ढगफुटी म्हणजे काय आणि ढगफुटी होण्याची कारणं काय आहेत जाणुन घ्या

450 0

 

सध्या या पावसाळ्यात दिवसात अनेकदा आपल्याला ढगपुटी झाली ढगपुटीसदृश पाऊस झाला असे शब्द अनेकदा ऐकायला मिळतात. मात्र ही ढगफुटी म्हणजे काय आणि ढगफुटी होण्याची कारणं काय आहेत हेच जाणून घेऊयात

  • ढगफुटी म्हणजे काय ?

एखाद्या ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडतो. याचा ताशी वेग 100 मिटर असतो. अगदी कमी वेळात 2 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. या पावसाचा वेग आणि प्रमाण असाधारण असते. पावसाच्या अतिवृष्टीतीमुळं आर्थिक नुकसान तर होतेच पण जीवितहानी सुद्धा होते. काहीवेळा पाऊस सुरू असताना जोराचा वारा ढगांना वरती ढकलत असतो.वरती तापमान कमी असल्यामुळं पावसाच्या थेंबाच रूपांतर बर्फामध्ये म्हणजे गारांच्या रूपात होतं.गारा एकमेकांना चिकटून त्यांचं वजन वाढत .ऊर्ध्वगामी वाऱ्याला ढगांचं वजन पेलवत नाही व ढग खाली येऊन त्यांचं रूपांतर अतिवृष्टीमध्ये होतं.या अतिवृष्टीला ढगफुटी म्हणतात.

ढगफुटी दरम्यान आकाशात विजांचा गडगडाट असुन पावसाचा वेग खुप जास्त असतो. अशा वेळेस महापुराची परीस्थिती निर्माण होते.ढगफुटी एक नैसर्गिक आपत्ती आहे. ढगफुटीच्या घटना जास्त प्रमाणात डोंगराळ भागातच घडतात.ज्या ठिकाणी ढगफुटी होते त्या ठिकाणी लोकांना वाचवायलाही वेळ मिळत नाही. सलग पडणाऱ्या पावसामुळं लोकांचं खुप नुकसान होतं.

ढगफुटी होण्याची कारणे 

  1. पडणाऱ्या पावसाला जोराचा वारा ढगांना आणि पावसाला वरती ढकलत असतो. वरती तापमान कमी असल्यामुळं पावसाच्या थेंबाचे गारांत रूपांतर होते व ढगांना वजन न झेपल्यानं अतिशय वेगानं पाऊस पडायला सुरुवात होते, म्हणजेच ढगफुटी होते.

  2. ढगांमध्ये मोठ्या प्रमाणात आद्रता असते. ढगांमध्ये पाणी असते व या ढगांना अडथळा निर्माण झाला की ढगफुटी होते.

  3. पर्वतीय भागांमुळे ढगांना अडथळे निर्माण होतात त्यामुळे या भागांत जास्त प्रमाणात ढगफुटी होते.

Share This News

Related Post

devendra-fadnavis

केंद्रीय अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - February 1, 2023 0
आज देशाचा अर्थसंकल्प सादर झालाय. यावर उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. ‘अमृतकालातील सर्वजनहिताय अर्थसंकल्प’, या संकल्पनेवर आधारित यंदाचा…

वसंत पंचमी 2023 : विवाह ठरवणे, वास्तू खरेदी, गृहप्रवेश कोणत्याही शुभ कार्यासाठी आजचा दिवस आहे खास, वाचा हि उपयुक्त माहिती

Posted by - January 25, 2023 0
वसंत पंचमी 2023 : आज वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात वसंत पंचमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रानुसार बसंत…

जिओकडून “कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी” योजना सादर

Posted by - March 28, 2022 0
एका रिचार्जवर पूर्ण महिन्याची वैधता “कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी” योजना सादर करणारी जिओ पहिली टेलिकॉम ऑपरेटर कंपनी ठरली आहे. या योजनेमध्ये…

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाची विक्रमी कमाई

Posted by - March 23, 2022 0
विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घालत असून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित…

Breaking News ! ….अखेर राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर

Posted by - April 5, 2022 0
कोल्हापूर- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कोल्हापुरात झालेल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *