Gattari Utsav

Gattari Utsav : गटारीनिमित्त भाजपकडून कोंबडी वाटप; ‘या’ ठिकाणी मिळणार मोफत कोंबडी

1956 0

मुंबई : गटारी अमावस्येनिमित्त (Gattari Utsav) भाजपच्या वतीनं मोफत कोंबडी वाटप करण्यात येणार आहे. याचे पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टरवर कोकण विकास आघाडीचं नाव आहे. दिप अमावस्या गटारी निमित्त (Gattari Utsav) कोंबडी वाटप असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे. या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटोदेखील आहे.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना फ्रान्सचा ‘लीजन ऑफ ऑनर’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान !

तसेच या पोस्टरवर भाजपचे पदाधिकारी बबन तोडणकर आणि चेतन देवळेकर यांचं आयोजक म्हणून तर भाजप मुंबई सचिव सचिन विद्याधर शिंदे यांचं नाव देखील या पोस्टरवर छापण्यात आले आहे. सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

UPI Lite : आनंदाची बातमी ! आता GPay वरून PIN न टाकता झटपट करता येईल पेमेंट

आज शनिवारी सायंकाळी 6 वाजता कोंबडी वाटपचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. प्रभादेवी नाका (सर्कल), प्रभादेवी या ठिकाणी हा कोंबडी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या पोस्टरवर भाजपच्या सर्वच बड्या नेत्यांचे फोटो देखील छापण्यात आले आहेत. यामुळे या पोस्टरची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

Share This News

Related Post

महाविकास आघाडीतील मंत्री राज्यपालांच्या भेटीला; ओबीसी आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता

Posted by - March 8, 2022 0
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात सायंकाळी भेट घेतली. विधानसभा…

#SUMMERS : आला आला उन्हाळा, तब्येती सांभाळा ! ही भारतीय थंड पेय शरीराला देतील थंडावा

Posted by - February 23, 2023 0
हळूहळू थंडी कमी होऊन आता उन्हाळा जाणवू लागला आहे. दोन ऋतू मधील हा होणारा बदल तुमच्या शरीरावर देखील परिणाम करू…

जागतिक नेत्रदान नेत्रदान दिनानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांनी केला नेत्रदानाचा संकल्प

Posted by - June 10, 2022 0
पुणे- जागतिक नेत्रदान नेत्रदान दिनाच्या पूर्वसंध्येला भोई प्रतिष्ठानच्या वतीने आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सफाई कर्मचारी बांधव आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *