गुगलची नवीन घोषणा तुमच्यासाठी महत्वाची आहे, जाणून घ्या

288 0

नवी दिल्ली,- गुगलने नवी मोठी घोषणा केली आहे. गुगल सर्चमधून फोन नंबर, ईमेल, अॅड्रेस हटवण्यासाठी परवानगी दिली आहे. लोकांच्या संवेदनशील माहितीचा दुरुपयोग समाज विघातक व्यक्तींकडून होऊ नये. या गोष्टींना पायबंद घालण्यासाठी गुगलने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. Google ने लोकांना काही संवेदनशील, वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती सर्चमधून हटवण्याची परवानगी दिली आहे.

गुगल सर्चचे ग्लोबल पॉलिसी प्रमुख मिशेल चांग यांनी सांगितलं, की इंटरनेट सतत विकसित होत आहे. त्याद्वारे माहिती अनपेक्षित ठिकाणी येणं आणि ती नवीन मार्गांनी वापरणं यामुळे आमची धोरणं आणि सुरक्षितता देखील विकसित होणं आवश्यक आहे. जर कंटेंट सार्वजनिक वेबसाइटवर रेकॉर्ड म्हणून लिस्ट असेल तर तो काढला जाणार नाही अशी माहितीही चांग यांनी दिली आहे.

रिपोर्टनुसार, बऱ्याच वेबसाइट अशी सेवा देतात दिथे एखादी व्यक्ती सदस्यता घेऊ शकते किंवा इतरांचे ईमेल आणि फोन नंबर मिळवण्यासाठी पैसे पेमेंट करू शकतात. अशा बहुतेक प्रकरणांमध्ये माहिती बेकायदेशीरपणे शेअर केली जाते आणि Google द्वारे शोधली जाऊ शकते.

Google ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, गुगलची नवी पॉलिसी अशी माहिती हटवण्याची परवानगी देते, जी सर्च रिझल्टमध्ये दिसल्यास गोपनीय लॉग-इन क्रेडेंशियलसारख्या डिटेल्स चोरी होण्याचा धोका निर्माण करते.

Share This News

Related Post

ई-पासपोर्ट म्हणजे काय आहे, तो कसा वापरता येईल ?

Posted by - May 22, 2022 0
भारतीय नागरिकांचा विदेशातील प्रवास सोपा व्हावा, या दृष्टीने ई-पासपोर्टची निर्मिती करण्यात येणार आहे.ई-पासपोर्ट हे नवीन तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे सोबतच…

विधिमंडळात एकमतानं मंजूर झालेलं लोकयुक्त विधेयक नेमकं आहे तरी काय

Posted by - December 30, 2022 0
  केंद्र सरकारनं लोकपाल कायदा केल्यानंतर राज्यांनी देखील अशाच पद्धतीचा कायदा करण्याची अपेक्षा होती त्यानुसार लोकायुक्त कायदा करणारे महाराष्ट्र हे…

पंतप्रधानांच्या पुणे दौरा पार्श्वभूमीवर काळे कपडे घालून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

Posted by - March 6, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. मात्र, पंतप्रधानांच्या या दौऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसने…

रक्षाबंधन विशेष : असा बनवा सोप्या पद्धतीने ‘ नारळी भात ‘

Posted by - August 11, 2022 0
रक्षाबंधन विशेष : श्रावण महिन्यानंतर अनेक सणवार एकापाठोपाठ येत असतात प्रत्येक सणाला काहीतरी विशेष पदार्थ देखील करण्याची आपल्याकडे पद्धत आहे.…

सावधान…! गॅस गिझरच्या दुर्घटना रोखण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या

Posted by - February 7, 2022 0
गेल्या काही दिवसांपासून गॅस गिझरमुळे गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. नाशिकमध्ये एका महिला वैमानिकाचा गुदमरून मृत्यू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *