Pan Aadhar Link

Pan Aadhaar Link : पॅन-आधार कार्ड लिंक न केल्यास करदात्यांना भरावा लागणार आता ‘एवढा’ दंड

1845 0

मुंबई : आयकर विभागाच्या नियमांनुसार, ज्या करदात्यांनी 30 जून 2023 पर्यंत आपले पॅन कार्ड आधारशी लिंक (Pan Aadhaar Link) केले नाही, त्यांचे पॅनकार्ड 1 जुलै 2023 पासून इन-ऑपरेटिव्ह होईल असे सांगण्यात आले होते. जर एकदा पॅन कार्ड इन-ऑपरेटिव्ह झाले तर तुम्हाला तुमची कामे करता येणार नाहीत. यामध्ये आयकर रिटर्न भरण्यापासून ते बँकेकडून पैशांच्या व्यवहारापर्यंत सर्व गोष्टी ठप्प होतील. त्यामुळे पॅन कार्ड निष्क्रिय (Pan Aadhaar Link) असल्यास, तुम्ही 31 जुलैपूर्वी आयटीआर दाखल करू शकणार नाही.

Aadhar Card : जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आता आधार कार्डची गरज भासणार नाही; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

निष्क्रिय पॅन पुन्हा सक्रिय केल्यास, त्याला जास्तीत जास्त 30 दिवस लागतील. जर पॅन कार्ड सध्या निष्क्रिय असेल तर दंड भरल्यानंतर ते पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत, पॅन कार्ड (Pan Aadhaar Link) सक्रिय होईपर्यंत, आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत निघून जाण्याची शक्यता आहे. जर तुम्ही 31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर तुम्हाला उशिरा ITR भरावा लागेल. जर ITR भरायला उशीर झाला तर तुम्हाला जास्त दंड भरावा लागू शकतो.

PAN Card संबंधित ‘ही’ एक चूक तुम्हाला पडू शकते 10 हजार रुपयांना; जाणून घ्या त्याबद्दल

किती असेल दंड?
तुमचे जर एकूण उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला उशिरा ITR फाईलिंगसाठी 5,000 रुपये दंड भरावा लागेल. तुमचा पॅन सध्या निष्क्रिय असल्यास, तुम्हाला 5,000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. आणि तुमचा पॅन आधारशी लिंक (Pan Aadhaar Link) करण्यासाठी तुम्हला 1000 रुपये दंड भरावा लागेल. एकूणच 6 हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. जर, तुमचे एकूण उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त नसल्यास, उशिरा आयटीआर फाईलिंगसाठी 1,000 रुपये दंड लागेल.

Share This News

Related Post

Loksabha Election

Loksabha Election : शाई लावायचं बोट नसेल किंवा दोन्ही हात नसतील तर मतदानाची शाई कुठे लावतात?

Posted by - April 19, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी (Loksabha Election) एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. आजपासून मतनदाला संपूर्ण देशात सुरुवात झाली…

#Bikini PhotoShoot : मोनी रॉयच्या बिकनी फोटोशूटने सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ ; चहाते झाले घायाळ ! फोटो पहाचं

Posted by - February 6, 2023 0
#Bikini PhotoShoot : मोनि रॉय ही बॉलीवूडची एक सुंदर अभिनेत्री आहे. तिच्या आकर्षक नाक नक्शामुळे आणि बांधेसूद फिगरमुळे अनेक जण…

#Travel Diary : भारतातील ‘सातपुडा राष्ट्रीय उद्यान’ म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गचं ! वाचा कुठे आहे ? कसे पोहोचायचे आणि संपूर्ण माहिती PHOTO

Posted by - February 22, 2023 0
#Travel Diary : जंगल सफारी सध्या ट्रेंडमध्ये आहे. जंगल सफारीसाठी देशात असलेल्या राष्ट्रीय उद्यानात मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. काही…

‘आरोग्य हीच संपत्ती आहे ‘ : त्यासाठी ‘ या ‘ ९ सवयी अवश्य लावून घ्या

Posted by - August 29, 2022 0
‘आरोग्य हीच संपत्ती आहे’, तरीही आपल्यापैकी बहुतेकजण ही वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतरही दैनंदिन आरोग्याच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करतात. आपल्यापैकी कोणालाही आपल्या शरीरासाठी…

दहावी (SSC) बारावीचा (HSC ) निकाल उशिरा लागण्याची शक्यता ? शिक्षकांचा मूल्यांकन प्रक्रियेवर बहिष्कार

Posted by - April 23, 2022 0
सरकारने 100% सरकारी अनुदान देण्याची मागणी पूर्ण करावी यासाठी हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.विनाअनुदानित शाळांच्या महाराष्ट्र बोर्डाच्या अनेक शिक्षकांनी मूल्यांकन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *