खुशखबर ! मोबाईल आणि टीव्ही आजपासून स्वस्त

332 0

ग्राहकांसाठी खुशखबर ! तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही किंवा मोबाईल घेणार असाल तर तुमच्यासाठी एका चांगली बातमी. आज १ एप्रिलपासून इलेक्ट्रिक घटकांवरील सीमाशुल्क 5 टक्क्यांवरून 2.5 टक्के करण्यात आले असल्यामुळे स्मार्ट टीव्ही आणि मोबाईल स्वस्त झाले आहेत. याबाबतची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात केली होती.

अर्थसंकल्प 2023-24 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयात केलेल्या इलेक्ट्रिक घटकांवरील सीमाशुल्क 5 टक्क्यांवरून 2.5 टक्के कमी करण्याची घोषणा केली होती, जी आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2023 पासून लागू होत आहे. अशा परिस्थितीत टीव्ही आणि मोबाईलच्या निर्मितीमध्ये कमी खर्च येईल, ज्यामुळे टीव्ही आणि मोबाईलची किंमत कमी होऊ शकते.

ओपन सेलच्या घटकांवरील सीमाशुल्कात कपात केल्याने टीव्हीच्या किमती सुमारे 5 टक्क्यांनी कमी होऊ शकतात. LED बनवण्यात ओपन सेल पॅनेलचा वाटा सुमारे 60-70 टक्के आहे. देशात बनवलेल्या बहुतेक स्मार्ट टीव्हीसाठी, ओपन सेल पॅनेल इतर देशांमधून आयात केले जातात. अशा परिस्थितीत सीमाशुल्कात कपात केल्यामुळे एलईडी टीव्हीची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.

अर्थमंत्र्यांच्या घोषणेनुसार, स्थानिक पातळीवर बनवलेले टीव्ही सुमारे तीन हजार रुपयांनी स्वस्त होऊ शकतात. टीव्हीशिवाय लिथियम-आयन बॅटरी, कॅमेरा लेन्स यांसारख्या वस्तूंवरही सीमाशुल्क कपात करण्यात आली आहे. अशा स्थितीत या वस्तूंच्या किमतीत घट दिसून येत आहे. सर्व प्रथम, 2019 मध्ये शुल्क रद्द करण्यात आले. त्यानंतर 2020 मध्ये पुन्हा शुल्क लागू करण्यात आले होते, जे आता 2.5 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

गरीब बिचारे लाकूडतोडे !

Posted by - October 26, 2023 0
चिपळूण : हजारो वर्षांपूर्वी एक गरीब लाकूडतोड्या होता आणि हजारो वर्षांनंतर आज असंख्य ग. बि. (गरीब बिचारे) लाकूडतोडे आपला उदरनिर्वाह…

साईनगरी शिर्डी : माहिती , इतिहास , महत्व ; असे पोहोचा साई दरबारी ; देवस्थानाविषयी सविस्तर माहिती

Posted by - August 29, 2022 0
अहमदनगर (शिर्डी) : शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १०…

#INFORMATIVE : वारसा प्रमाणपत्र म्हणजे काय ? नॉमिनी आणि वारसदारातील फरक,जाणून घ्या हि माहिती

Posted by - February 17, 2023 0
आपण एखाद्या बँकेत खाते सुरू करतो किंवा एखाद्या योजनेत गुंतवणूक करतो तेव्हा त्या अर्जात नॉमिनीचा उल्लेख करण्याचे सांगितले जाते. कारण…

आज गुड फ्रायडे, काय आहे गुड फ्रायडेचा इतिहास ?

Posted by - April 15, 2022 0
गुड फ्रायडे हा ख्रिश्चन समाजाचा हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. गुड फ्रायडेला ‘होली फ्रायडे’ किंवा ‘ग्रेट फ्रायडे’ असेही म्हणतात. ख्रिश्चन…

108 मेगापिक्सल कॅमेरा असलेले ‘हे’ पाच स्मार्टफोन अगदी स्वस्तात उपलब्ध

Posted by - May 2, 2022 0
108 मेगापिक्सल कॅमेरा असलेले पाच स्मार्टफोन सध्या बाजारात उपलब्ध झाले आहेत. मोटोरोला, रिअलमी, रेडमी, सॅमसंग या सारखे मोठ्या ब्रँडचे हे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *