या’ तारखेला घेणार सभा

Posted by - April 30, 2022 0
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील औरंगाबादमध्ये सभा होणार आहे अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते…

नववर्ष, जयस्तंभास मानवंदना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान

Posted by - December 8, 2022 0
पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी त्यांना असलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१…

महापालिका निवडणुकांचा फैसला पुन्हा लांबणीवर; 17 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Posted by - November 11, 2022 0
पुणे : राज्यातील महापालिकांच्या लांबलेल्या निवडणुका नक्की कधी होणार यासंदर्भातला फैसला पुन्हा लांबणीवर पडला असून सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातील याचिकेवर…

‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 62 हजाराहून अधिक सेवांची निर्गती

Posted by - October 4, 2022 0
पुणे : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने १० सप्टेंबरपर्यंत प्रलंबित ६३…

भारत जोडो यात्रेसाठी पुण्यात काँग्रेसकडून फ्लेक्सबाजी

Posted by - November 12, 2022 0
सध्या संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेची चर्चा सुरू आहे आणि हीच भारत जोडो…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *