आज शनिवार…! कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी अवश्य करा या उपायोजना

255 0

घर म्हटलं की भांड्याला भांडे लागणार हे खरच आहे. वादविवाद हे होतच असतात ,याला मूळ कारण असतं ते म्हणजे हाताची पाचही बोटं सारखी नसणं. पण जेव्हा एखादा छोटासा वाद विकोपाला जातो ,तेव्हा मात्र मनस्ताप सहन करावा लागतो .बऱ्याच वेळा घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करते . घरात येणारी व्यक्ती ही नकारात्मकता ( NAGATIVE ENERGY ) घेऊन येऊ शकते किंवा कुटुंबातील व्यक्ती बाहेर गेल्यानंतर ती त्यांच्या मागे सोबत येत असते . तर मग शनिवारच्या दिवशी हमखास या काही गोष्टी करून पहा तुम्हाला फरक नक्की जाणवेल. 

  1. शनिवारच्या दिवशी बाहेरून घरात येणाऱ्या व्यक्तीला उंबऱ्याशी थांबून पायावर पाणी घाला ,त्यानंतर डोळ्याला पाणी लावून अर्धा पोळीचा तुकडा उतरवून टाका . या व्यक्तीने घरामध्ये प्रवेश केल्यानंतर उरलेल्या पाण्याने उंबऱ्या भोवती ते पाणी शिंपडून टाका.
  2. घरामध्ये जर इतर कोणी नसेल तर घरात आल्यानंतर हातपाय धुवून घ्या.
  3. शनिवारच्या दिवशी हाताच्या मुठीमध्ये काळे धागे घट्ट धरा . त्यानंतर घरातील देवघरासमोर बसून अकरा वेळा रामरक्षा म्हणावी. हे धागे घरातील प्रत्येकाच्या हातात आणि पायात बांधावेत.
  4. शनिवारच्या दिवशी सायंकाळी घरामध्ये रामरक्षा ,मारुती स्तोत्र मोठ्या आवाजात म्हणावे .  त्यामुळे घरातील नकारात्मकता नक्की कमी होईल.
  5. रोज केल्यास उत्तम परंतु , शनिवारच्या दिवशी रामरक्षा लावल्यानंतर घरामध्ये कोळशावर उद आणि कापूर टाकून हा धूर घरभर पसरवा घराच्या कानाकोपऱ्यात हा धूर काही क्षणासाठी तरी कोंडला गेला पाहिजे
  6. या उपायोजनांमधून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करत नसून या काही उपायांनी मनावर येणारे दडपण कमी होते . अर्थात हे काळे धागे थेट कोणता परिणाम करत नसतील तरीही आपल्या सोबत कोणतीतरी शक्ती आहे , जी आपले रक्षण करेल अशी मनाला एक सोबत मिळते . त्यामुळे कोणतेही उपाय करताना मनामध्ये केवळ माझ्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी , त्यांचे आत्मबल वाढवणे आवश्यक आहे यासाठी हे उपाय करावेत .
Share This News

Related Post

Ram Mandir Ayodhya

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरासारखीच ‘ही’ आहेत भारतातील 7 प्रसिद्ध राम मंदिरे

Posted by - April 17, 2024 0
हिंदू पंचागानुसार, चैत्र शुद्ध नवमीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण हा दिवस आपण रामनवमी म्हणून साजरा करतो. या तिथीला…

अनोखी परंपरा : बीडमधील या गावात धुलीवंदनाच्या दिवशी काढली जाते जावयाची गाढवावरून मिरवणूक

Posted by - March 7, 2023 0
बीड : बीडच्या विडा गावातील निजाम काळात सुरू झालेली परंपरा आज तागायत कायम आहे. धुलीवंदनाच्या दिवशी गावात जावयाची गाढवावरून मिरवणूक…

HEALTH WEALTH : कितीही टेन्शन असुद्या… झोप शांत लागेल, पूर्ण झोप होईल, सकाळी ताजेतवाने वाटेल, फक्त करा हे घरगुती उपाय

Posted by - November 4, 2022 0
रात्री शांत झोप लागत नाही , लवकर झोप लागत नाही किंवा सकाळी उठल्यावर पण ताजेतवाने वाटत नाही अशा समस्या अनेकांना…
Shooting Star

Shooting Star: तारा तुटल्याचे दिसल्यावर खरंच मनातील इच्छा पूर्ण होते का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

Posted by - June 20, 2023 0
मुंबई : तुम्ही आकाशात कधीतरी तुटलेला, पडणारा तारा (Shooting Star) पाहिलाच असेल. हा पडणारा तारा पाहून अनेकजण आपली मनातील इच्छा…

नगरसेवक ते राज्यसभा खासदार; कसा आहे वंदना चव्हाण यांचा जीवनप्रवास

Posted by - July 6, 2022 0
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शांत, संयमी,अभ्यासू चेहरा अशी ओळख असलेल्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांचा आज वाढदिवस. आता पर्यंत वंदना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *