मुलांच्या आहारामध्ये ‘या’ गोष्टींचा समावेश करा, मुलं बनतील चाणाक्ष आणि फिट

229 0

आजच्या परिथितीत मुलांना खुप धावपळ होते.अभ्यास,शाळा, वेगवेगळे क्लास त्यामुळं मुलांना जास्त एनर्जीची गरज असते.प्रत्येक गोष्टींत खुप कॉम्पिटेशन आहे आणि त्यात यश मिळवण्यासाठी बुद्धीबरोबर मुलांचा शारीरिक विकास होणेही तेवढेच गरजेचं आहे.त्यामुळं मुलांच्या आहारात खालील पदार्थांचा समावेश नक्की असावा.

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य आहाराची खुप गरज असते. मुलांना हिरव्या भाज्या, कडधान्य हे पदार्थ खाण्याचा खुप कंटाळा येतो. त्यांचा पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईस या फास्टफूडवर जास्त भर असतो.स्पोर्ट्स मध्ये मुलांना फास्ट फुड खाण्यास बंधन घातले जाते कारण की, फास्ट फूड खाल्याने इम्युनिटी पॉवर कमी होते. फास्ट फूड हे शरीराला हानिकारक असते त्यामुळं हे सर्वांनीच खाणं टाळलं पाहिजे. लहान मुलांच्या जेवणात या गोष्टी तुम्ही अशा पद्धतीनं देऊ शकता.

दही

दह्यामध्ये प्रोटीन खुप प्रमाणात असतात. तसेच आयोडीन, झिंक, व्हिटॅमिम बी – 12 दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामवेश असतो. आणि हे सगळे घटक मेंदूच्या विकासासाठी खुप उपयुक्त ठरतात .त्यामुळं मुलांना प्लेन दही देऊ शकता किंवा,मुलं गाजर, काकडी खात नाहीत अशा वेळी हे पदार्थ खिसुन दह्यामध्ये टाकुन,त्यात थोडी साखर घालून मुलांना देऊ शकता. त्यामुळं मुलांच्या आहारात दही जाईलच पण त्याचबरोबर सॅलेड सुद्धा खाण्यात जाईल.

भिजवलेले बदाम

बदामामध्ये फॉस्फरस, लोह, कॅल्शिअम, व्हिटॅमिन बी,प्रोटीन हे घटक असतात. मुलांच्या आहारात बदामाचा सामवेश असणे खुप गरजेचे असते. बदामाच्या नियमित सेवनानं मेंदूचा चांगला विकास होतो. आकाराने लहान असलेले बदाम आरोग्यासाठी खुप फायदेशीर ठरतात.मुलांना सुके बदाम देऊ शकता पण भिजवलेले बदाम दिल्यास जास्त चांगले. भिजवलेले बदाम पचण्यास सोपे असतात. रोज 5 ते सहा बदाम रात्री भिजू घालुन सकाळी मुलांना खायला दिल्यास खुप फायदेशीर ठरतात. मुलांना फक्त भिजवलेले बदाम खायला आवडत नसतील तर ते खिसून दुधामध्ये टाकुन देऊ शकता. तसेच सुक्या बदामाची पाउडर बनवून गरजेनुसार शिऱ्यामध्ये तसेच दुधात घालु शकता. अशा पद्धतीनं मुलांच्या आहारात बदामाचा समावेश करू शकता.

अंडी

पोषक गुणधर्मांचा खजिना असणारा पदार्थ म्हणजे अंडी.अंड्यामध्ये पोषक तत्वे आणि प्रोटीन् चा समावेश जास्त प्रमाणात असतो. उकडलेले अंडे दररोज खाल्याने मेंदूचा विकास तर होतोच पण तुमचा स्टॅमिना खुप वाढतो. स्पोर्ट्स मध्ये असणाऱ्या मुलांच्या आहारात अंड्याचा समावेश असणे खुप गरजेचे आहे.

संत्री

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी चा समावेश खुप प्रमाणात आढळून येतो. मुलांच्या आहारात संत्रे असणे खुप गरजेचे आहे. नियमित संत्री खाल्याने मुलांमध्ये उत्साह निर्माण होतो. पॉसिटीव्ह एनर्जी मिळते तसेच मेंदू व शरीराच्या वाढीसाठी संत्र्याच सेवन करणे खुप आवश्यक आहे.

मुलांच्या आहारात या सगळ्या पदार्थांचा सामवेश असणे खुप आवश्यक आहे.

Share This News

Related Post

अबब! पुण्यातील रस्त्यावर आढळला चक्क पांढरा कावळा

Posted by - April 9, 2023 0
आजपर्यंत आपण कावळा हा काळा रंगाचा पाहिला असेल. मात्र आता पुण्यातील लुल्ला नगर परिसरामध्ये पांढरा कावळा पाहायला मिळाला. एकूणच पांढऱ्या…

महेश मांजरेकर यांच्या ‘वीर सावरकर’ चित्रपटाचा पहिला लूक सादर (व्हिडिओ)

Posted by - May 28, 2022 0
आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 139वी जयंती आहे. याच दिवसाचे औचित्य साधून दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते संदीप सिंग आणि आनंद पंडित…

प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाकडून मंजूर

Posted by - April 12, 2022 0
मुंबई- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. बोगस…
Beed Warkari

वारकऱ्यांच्या दिंडीचा अपघात ! दिंडीत रिक्षा घुसल्याने अनेक वारकरी जखमी

Posted by - June 13, 2023 0
बीड : जळगाव जिल्ह्यातील रावेरहून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीचा बीडमध्ये अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन वारकरी गंभीररित्या जखमी…

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धा ! मालाडमध्ये बॅनरबाजी; लिहिले छोटा राजन ‘आधारस्तंभ’ आणि मग पोलिसांनी थेट..

Posted by - January 16, 2023 0
मुंबई : मालाडमध्ये नुकताच एक अचंबित करणारा प्रकार घडलाय. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईच्या मलाड परिसरामध्ये कबड्डी स्पर्धेचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *