Liver Donate

Liver Donate : पोरीने ऋण फेडले! बापाला यकृत दान करून मरणाच्या दारातून माघारी आणले

919 0

पुणे : आईचा जास्त जीव हा तिच्या मुलामध्ये असतो, तर वडिलांचा जास्त जीव हा त्यांच्या मुलींमध्ये असतो असे म्हटले जाते. वडिलांचं आणि मुलींचं नातं हे खूप जगा वेगळं असतं. या गोष्टीचा प्रत्यय साताऱ्यामध्ये आला आहे. वडिलांचे यकृत नादुरुस्त (Liver Donate) झाल्याने मृत्यूच्या दारात पोहचलेल्या वडिलांना स्वतःचे यकृत दान (Liver Donate)  करून जीवदान देणारी मुलगी म्हणजे ऋतुजा उर्फ ह्रीदिशा शेखर माने. ऋतुजाने अवघ्या वयाच्या 18 व्यावर्षी यकृतदान (Liver Donate)केले. ऋतुजा ही मूळची सातारा जिल्हातील रहिमतपूर या छोट्याशा खेडेगावाची रहिवासी आहे. ऋतुजा हि पुणे विद्यापिठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात राहते.

ऋतुजाचे वडील शेखर माने हे राजकीय व्यक्तिमत्व आहे. त्यांनी 2017 मध्ये नगरपालिकेची निवडणूक लढवली त्यावेळी त्यांच्या घरचे सगळी लोक निकालाची वाट पाहत होते. निकाल हा त्यांच्या मनासारखा लागला. त्यावेळी कराड मध्ये शिकणारी ऋतुजा आणि पुण्यात शिक्षण घेणारा भाऊ उत्कर्ष वडील निवडणूक जिंकल्यामुळे गावाकडे जायला निघाले होते. पण अचानक प्रवासात असताना ऋतुजाच्या मैत्रिणीचा फोन आला कि तिच्या वडिलांची तब्येत खूप खालावली आहे आणि त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले आहे.

Mira Road Murder Case : विकृतीचा कळस ! मीरा रोड मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासा

त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले कि यकृत खराब झाले आहे. खूप कमी वेळ आहे. तात्काळ यकृत प्रत्यारोपण करणे गरजेचे आहे. नुकतीच निवडणूक झाल्याने त्यांना पैशाची अडचण होती. इकडून तिकडून कसे तरी पैसे जमा केले.पण आता गरज होती यकृत दात्यांची. सगळीकडे विचारणा केली पण कुठेही यकृत दाता भेटत नव्हता. वडील मरणाच्या दारात आहेत हे ऋतुजाला दिसत होते .पण अशा हतबल वेळी ऋतुजाने निर्णय घेतला कि आपण वडिलांना यकृत दान करून वडिलांना जीवदान द्यायचा. पण ऋतुजाच्या या निर्णयाला घरच्यांनी विरोध केला. की पुढे तिचे लग्न आहे, कोण मुलगा तिला स्वीकारणार ? तिला पुढे बाळंतपणांतही धोका येऊ शकतो, अशा साऱ्या शक्यता तिला डॉक्टर आणि घरच्यांनी समजावून सांगितल्या. पण ऋतुजा तिच्या निर्णयावर ठाम होती. तिने लग्न आणि मुलबाळ यापेक्षा वडिलांचं जीवन महत्वाचं आहे. आणि ती तिच्या यकृत दानावर ठाम राहिली. अखेर शस्त्रक्रिया यशस्वी झाली. ऋतूजा आणि तिचे वडील दोघेही ठणठणीत झाले.

अरे बापरे! चक्क सुरक्षा रक्षकाने रुग्णाला दिले इंजेक्शन; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

ऋतुजाचा जोडीदार होणार लष्करातील कॅप्टन
ऋतुजाच्या निर्णयामुळे तिचे कुटुंबीय खूप खुश आहेत. तिच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण त्याच बरोबर तिच्या कुटुंबाला आणि समाजाला तिच्या लग्नाची खूप चिंता होती. ऋतुजाचे लग्न होईल कि नाही? मुलांना जन्म देऊ शकेल कि नाही? पण डॉक्टरांनी शास्त्रीय कारणे देऊन तिला कसलाही धोका नसल्याचे सांगितले.आता ऋतुजा ही 24 वर्षांची असून भारतीय सैन्य दलातील कॅप्टन कडून लग्नाची मागणी आली आहे. ऋतुजा 27 जून रोजी विवाह बंधनात अडकून आयुष्याची नवीन सुरवात करणार आहे.

Share This News

Related Post

BREAKING : पुण्यातील इंदापूरमध्ये 3500 फूट उंचीवरून कोसळलं कार्गो विमान …

Posted by - July 25, 2022 0
इंदापूर : पुण्यातील इंदापूर मध्ये एक कार्गो विमान कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली आहे. याबाबत मिळालेल्या सविस्तर…

धन्यवाद गुजरात! लोकांनी विकासाच्या राजकारणाला आशीर्वाद दिला! गुजरात विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट

Posted by - December 8, 2022 0
गुजरात : गुजरातमध्ये भाजपला अपेक्षेप्रमाणे मोठे यश मिळाले आहे. गुजरातमध्ये अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः मुख्यमंत्री असताना जेवढे यश…

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात २१ हजार सूर्यफुलांची आरास

Posted by - April 4, 2023 0
चैत्र महिन्यात वसंत ऋतू मध्ये विविध फुलांना बहर येत असतो, त्यातीलच एक असलेल्या सूर्यफुलांचा अभिषेक मंगळवारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला…

Vice Presidential Election : 6 ऑगस्टला होणार उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक

Posted by - July 21, 2022 0
नवी दिल्ली : २१ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक पार पडते आहे. दरम्यान उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणूक प्रक्रिया ६ ऑगस्ट २०२२…
Mira Road Murder Case

मीरारोड हत्या प्रकरणात आरोपीने केला ‘हा’ मोठा खुलासा; म्हणाला ती माझ्या मुलीसारखी…

Posted by - June 9, 2023 0
मुंबई : मिरारोडच्या गीतानगरमध्ये एका व्यक्तीने लिव्ह इन पार्टनरची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस येताच मोठी खळबळ माजली होती. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *