Ram Mandir

Ram Mandir : 22 जानेवारीला तुमच्या घरी कशाप्रकारे कराल श्रीरामाची पूजा

5194 0

मुंबई : 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir) होणार आहे. हा दिवस भारतीयांसाठी केवळ ऐतिहासिक असाच नाही, तर धर्मिकदृष्ट्या ही खूप महत्त्वाचा असणार आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी तुम्हाला अयोध्येत जाणं शक्य नसेल, तर तुम्ही तुमच्या घरी प्रभू श्रीरामाची पूजा करून रामलल्लाला प्रसन्न करू शकता. आता ही पूजा कशाप्रकारे करायची याबद्दल आज थोडक्यात माहिती जाणून घेऊया…

22 जानेवारीला तुमच्या घरी कशाप्रकारे कराल प्रभू श्रीरामाची पूजा
सर्वात प्रथम तुमच्या घरातील देवघराची स्वच्छता करा. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. आता चौरंग किंवा पाटावर लाल कापड टाका, व प्रभू श्रीरामाची मूर्ती किंवा फोटो त्यावर उपाय ठेवा. श्रीरामाचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रीरामाची पूजा सुरू करण्यापूर्वी हनुमानाची पूजा करा, व लाल वस्त्र अर्पण करा. कारण असं मानलं जातं की, हनुमानाच्या पूजेशिवाय भगवान श्रीरामाचे आशीर्वाद मिळत नाही.

यानंतर प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला अभिषेक करा, पंचामृताने स्नान घाला. पुन्हा साध्या पाण्यानं मूर्तीला स्नान घाला. आता श्रीरामाला धूप, दीप, फुलं अर्पण करा, गंध लावा. श्रीरामाच्या नैवेद्यात मिठाई आणि सुकामेवा ठेवा. रामजन्म स्तुती म्हणत पूजा सुरू करा. प्रभू रामाची पूजा करताना तुम्ही रामरक्षास्तोत्र म्हणू शकता. रामस्तोत्र पठण केल्यानं रामाचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहील. रामाच्या आरतीनं पूजेची सांगता करा. तुम्ही रामचरितमानस देखील म्हणू शकता किंवा तुमच्या घरी रामायण पठण आयोजित करू शकता. तसेच प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी संध्याकाळी घराच्या दारात, अंगणात दिवे लावा.

पूजा करण्याच्या अगोदर या गोष्टींची काळजी घ्या
घरामध्ये प्रभू श्रीरामाची पूजा करण्यापूर्वी घरामध्येही स्वच्छता ठेवा. देवघर पूर्णपणे स्वच्छ करा. देवघरात कोणत्याही प्रकारची धूळ नसावी. देवघरातील सर्व मूर्तींना स्नान घालावे. देवाचे फोटो स्वच्छ पुसावेत. देवघराच्या सभोवतालची जागा पूर्णपणे स्वच्छ करावी. घरातील ईशान्य कोपरा स्वच्छ करा. असं केल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा येते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bus Accident : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात

Ram Mandir : कोण आहे कांबळे दाम्पत्य? ज्यांना महाराष्ट्रातून मिळाला रामलल्लांच्या महापुजेचा मान

Sharad Pawar : ‘…अन् पाकिस्तानच्या गोळीबारातून आम्ही थोडक्यात वाचलो’, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Kangana Ranaut : ‘अयोध्या म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी…’, कंगणा राणावतचे वक्तव्य

Amit Shah : भारत-म्यानमार सीमेवरील मुक्तसंचार बंद; गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा

IPLची टायटल स्पॉन्सरशिप टाटाकडेच; 5 वर्षांसाठी मोजले ‘एवढे’ कोटी

Sharad Pawar : ‘नवरा जर रुबाब करत असेल तर..’ शरद पवारांनी महिलांना दिला ‘हा’ सल्ला

Viral Video : गुलाबी शरारा फेम ‘त्या’ शिक्षिकेने राम लल्लाच्या गाण्यावर धरला विद्यार्थांसोबत ठेका

Bhausaheb Rangari Ganapati : अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

Tea : चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे?

Satara News : खळबळजनक ! राजवाडा परिसरात अर्धनग्नावस्थेत आढळला जळालेला मृतदेह

MPSC Result : कोशिश करनेवालों कभी हार नहीं होती! ‘एवढ्या’ वेळा अपयश येऊनदेखील पूजा वंजारीने MPSC मध्ये मारली बाजी

Share This News

Related Post

Pune News

Pune News : राममंदिरानंतर आता पुणेकरांना पुण्येश्वर मंदिर मिळालेच पाहिजे : सुनील देवधर

Posted by - February 11, 2024 0
पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राम मंदिर उभे राहू शकले असून, ज्याप्रमाणे देशाला राम मंदिर मिळाले, त्याप्रमाणे पुणेकरांना…

Natural Disasters : पाऊस, भूस्खलन आणि आपली सुरक्षा

Posted by - July 15, 2022 0
पावसाळा हा निसर्गाला हिरवा शालू नेसवणारा ऋतू आहे. मनुष्य, पशु, पक्षांना आनंदधारांमध्ये भिजवून टाकणाऱ्या जलधारा मनसोक्त बरसू लागल्या म्हणजे उन्हाळ्यातील…

#VIRAL VIDEO : नवऱ्यामुलाच्या मोठ्या भावाला हार घालायला गेली नवरीची बहीण; व्हिडीओ पाहून हसणे थांबवू शकणार नाही !

Posted by - March 2, 2023 0
लग्नाच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण असते. विशेषत: मुला-मुलींमध्ये अधिक चातुर्य दिसून येते. याचा पुरावा सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत पाहायला…

मानसिक आरोग्य : तुमचाही स्वभाव चिडचिडा झाला आहे? हे कारण असू शकतं, वेळेत करा आत्मपरीक्षण !

Posted by - December 21, 2022 0
मानसिक आरोग्य : अनेक जणांचा स्वभाव हा चिडचिडा असतो असं आपण म्हणतो. पण ते सत्य नाही. पुष्कळ वेळा एखाद्या व्यक्तीच…
Leap Day 2024

Leap Day 2024 : लीप इयर म्हणजे काय? काय आहेत यामागच्या रोमांचिक गोष्टी

Posted by - February 29, 2024 0
मुंबई : जवळपास दर चार वर्षांनी, 29 फेब्रुवारीच्या (Leap Day 2024) रूपात कॅलेंडरमध्ये एक अतिरिक्त दिवस जोडला जातो ज्याला लीप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *