सावधान… आपण कॅलरीज जाळताय की आपला हात ? वाचा.. तुमच्यासाठी महत्वाचे आहे

461 0

कॅलरीज बर्न करण्यासाठी एक डिव्हाइस आपल्या मनगटावर बांधले जाते. हे डिव्हाइस Google च्या मालकीची कंपनी असलेल्या Fitbit यांचे हे उत्पादन आहे. पण हे डिव्हाईस तुमच्या कॅलरीज जळत नाही तर तुमचे मनगट जाळत असल्याचे निदर्शनास आले आहे.

हे डिव्हाईस इतके गरम होत आहे की ते वापरणाऱ्यांच्या हाताला त्याचे चटके बसत आहेत. अनेक जणांनी याबाबत तक्रार केली असून काहीजणांनी कंपनींच्या विरोधात खटला देखील दाखल केला आहे.

गुगल किंवा फिटबिट ग्राहकांची समस्या सोडवण्यासाठी कोणतीही मदत करत नाही. असा आरोप देखील करण्यात आला आहे. कंपनी ग्राहकांना दोष देत असल्याचे पुरावे देखील कोर्टात सादर करण्यात आले आहेत. यात सार्वजनिक आणि खाजगी चॅट्सच्या स्क्रीनशॉट्सचा समावेश आहे. मागे घेतलेल्या आयकॉनिक सीरिजची रिफंड प्रक्रिया देखील मंद गतीने सुरु आहे.

यावर्षी मार्चमध्ये , Google नं 1.7 मिलियन Fitbit Iconic सीरिजचे यूनिट्स बाजारातून मागे घेतले होते. या सीरिजचे डिवाइस ओव्हरहीट होत होते आणि युजर्सची हात भाजत होते. परंतु आता समोर आलं आहे की अन्य सीरिजमध्ये देखील ही समस्या आहे. फिटबिट विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीत असं सांगण्यात आलं आहे की, “ग्राहक कॅलरीज जाळण्यासाठी प्रोडक्ट घेतात, त्वचा नाही.”

कॅलिफोर्नियामधील दोन युजर्सच्या दाव्यानुसार, फक्त आयकॉनिक नव्हे तर अन्य सीरिजचे डिवाइस देखील ओव्हरहिट होत आहेत. एकाकडे फिटबिट वर्सा लाईट आहे तर दुसरं फिटबिट वर्सा 2 वापरत आहेत. फिटबिट आणि गुगलवर दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये वर्सा, वर्सा 2, वर्सा 3, चार्ज 4, वर्सा लाईट, आयकॉनिक, सेंस, अल्टा एचआर, इन्स्पायर, इन्स्पायर एचआर, इन्स्पायर 2 आणि ब्लेजचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

UPI Payment

UPI Payment : UPI युजर्ससाठी महत्वाची बातमी ! 31 डिसेंबरच्या आधी करा ‘हे’ काम अन्यथा यूपीआय नंबर होईल बंद

Posted by - November 18, 2023 0
आजकाल सगळीकडे ऑनलाईन पेमेंट (UPI Payment) करण्यात येते. जर तुम्हीदेखील ऑनलाईन पेमेंट करत असला तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नॅशनल…
Lalbaugcha Raja

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या दर्शनामध्ये उसळली गर्दी; Video आला समोर

Posted by - September 21, 2023 0
मुंबई : ‘लालबागचा राजा’ हा (Lalbaugcha Raja) कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या 10 दिवसात देशभरातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी…

JEE मुख्य सत्र-1 च्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या नवीन तारखा

Posted by - March 14, 2022 0
JEE ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. JEE मुख्य सत्र-1 च्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.कोणत्या आहेत…

ढगफुटी म्हणजे काय आणि ढगफुटी होण्याची कारणं काय आहेत जाणुन घ्या

Posted by - July 11, 2022 0
  सध्या या पावसाळ्यात दिवसात अनेकदा आपल्याला ढगपुटी झाली ढगपुटीसदृश पाऊस झाला असे शब्द अनेकदा ऐकायला मिळतात. मात्र ही ढगफुटी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *